Sad Love Story आई बापाने प्रेम विवाहाला विरोध केला म्हणून मुलगा घरजावई बनला

Sad Love Story

Sad Love Story “अरे शशांक एकदा आमचं ऐकून तरी घे. लग्न म्हणजे काय भातुकलीचा खेळ नसतो. मुलगी आवडली आणि लग्न केलं. सगळं बॅकग्राऊंड पाहवं लागतं, कुटुंब पहावं लागतं. लोक कोण आहेत, कसे आहेत, हे सगळ चेक कराव लागतं.”

सुदर्शन त्यांचा मुलगा शशांकला समजवण्याचा प्रयत्न करत होते. परंतु शशांक चिडून म्हणतो, “बाबा मला काही ऐकून घ्यायचं नाही. माझं तृप्तीवर प्रेम आहे आणि काहीही झालं तरी मी तिच्याशी लग्न करणार. आणि प्रेम असलं की बॅकग्राऊंड पाहणं, आईबाप कोण आहेत, घरदार कस आहे, हे सगळं पाहण्याची गरज नसते. मला फक्त तिच्याशीचं लग्न करायचंय आणि मी ते करणारचं.”

Sad Love Story 

शशांकची आई समृद्धी खूप चिडते आणि म्हणते, “शशांक ही पद्धत नाहीये बाबांशी बोलायची आणि तुला जर त्या मुलीशी लग्न करायचं असेल आणि आमचं ऐकूनचं घ्यायचं नसेल ना, तर हे घर सोडून जायचं. एकदा घराबाहेर पडला की, तुला कळेल, Sad Love Story बाहेरचं जग आणि आई बापाच्या छता खालचं जग किती वेगळं असतं ते.”

शशांक म्हणतो, “आई मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. ठीक आहे जातो मी इथून आणि तुम्हाला सिद्ध करून Sad Love Story दाखवेल की, मी योग्य होतो, माझा निर्णय योग्य होता.” असं म्हणून शशांक रागाने त्याची बॅग भरतो आणि घर सोडून निघून जातो.

सुदर्शन समृद्धी या दोघांना खूप वाईट वाटतं. आपला मुलगा आपल्या इच्छेविरुद्ध लग्न करणार, तो घर सोडून गेला आहे, म्हणून ते दुःखी होतात. पण एक दिवस त्याला त्याची चूक समजेल आणि तो परत येईल. Sad Love Story असाही त्यांना विश्वास असतो. या घटनेला पाहता पाहता सहा महिने उलटून जातात. या सहा महिन्यांच्या काळात शशांकने आई-बाबांना कोणताही संपर्क केलेला नसतो. तो त्यांना भेटायलाही आलेला नसतो.

सुदर्शन आणि समृद्धीही विचार करतात की, नव्या नव्या लग्नाचे दिवस आहेत. एकदा का त्याला चूक समजली, Sad Love Story तर येईल तो परत. त्यामुळे त्यांनीही शशांकबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला नसतो.

एक दिवस शशांकच्या वाढदिवसानिमित्त सुदर्शन आणि समृद्धी त्याला दीर्घायुष्य लाभावं, त्याला सगळं यश मिळावं, यासाठी प्रार्थना करायला मंदिरात जात असतात. एका सिग्नलवर त्यांची गाडी थांबते. Sad Love Story तेवढ्यात बाजूच्या गाडीजवळ एक भिकारी येतो आणि पैसे मागू लागतो. सुदर्शन गाडीबाहेर अशीच नजर टाकतो. तेव्हा या भिकाऱ्याला पाहून सुदर्शनला जबर धक्काचं बसतो. कारण हा भिकारी, दुसरा तिसरा कोणी नसून सुदर्शनचा मुलगा शशांक असतो.

सुदर्शनचा क्षणभर त्याच्या डोळ्यावर विश्वासचं बसत नाही. तो लगेचं गाडीचा दरवाजा उघडून खाली उतरण्याचा प्रयत्न करू लागतो. पण तेवढ्यात सिग्नल सुटतो आणि सगळ्या गाड्या पुढे जाऊ लागतात. Sad Love Story मागून गाड्यांचा हॉर्न वाजत असल्यामुळे सुदर्शनही गाडी पुढे घेतो. थोडं लांब गेल्यानंतर तो गाडी रस्त्याच्या कडेला लावतो. समृद्धी विचारते, “काय झालं सुदर्शन ?” सुदर्शन विचार करतो, हिला सत्य सांगितलं तर मोठा धक्का बसेल. सुदर्शन म्हणतो, “माझा एक मित्र मला मागे दिसला, तू थांब गाडीत, मी येतो आता” असं म्हणून सुदर्शन सिग्नलकडे धावत सुटतो.

सिग्नलवर आल्यावर सुदर्शनला शशांक कोठेही दिसत नाही. सुदर्शनाला क्षणभर वाटतं की, त्याचा नक्की Sad Love Story  काहीतरी गैरसमज झाला असेल. भास झाला असेल. आपला मुलगा इतका शिकलेला, तो असा रस्त्यावर भिक का मागेन, अशा अवस्थेत का असेल ? असही त्याला वाटतं आणि हा विचार करून सुदर्शन गाडीकडे जाऊ लागतो. एवढ्यात त्याला रस्त्याच्या कडेला फुटपातवर शशांक वडापाव खाताना दिसतो. सुदर्शनचा विश्‍वासचं बसत नाही. पण हा त्याचा मुलगा शशांकच असतो. सुदर्शन लगेच शशांकजवळ धावत येतो आणि म्हणतो, “शशांक”.

Marathi Love Story

शशांक सुदर्शनला पाहून खूप घाबरतो आणि म्हणतो, “मी नाही देणार माझा वडापाव. मी भीक मागितली दिवसभर आणि कसातरी हा एक वडापाव घेतला आहे. Sad Love Story खूप भूक लागलीये मला. मी नाही देणार तुम्हाला माझा वडापाव.” शशांकचे हे शब्द ऐकून सुदर्शनला खूप वाईट वाटतं. त्याला आठवतं की, आपला मुलगा हा मोठ्या मोठ्या हॉटेलशिवाय कधी खात पीत नव्हता. रस्त्यावरचा त्याला काही आवडत नव्हतं आणि आज तोच मुलगा भीक मागून रस्त्यावर वडापाव खातोय, हे सगळं पाहून सुदर्शनच्या डोळ्यात अश्रू येतात.

सुदर्शन शशांकला म्हणतो, “नाही बाळा, मी तुझा वडापाव नाही घेणार. उलट आमच्या घरी आज खूप मोठी पार्टी आहे. Sad Love Story तुला खूप छान छान खायला मिळेल तेथे. पिझ्झा, बर्गर, आईस्क्रीम, चॉकलेट, तू चल आमच्या घरी तुला सगळं देतो.” हे ऐकून शशांकला खूप आनंद होतो आणि तो म्हणतो, “खरंच मला एवढं सगळं भेटेल का ? तर मग मी येतो तुमच्या घरी.” सुदर्शन शशांकचा हात पकडतो आणि त्याला गाडीजवळ घेऊन येतो. सुदर्शन समृद्धीला गाडीबाहेर बोलवतो. Sad Love Story समृद्धी गाडीतून उतरते आणि शशांककडे पाहते, तर तिला जबरदस्त धक्काचं बसतो. हा आपला मुलगा आहे, हा या अवस्थेत कसा, हे तिला काही समजत नाही. ती विचारते, “अहो हे काय, आपला शशांक या अवस्थेत ?”

सुदर्शन म्हणतो, “तू बस गाडीत. मी सांगतो तुला सगळं.” हे तिघे गाडीमध्ये बसतात. सुदर्शन हॉस्पिटलला गाडी घेऊन जातो आणि रस्त्यात समृद्धीला सगळं सांगतो. Sad Love Story समृद्धीलाही खूप वाईट वाटतं आणि ती रडू लागते. हे दोघे शशांकला घेऊन हॉस्पिटलमध्ये येतात. तेथे डॉक्टर शशांकला चेक करतात. डॉक्टर या दोघांना सांगतात की, “शशांकला जबरदस्त मानसिक आघात झाला आहे. म्हणून तो असा वागतोय. Sad Love Story काहीतरी नक्कीच घडलंय. तुम्हाला आता याची खूप काळजी घ्यावी लागेल. तो या सगळ्यातून बाहेर येऊ शकतो. पण त्याला तुमचं प्रेम, आपुलकी आणि हिम्मत हवी आहे.”

सुदर्शन आणि समृद्धी शशांकला घेऊन घरी येतात. ते शशांकला चांगले कपडे घालायला देतात. शशांक पूर्वीसारखाचं दिसू लागतो. परंतु त्याचं वागणं बोलणं हे Sad Love Story पूर्णपणे बदललेलं असतं. एखाद्या भ्रमिष्ट माणसाप्रमाणे तो वागत असतो. लहान मुलाप्रमाणे बोलत असतो. समृद्धी त्याच्याशी खूप प्रेमाने वागते. त्यामुळे षधांक तिच्याजवळ मांडीवर झोपी जातो.

सुदर्शन म्हणतो, “आपल्या मुलाबरोबर काहीतरी खूप वाईट झालंय. आपल्या लवकरचं सगळं शोधून काढावं लागेल.’ समृद्धी म्हणते, “आपण उद्याच्या उद्या त्या Sad Love Story मुलीच्या घरी जाऊया. पाहूया त्याचं काय झालंय.” दुसऱ्या दिवशी सकाळी सुदर्शन आणि समृद्धी शशांकच्या दोन मित्रांना घरी बोलवून घेतात आणि त्यांना शशांकची काळजी घ्यायला सांगून तृप्तीच्या घरी जातात. जिच्याबरोबर शशांकला लग्न करायचं होतं.

हे दोघे तृप्तीच्या घरी पोहोचतात. तेव्हा तृप्ती तिच्या आई बाबांबरोबर मस्तपैकी टीव्ही पाहत बसलेली असते. सुदर्शन तिला विचारतो, “शशांकचं तुझ्यावर प्रेम होतं ना. तुम्ही दोघे लग्न करणार होतात ना ? Sad Love Story तृप्ती खूप घाबरते. तेवढ्यात तिची आई पुढे येते आणि म्हणते, “पोरीला काय विचारताय” मी सांगते सगळं. तुमच्या मुलाने माझ्या मुलीला फसवलंय. तिला लग्नाच्या आणा-भाका दिल्या आणि लग्न करायला आलाचं नाही. मागील सहा महिन्यापासून कोठे गायब झालाय काय माहित ? आम्हाला नाही माहीत कुठे आहे तो ? Sad Love Story तुम्ही जा इथून.” असं म्हणून ती या दोघांच्या तोंडावर दरवाजा बंद करून घेते.

समृद्धी म्हणते, “अहो नक्कीचं काहीतरी काळबेर आहे. यांनी काहीतरी केलंय आपल्या मुलाला.” सुदर्शन म्हणतो, “मलाही असंच वाटतंय. आपल्याला चौकशी करावी लागेल.” असा विचार करून हे दोघे तृप्तीच्या घराच्या आसपास चौकशी करू लागतात. Sad Love Story पण कोणीचं त्यांना काही सांगत नाही. हे दोघे निराश होऊन जाऊ लागतात. तेवढ्यात एक बाई त्यांना गुपचूप घरात येण्याचा इशारा करते. सुदर्शन आणि समृद्धी या बाईच्या घरात जातात.

ही बाई म्हणते, “साहेब तुम्हाला या वस्तीत कोणीचं काही खरं सांगणार नाही. पण या लोकांनी तुमच्या मुलाबरोबर खूप वाईट केलंय. मी सांगते तुम्हाला सगळं. तुमचा मुलगा सहा महिन्यांपूर्वी आला होता यांच्या घरी. या तृप्तीवर त्याचं खूप प्रेम होतं. दोघांनी लग्न केलं कोर्ट मॅरेज. Sad Love Story पण साहेब खूप वाईट माणस आहेत ही. आईबाप आणि मुलगी सगळे सारखेच आहेत. चांगल्या घरच्या मुलांना फसवायचं, प्रेमात वेड करायचं, मग त्यांचा पैसा लाटायचा आणि त्यांना सोडून द्यायचं, हीच काम करतात ही माणसं. तुमचा मुलगा काही पहिला नव्हता, याआधी सुद्धा अनेक मुलांबरोबर असं केलंय त्यांनी.

फक्त फरक एवढाचं की, अनेक मुलं तृप्तीला त्यांच्या घरी घेऊन जायची, बायको म्हणून. पण तुमचा मुलगा यांच्या घरी राहायला आला आणि तेथेच त्यांचा डाव फसला. म्हणून मग त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे तुमच्या मुलाला त्रास द्यायला सुरुवात केली. Sad Love Story त्याच्याकडून घरकाम करून घ्यायचे, बाहेरची काम करून घ्यायचे. त्याचा छळ करायचे. रात्रंदिवस त्याला टॉर्चर करायचे. एक महिन्यापूर्वी तो पूर्णपणे वेडसर वागायला लागला आणि त्यानंतर यांनी त्याला घराबाहेर हाकलून दिलं. कोठे असेल, काय माहित तो बिचारा आता.”

हे सगळे ऐकून सुदर्शन आणि समृद्धीला जबर धक्का बसतो. आपल्या मुलाबरोबर हे काय घडलं, याचा विचार करून दोघांच्याही डोळ्यात पाणी येतं. हे दोघे या बाईचचे आभार मानतात आणि तेथून बाहेर पडतात. ते घरी येतात, तेव्हा शशांक त्याच्या मित्रांबरोबर मस्त खेळत असतो. त्याला पाहून या दोघांना बरं वाटतं. Sad Love Story सुदर्शन समृद्धीला विचारतो, “आता काय करायचं ? समृद्धी म्हणते, ‘आपल्या मुलाला आपण बेस्ट ट्रीटमेंट देऊ. आज ना उद्या, तो बरा होईल. पण अशा माणसांना धडा शिकवायला हवा, नाहीतर दुसऱ्या कोणाचच्या आयुष्याचही असच वाटोळ होईल.”

सुदर्शन म्हणतो, “एकदम बरोबर बोलतेस तू. अशा माणसांना आपल्या समाजात नाही राहू दिलं पाहिजे. त्यांना तुरुंगात धाडायला हवं. सुदर्शन लगेचच पोलीस Sad Love Story स्टेशनमध्ये जातो. त्यांच्याकडे तृप्ती आणि तिच्या कुटुंबाविरुद्ध कोणताही पुरावा नसतो. त्यांच्याविरुद्ध साक्ष द्यायलाही कुणी तयार होत नाही. पण सुदर्शन हा एक प्रतिष्ठित व्यक्ती असल्यामुळे पोलीस त्याची मदत करायला तयार होतात. ते एक सापळा रचतात. ज्यामध्ये एक पोलीस इन्स्पेक्टर साधा शाळावेसग घेऊन तृप्तीशी प्रेमाकॅब नाटक करतो आणि त्यानंतर तृप्तीशी लग्नही करतो. तृप्ती मग त्याच्याबरोबर जे काही करते, Sad Love Story यावरून पुढील दोन महिन्यांमध्ये पोलीस तृप्ती आणि तिच्या आई-बाबांना अटक करतात. त्याच्याविरुद्ध सगळे पुरावे गोळा करतात आणि या तिघांना जबर शिक्षा होते.

इकडे शशांकला बरा व्हायला जवळपास एक वर्षाचा वेळ लागतो. पण त्याच्यावर बेस्ट ट्रीटमेंट केली जाते आणि तो पूर्णपणे बरा होतो. तृप्ती आपल्याशी कशी वागली, तिचं कुटुंब कसं वागलं, याबद्दल तो सगळं आई-बाबांना Sad Love Story आणि पोलिसांना सांगतो आणि यानंतर कधीही आई-बाबांच्या विरोधात जाणार नाही आणि त्यांचं नेहमी ऐकेल असं वचन तो त्यांना देतो.

पुढे शशांकचं एका चांगल्या घराण्यातील मुलीशी लग्न होतं आणि तो सुखाचा संसार करतो. Sad Love Story तर दुसरीकडे तृप्ती आणि तिचे आई बाबा हे मात्र आयुष्यभर तुरुंगात खडी फोडत बसतात.

तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, कशी वाटली आजची कथा ? नक्कीचं कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन कथांसाठी आमचे इतर लेखही नक्की वाचा. 

खूप खूप धन्यवाद !

Scroll to Top