महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम शिवाली परब ने मुंबईत विकत घेतलं स्वतःचं घर

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम शिवाली परब

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम शिवाली परब  लोकप्रिय अभिनेत्री. शिवाली परब ही आपल्या जबरदस्त कॉमेडीमुळे घराघरात खूपच लोकप्रिय झाली आहे. हास्यजत्रेसोबतच ती अनेक म्युझिक व्हिडिओमधेही दिसून येते.

अक्षय तृतीयेच्या शुभदिवशी शिवालीने स्वतःचं नवीन घर खरेदी केलं आणि आपल्या वाढदिवसाच्या दिवशी नवीन घरात गृहप्रवेश केला. तिने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून नवीन घरात गृहप्रवेश करतानाचा व्हिडिओ शेअर केला आणि आपल्या नवीन घराची झलकसुद्धा दाखवली. तिच्या घराची नेमप्लेट लक्ष वेधून घेणारी आहे. यावेळी शिवालीचं कुटुंब उपस्थित होतं. नवीन घरात गृहप्रवेश करतानाचा आनंद तिच्या आणि तिच्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम शिवाली परब

शिवालीने या व्हिडिओसोबत एक इमोशनल पोस्टसुद्धा शेअर केलीय.

तिने या पोस्टमध्ये लिहलंय की,

१० मे २०२४
नमस्कार पहिले तर सगळ्यांना खूप-खूप धन्यवाद माझ्या वाढदिवसा निमित्त Call Msg करून शुभेच्छा दिल्यात असाच तुम्हा सगळ्यांचा आशिर्वाद राहूदे आणि या आशिर्वादामुळे मी अक्षय तृतीयाच्या शुभ दिनी माझ्या आई
बाबांसाठी स्वतचं हक्काचं एक घर घेतलं…
काल गृह प्रवेश ही झाला, आज माझं ते स्वप्न पूर्ण झालं जे प्रत्येक माणसाच स्वप्न असतं म्हणजे स्वःतच एक “घर” खर तर हे घर माझं स्वप्न नाही माझ्या आई- बाबांच स्वप्न आहे आणि त्यांचे ऋण कधीच फेडले जात नाही … माझं छोटस gift माझ्या वाढदिवसा निमित्त माझ्या आई बाबांसाठी … इतके वर्ष भाड्याच्या घरात राहिलो हा प्रवास चाळीतून थेट मोठ्या building च्या 2bhk apartment पर्यंतचा होता…
प्रवास खूप गोड होता, शिकण्यासारखा होता सगळ्यांचे खूप आभार माझ्या सोबत तुमच्या शुभेछ्या आणि सदिच्छा कायम असुद्या….
हा व्हिडिओ यासाठी टाकतेय कारण आई बाबांच्या चेहऱ्यावरचा हा आनंद कायम माझ्या स्मरणात राहावा… व्हिडीओ पोस्ट करताना मन भरुन आले आहे, काहीतरी मिळवल्याचा हा आनंद कमालीचा आहे …
Thank you everyone .

Shivali Parab New Home In Mumbai
Shivali Parab New Home In Mumbai

शिवाली परबने मुंबईत विकत घेतलं नवीन घर

Shivali Parab New Home

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम शिवाली परब या शब्दात आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. तिच्या या पोस्टवर कमेंट्स करत चाहत्यांनी महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम शिवाली परब नवीन घरासाठी शुभेच्छा दिल्या आहेत आणि तिने इतक्या कमी वयात खूप कष्टाने स्वतःचं घर घेतलं त्यामुळे तिचं कौतुकही करत आहेत.

मनोरंजनविश्वातील अशाच नवनवीन बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईटला नक्की फॉलो करा. 

तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद !

Scroll to Top