मातृदिन च्या दिवशी आईच्या आठवणीत भावूक झाले अभिनेते मिलिंद गवळी

मातृदिन

आज 12 मे 2024 रोजी जगभरात ‘मदर्स डे’ साजरा केला जातोय. आजचा दिवस सगळेजण मातृदिन म्हणून साजरा करताय. आईची महती पाहता तिच्यासाठी फक्त एक दिवस नाही तर प्रत्येक दिवस हा तिचाच असला पाहिजे. सगळेजण आज आपल्या आईबद्दलचं प्रेम व्यक्त करताय. आपले मराठी कलाकारसुद्धा त्यांच्या आईविषयीचं प्रेम व्यक्त करताय.

मातृदिन (Mothers Day)  

अभिनेते मिलिंद गवळींनी आजच्या मातृदिनाच्या दिवशी आपल्या आईसाठी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केलीय. त्यांनी या पोस्टमध्ये लिहलंय की,

मातृदिन च्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा खरंतर मातृदिन हा एक दिवस असू शकत नाही वर्षातले 365 दिवस मातृदिन च असायला हवा,
खरंच आपण आईला किती taken for granted,
गृहीत धरत असतो, आपल्याला नऊ महिने पोटात सांभाळून, असंख्य वेदना सहन करून, आपल्याला जन्म देते, आणि आपल्याला जन्म दिल्यानंतर आयुष्यभर निस्वार्थीपणे आपला सांभाळ करते, आपली काळजी घेते, हवंनको ते सगळं बघते, आपल्याला बोलायला, चालायला, धावायला शिकवते, पहिली priority तिच्यासाठी आपण असतो, ती स्वतःची कधी काळजी घेतच नाही, सतत आपली काळजी करत राहते,
माझी आई तर मी बाहेरून आल्या आल्या माझा चेहरा बघून ती सांगू शकायची आजचा माझा दिवस कसा गेला असेल ते, आणि मला नेहमीच आश्चर्य वाटायचं, की तिला कसं कळतं, एक दिवस मी घरी आलो आणि माझ्या चेहऱ्यावरन तिने ओळखलं की काहीतरी गडबड झाली आहे, ती मला सारखं विचारे “काय झालं बाळा काहीतरी झालं आहे, तू माझ्यापासून लपवतोयस “, आणि खरंच मी तिच्यापासून लपवत होतो की त्या दिवशी मी ज्या रिक्षात न जात होतो ती रिक्षा पलटली होती आणि माझ्या पायाला लागलं होतं,
आईचा मुलांमध्ये जीव अडकलेला असतो ते काय खोटं नाही आहे,
माझी आई तर माझी काळजी करत करतच गेली, स्वतःची काळजी तिने कधी घेतलीच नाही,
तिने तिचा आनंद जगाबरोबर साजरा केला पण तिचं दुःख मात्र तिने
तिच्याजवळच कायम ठेवलं, आयुष्यामध्ये कुठल्याही गोष्टीची तक्रार तिने कधी केली नाही, तिने तिचं जगणं नेहमी celebrate च केलं.
माझी आई असेपर्यंत मी राजासारखाच जगलो, तीने मला प्रामाणिकपणे कष्ट करायला शिकवलं, ती स्वतः खूप मोठी मोठी स्वप्न पाहायची, तिने मलाही मोठी स्वप्न बघायला शिकवलं, आपल्याकडे कष्ट करायची जिद्द असेल आणि परमेश्वरावर श्रद्धा असेल तर जगामध्ये कुठलीही गोष्ट अशक्य नाही असं असं ती नेहमी सांगत असे,
तिला राग द्वेष हे काय माहिती नव्हतं तिला फक्त असीम प्रेम करणं निस्वार्थ प्रेम करणं हेच ठाऊक होतं, आणि आणि प्रेम करण्यामध्ये कधी भेदभाव नव्हता, गरीब श्रीमंतीचा भेदभाव नव्हता लहान-मोठ्याचा भेद भाव नव्हता, गणेशपुरीच्या नित्यानंद बाबांवर मुक्तानंद बाबांवर आणि गुरुमांईवर अपार श्रद्धा होती,
शेवटच्या क्षणापर्यंत ती त्यांचा जप करत होती, आजारी होती खूप शारीरिक वेदना व्हायच्या पण म्हणायची मला कसली भीती च नाहीये मला मोक्षच मिळणार .
मला अजूनही असं वाटतं की ती शरीराने आपल्यात नाहीये पण मनाने ती सतत
माझ्या जवळच असते.
मातृदिनाच्या निमित्ताने एवढेच सांगावस वाटतं
आपल्या आईला जपा, तिला आनंदी ठेवा, खूप प्रेम करा तिच्यावर.

milind gawali bike accident news
milind gawali bike accident news

मिलिंद गवळी यांच्या मोटारसायकलचा अपघात

या शब्दात त्यांनी आपल्या आईबद्दलचं प्रेम व्यक्त केलंय. त्यांनी शेअर केलेल्या या पोस्टवर कमेंट्स करत अनेक चाहत्यांनी त्यांच्या आईविषयीच्या प्रेमाचं कौतुक केलंय आणि मातृदिन च्या शुभेच्छाही दिल्या आहेत.

मनोरंजनविश्वातील अशाच नवनवीन बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईटला नक्की फॉलो करा. 

तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद ! 

Scroll to Top