कलर्स मराठीची मालिका बंद होणार. कलर्स मराठी वाहिनीवर लवकरचं 2 नवीन मालिका सुरू होणार आहेत. ‘अबीर गुलाल‘ आणि ‘अंतरपाट’ ही नवीन मालिकांची नावं आहेत. सोशल मीडियावर या मालिकांचे प्रोमोसुद्धा दाखवण्यात आले. मालिकांचे प्रोमो प्रेक्षकांना खूपच आवडलेत. मालिकांमधील प्रमुख कलाकारांची ओळख या प्रोमोमधून करून देण्यात आली. पण या मालिका कधीपासून सुरू होणार हे अजून समोर आलेलं नाही.
या दोन नवीन मालिका सुरू होणार म्हणजे आधीपासून या वेळेवर सुरू असलेल्या जुन्या मालिका बंद होतील किंवा त्यांच्या वेळा बदलल्या जातील.
कलर्स मराठीची मालिका बंद होणार
आता एक मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची माहिती समोर आलीय. या मालिकेतील कलाकारांच्या इंस्टाग्रामवरील पोस्टमुळे ही बातमी कन्फर्म झालीय. ‘काव्यांजली’ मालिकेतील अभिनेता पियुष रानडे आणि अभिनेत्री कश्मिरा या दोघांनीही इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर केलीय.
पियुषने मेकअप करतानाचा व्हिडिओ शेअर केला आणि त्यावर ‘विश्वजीत म्हणून शेवटचे काही दिवस…खूप खूप आभार’ असं लिहलं आहे. तर कश्मिराने ‘काव्या म्हणून शेवटचे काही दिवस’ असं इंस्टाग्राम स्टोरीला शेअर केलंय. यावरून आता ‘काव्यांजली सखी सावली’ ही मालिका बंद होणार असल्याचं स्पष्ट झालंय.
Colors Marathi Serial Kavyanjali Off Air
ही मालिका वर्षभरापूर्वी सुरू झाली होती पण इतक्या लवकर ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. कलर्स मराठीची मालिका बंद होणार, कारण मालिकेला टीआरपी कमी येतोय. प्रेक्षकांचा कमी प्रतिसाद मिळत असल्यामुळे चॅनलने हा निर्णय घेतला आहे. या बातमीमुळे मालिकेचे चाहते नक्कीच नाराज होतील.
स्टार प्रवाहच्या या 2 प्रसिद्ध मालिका बंद होणार
पण लवकरच ‘अबीर गुलाल’ आणि ‘अंतरपाट’ या दोन मालिका सुरू होणार आहेत. या मालिकांच्या प्रोमोमुळे प्रेक्षकांची उत्सुकता खूप वाढली आहे आणि सगळेजण या मालिकांची खूपच आतुरतेने वाट पाहत आहेत.
मनोरंजनविश्वातील अशाच नवनवीन बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईटला नक्की फॉलो करा.
तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद !