Yed Lagla Premacha Serial Cast येड लागलं प्रेमाचं मालिकेतील कलाकार

Yed Lagla Premacha Serial Cast

Yed Lagla Premacha Serial Cast स्टार प्रवाह वाहिनीवर काही दिवसांपूर्वी ‘येड लागलं प्रेमाचं’ या नवीन मालिकेची घोषणा करण्यात आली. या मालिकेचे प्रोमोसुद्धा सोशल मीडियावरून समोर आलेत. हे प्रोमो पाहिल्यानंतर प्रेक्षकांची या मालिकेबद्दलची उत्सुकता आणखीनच वाढली आहे.

‘येड लागलं प्रेमाचं’ मालिकेची कथा ही विठुरायाच्या पुण्यनगरीत म्हणजे पंढरपुरात घडते. मालिकेच्या नावावरूनच कळतंय की ही गोष्ट प्रेमाच्या येडेपणाची असणार आहे. राया आणि मंजिरीची ही गोष्ट असणार आहे. राया हा अतिशय रागीट आणि गुंड प्रवृत्तीचा दाखवण्यात आलाय. तर मंजिरी ही स्वाभिमानी, हुशार आणि अन्याय सहन न करणारी अशी आहे. राया आणि मंजिरीच्या प्रेमाची गोष्ट आपल्याला मालिकेत पाहायला मिळेल.

Yed Lagla Premacha Serial Cast 

या मालिकेत कोणकोणते कलाकार दिसणार आहेत ते आपण पाहूया.

येड लागलं प्रेमाचं मालिकेची कास्ट –

1. विशाल निकम – विशाल या मालिकेत रायाची भूमिका साकारतोय. तो मालिकेचा मुख्य नायक आहे. तो गुंड प्रवृत्तीचा असल्याचं दाखवलं गेलंय.

Vishal Nikam

2. पूजा बिरारी – पूजा या मालिकेत मंजिरीची भूमिका साकारतेय. ती मालिकेची नायिका आहे. स्वाभिमानी आणि अन्याय सहन न करणारी अशी तिची ओळख आहे.

पूजा बिरारी
पूजा बिरारी

3. नीना कुलकर्णी – त्या या मालिकेत मंजिरीच्या सासूबाईंच्या भूमिकेत आहेत. त्यांना जिजी म्हणून हाक मारतात.

नीना कुलकर्णी
नीना कुलकर्णी

4. अतिशा नाईक – त्या या मालिकेत मंजिरीच्या काकूंच्या भूमिकेत आहेत. मालिकेच्या मुख्य खलनायिका त्या आहेत आणि मंजिरीला नेहमी त्रास देतात. 

अतिशा नाईक
अतिशा नाईक

5. जय दुधाणे – जय या मालिकेत मंजिरीच्या पहिल्या नवऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे.

जय दुधाणे
जय दुधाणे

6. अक्षय टाक – तो या मालिकेत रायाच्या मित्राच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘बाळूमामाच्या नावाने चांगभलं’ या मालिकेतील तात्याच्या भूमिकेमुळे तो लोकप्रिय झाला. ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटातही तो दिसला होता.

अक्षय टाक
अक्षय टाक

7. उमेश दामले – ते या मालिकेत मंजिरीच्या सासरेंच्या भूमिकेत दिसतील. याआधी ते ‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेत बापूच्या भूमिकेत दिसले होते.

उमेश दामले
उमेश दामले

प्रेक्षकांच्या अंदाजानुसार ही मालिका (Yed Lagla Premacha Serial Cast) ‘मेहंदी है रचनेवाली‘ या हिंदी मालिकेचा रिमेक आहे. या मालिकेत अभिनेता जय दुधाणे हा पूजाच्या नवऱ्याची भूमिका साकारणार आहे ज्याचा लग्नानंतर मृत्यू होतो आणि तरी पूजा सासरीच राहते. त्यानंतर मग मंजिरी आणि रायाची गोष्ट घडणार आहे.

एकमेकांचा तिरस्कार करणारे राया आणि मंजिरी एकमेकांच्या प्रेमात कसे पडतात ही मालिकेची कथा आहे. या मालिकेचं शूटिंगसुद्धा पंढरपुरात झालं आहे.

स्टार प्रवाहच्या या दोन प्रसिद्ध मालिका बंद होणार

या मालिकेचे (Yed Lagla Premacha Serial Cast) दोन्ही प्रोमो प्रेक्षकांना प्रचंड आवडलेत. मालिकेची कथा जबरदस्त आहे आणि अनेक तगडे कलाकार यात आहेत.

Yad Lagla Premacha Serial Timings

ही मालिका येत्या 27 मेपासून सोमवार ते शनिवार रात्री 10 वाजता दाखवली जाणार आहे. प्रेक्षक या मालिकेची आतुरतेने वाट पाहताय.

मनोरंजनविश्वातील अशीच महत्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईटला नक्की फॉलो करा. 

तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद !

Scroll to Top