(म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक) आज-काल पैसे कमावण्यापेक्षा, पैसे कमवल्यानंतर ते गुंतवणूक करून कुठे ठेवायचे, ते सुरक्षित रहायला पाहिजे. त्याचबरोबर त्यामध्ये वाढ कशी होईल, हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो. मग पैसे गुंतवणूक करण्यासाठी अनेक पर्याय समोर उभे असतात. बँकांतील एफडीपासून, शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवणूक करण्यापर्यंत.
अनेक लोकांचा कल बँकेतील एफडीकडे असतो, कारण तेथे पैसे सुरक्षित राहतात आणि जो परतावा सांगितला गेलाय, तो हमखास मिळतोच. परंतु म्युच्युअल फंड आणि शेअर मार्केटबद्दल असं नसतं. तेथील परताव्याची कोणतीही गॅरंटी नसते. परतावा मोठ्या प्रमाणात मिळू शकतो, पण नुकसान सुद्धा होऊ शकतं.
म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक
परंतु शेअर मार्केटपेक्षा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणं कमी जोखमीचं समजलं जातं. तरीही जोखीम ही असतेचं. म्हणूनचं आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स देणार आहोत, ज्यामुळे म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवल्यानंतर जोखीमही कमी होईल आणि तुम्ही चांगला परतावाही मिळवू शकता.
जसं शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी विविध शेअर्स असतात, तसंच म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यासाठी विविध कंपन्यांचे म्युच्युअल फंडस करतात. त्यामध्येही स्मॉल कॅप, लार्ज कॅप असे विविध प्रकार असतात. आता तर फिक्सड इन्कम म्युच्युअल फंडसुद्धा आले आहेत, जे शेअर मार्केटमध्ये नाही, तर गव्हर्मेंट सेक्युरिटीमध्ये गुंतवणूक करतात.
म्युच्युअल फंडबद्दल संपूर्ण माहिती
म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करून जर तुम्हाला कमीत कमी रिस्क घ्यायची असेल आणि चांगला परतावा मिळवायचा असेल, तर तुमचे संपूर्ण पैसे फक्त एकाच म्युच्युअल फंडमध्ये गुंतवू नका. तुम्ही तुमच्या पैशांची विभागणी करू शकता. अर्धे पैसे एका म्युच्युअल फंडमध्ये आणि अर्धे पैसे वेगळ्या म्युच्युअल फंडमध्ये म्हणजे जर कोठे नुकसान झालं, तर तुम्हाला दुसरीकडून ते भरून काढता येईल.
म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यासाठी टिप्स
शेवटी कुठेही गुंतवणूक करताना तुम्ही त्या गुंतवणुकीच्या पर्यायाचा सखोल अभ्यास करणे खूप महत्त्वाचं असतं. नाहीतर नुकसान होण्याची शक्यता वाढते. म्हणूनचं म्युचल फंड असो, शेअर मार्केट असो किंवा एखाद्या बँकेची एफडी अभ्यास करून गुंतवणूक करणे योग्य.
तर तुम्ही गुंतवणूक करण्यासाठी कोणता पर्याय निवडाल, नक्कीचं कमेंट करून सांगा आणि अशाचं नवीन नवीन माहितीसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.
खूप खूप धन्यवाद !