अभिनेत्री अदिती द्रविड ने नुकतंच मुंबईत आपल्या स्वप्नांचं घर घेतलं आहे.

तिने अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर ही बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

अदितीने 'सुंदरा मनामध्ये भरली' या मालिकेत  नंदिनीची भूमिका साकारली होती.

याशिवाय तिने 'बाईपण भारी देवा' चित्रपटातील मंगळागौर हे गाणंसुद्धा लिहलं आहे.

अदिती सध्या पडद्यापासून दूर असली तरी ती सोशल मीडियाच्या माध्यमातून फॅन्सच्या संपर्कात

अदिती द्रविडने अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर नवीन घर घेतलंय.

तिने पूजा करून नवीन घरात गृहप्रवेशसुद्धा केला आहे.

अभिनेत्री अदिती द्रविड ने आपल्या घराचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

तिने कॅप्शनमध्ये लिहलंय की, अँड फायनली, आय सेड येस टू मुंबई. स्वतःचं घर. स्वप्नपूर्ती.

आपणही अदितीला नवीन घरासाठी शुभेच्छा देऊयात.