अभिनेत्री अदिती द्रविड ने मुंबईत विकत घेतलं स्वतःचं हक्काचं नवीन घर

अभिनेत्री अदिती द्रविड

अभिनेत्री अदिती द्रविड ने नुकतंच मुंबईत आपल्या स्वप्नांचं घर घेतलं आहे. तिने अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर ही बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

अदितीने ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेत अभ्याची मैत्रीण नंदिनीची भूमिका साकारली होती. ती या भूमिकेमुळे घराघरात लोकप्रिय झाली होती. काही महिन्यांपूर्वी या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला होता तेव्हापासून अभिनेत्री अदिती द्रविड पडद्यापासून दूर आहे. याशिवाय तिने ‘बाईपण भारी देवा‘ चित्रपटातील मंगळागौर हे गाणंसुद्धा लिहलं आहे.

अभिनेत्री अदिती द्रविड

अभिनेत्री अदिती द्रविड

अदिती सध्या पडद्यापासून दूर असली तरी ती सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या फॅन्सच्या नेहमी संपर्कात राहते. आता अदिती द्रविडने अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर नवीन घर घेतलंय आणि पूजा करून नवीन घरात गृहप्रवेशसुद्धा केला आहे.

अभिनेत्री अदिती द्रविड

अभिनेत्री अदिती द्रविड ने आपल्या घराचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये तिने आपल्या घराची गृहप्रवेशाची पूजा दाखवली आहे तर दुसऱ्या फोटोमध्ये आपल्या घराचा नंबर 801 असल्याचं दाखवलं आहे. अदितीच्या घराचे सुंदर फोटोही पाहायला मिळालेत.
यासोबतच तिने कॅप्शनमध्ये लिहलंय की, अँड फायनली, आय सेड येस टू मुंबई. स्वतःचं घर. स्वप्नपूर्ती.

अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकरचा मराठी सिनेमा

Aditi Dravid New Home  

अदितीने मुंबईत आपलं स्वतःचं घर घेतलंय त्यामुळे तिचे फॅन्स खूप खुश झाले आहेत. इतक्या कमी वयात तिने स्वतःचं घर घेतलं म्हणून सगळेजण तिचं कौतुक करताय.
तिने शेअर केलेल्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी आणि मराठी मालिकांमधील अनेक कलाकारांनी कमेंट्स करत तिला या नवीन घरासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.

अभिनेत्री अदिती द्रविड
अभिनेत्री अदिती द्रविड

मागील काही दिवसांमध्ये मराठी कलाविश्वातील अनेक कलाकारांनी आपली स्वतःची घरं घेतली आहेत आणि आता त्यामध्ये अभिनेत्री अदिती द्रविड चं नावसुद्धा जोडलं गेलं आहे. तिने यापुढेही आयुष्यात अशीच प्रगती करावी अशा सगळेजण शुभेच्छा देत आहेत.

मनोरंजनविश्वातील अशाच नवनवीन बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईटला नक्की फॉलो करा. 

तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद !

Scroll to Top