(मिलिंद गवळी बायको) लोकप्रिय अभिनेते मिलिंद गवळी हे आपल्या अभिनयासाठी प्रसिद्ध आहेतच. त्यांचे असंख्य फॅन्सदेखील आहेत. त्यांची ही लोकप्रियता सोशल मीडियावरसुद्धा दिसून येते. ते नेहमी आपल्या कामासोबतच वैयक्तिक आयुष्याबद्दलही पोस्ट शेअर करत असतात.
आज त्यांच्या पत्नीचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केलीय. त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला त्यात त्यांच्या पत्नीचे आणि त्यांचे सोबतचे जुने फोटो आहेत. यासोबतच त्यांनी एक पोस्टसुद्धा लिहलीय आणि त्यात त्यांनी आपला आणि आपल्या पत्नीचा ऑडिशनचा किस्सा सांगितला आहे.
मिलिंद गवळी बायको
या पोस्टमध्ये त्यांनी लिहलंय की,
Happy Birthday दीपलक्ष्मी,
दिपा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा,
मला जर कोणी विचारलं की दीपाचा हा कितवा वाढदिवस आहे तर मी म्हणेन अठरावा,
कारण आजही तुझ्या मध्ये ती एनर्जी ऊर्जा
जी एका कॉलेजमधल्या तरुण मुलीमध्ये असते तीच आहे, म्हणूनच अजूनही मी 23 वर्षाचा आहे,
मला इतकी वर्ष काम करायची, मेहनत करायची जी एनर्जी मिळाली आहे ती तुझ्याकडूनच मिळाली आहे, माझ्या आयुष्याच्या खडतर प्रवासामध्ये तू कधीही तक्रार न करता, मला कायम सपोर्ट करत, माझी साथच देत आली आहेस, स्वतःच्या आशा, आकांक्षा, इच्छा, स्वप्न
सगळी सगळी बाजूला ठेवून माझी स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वतःला झोकून दिलं आहेस, स्वतःच्या आवडीनिवडी बाजूला ठेवून माझ्या आवडीनिवडीच जपत आली आहेस, खरंच तुझं कौतुक करावं तितकं कमी आहे, रोजच्या आपल्या धकाधकीच्या जीवनामध्ये शांतपणे बसून आपण एकमेकांना कधी मनातलं सांगत नाही, पण आज तुझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने तुझ्याबद्दल ल्यावसं वाटलं,
आपले काही जुने फोटोज post करावेसे वाटले,
मला माहितीये सोशल मीडियावर तुला personal गोष्टी टाकायला आवडत नाही, पण मला असं वाटतं कधीतरी, अशा छान दिवशी post करायला, photos टाकायला काही हरकत नाही,
खरंतर आज तुझा वाढदिवस आहे, खूप छान दिवस आहे, आज अक्षय तृतीया पण आहे, आज तुझ्या बद्दल एखादी पोस्ट मी करायला काहीच हरकत नाही, (मिलिंद गवळी बायको)
माझ्यासाठी तू आयुष्यामध्ये खूप sacrifices केले आहेस, Personal level वर तर केले आहेसच पण खूप कमी लोकांना ठाऊक असेल तुझा professional levelчu sacrifice.
आपलं नवीन लग्न झालं होतं आणि lodex ची Adfilm च्या Audition साठी मला बोलवण्यात आलं होतं, तुला मी माझ्याबरोबर Auditionला घेऊन गेलो होतो आणि तिथे तुला निवडण्यात आलं होतं आणि मला reject गेलो होतो. तू त्या एकमेव Adfilmमध्ये काम केलं होतंस,
पण तू माझ्यासाठी आणि आपल्या लेकी साठी आपल्या घरासाठी तुझं Career Sacrifice केलस,
नाहीतर आज नक्कीच तू माझ्यापेक्षा कित्येक पटीने यशस्वी आणि popular झाली असतीस.
तुला उदंड आयुष्य लाभो, तुझी सगळी स्वप्न अशा आकांक्षा पूर्ण होऊ देत हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
Happy Birthday Love
या शब्दात त्यांनी आपलं (मिलिंद गवळी बायको) पत्नीबद्दलचं प्रेम व्यक्त केलंय आणि तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी कमेंट्स करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
मनोरंजनविश्वातील अशाच नवनवीन बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईटला नक्की फॉलो करा.
तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद !