झी मराठीवर नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेचं नाव आहे ‘लाखात एक आमचा दादा’. मालिकेच्या नावावरून कळतंय की ही मालिका बहीण भावाच्या नात्यावर आधारित असेल.
एका इंस्टाग्राम पेजवर या मालिकेची पहिली झलक समोर आलीय. मालिकेचं एक पोस्टर दाखवण्यात आलं आहे. या पोस्टरमध्ये चार बहिणी आणि त्यांच्या खांद्यावर हात ठेवलेला भाऊ दिसत आहे. हे सगळे पाठमोरे उभे आहेत. त्या दादाला ‘आईची माया लावणारा’ असं म्हटलंय. चार बहिणी आणि त्यांना प्रेमाने सांभाळणारा भाऊ अशी या मालिकेची कथा असेल.
सुबोध भावेची नवीन मालिका कलर्स मराठीवर
झी मराठीवर नवीन मालिका
या मालिकेमध्ये कोणकोणते कलाकार असतील हे तर अजून सांगण्यात आलेलं नाही. पण लवकरच त्याबद्दल सर्व माहिती समोर येईलच. ही मालिका झी तमिळ वाहिनीवरील ‘अण्णा’ मालिकेचा रिमेक असणार आहे. तर ती मालिका झी तेलुगू वाहिनीवरील ‘मा अण्णाया’ मालिकेचा रिमेक होती.
स्टार प्रवाह आणि कलर्स मराठीवरही मागील काही दिवसांमध्ये अनेक नवीन मालिकांची घोषणा करण्यात आलीय. आता झी मराठीनेही नवीन मालिकांचा धडाका सुरू केलाय. काही दिवसांपूर्वी चॅनलवर ‘पारू‘ आणि ‘शिवा‘ या झी मराठीवर नवीन मालिका सुरू झाल्या. त्यानंतर ‘पुन्हा कर्तव्य आहे’, ‘नवरी मिळे हिटलरला’ या दोन मालिका सुरू करण्यात आल्या. नुकतीच ‘जगद्धात्री’ ही नवीन मालिका सुरू होणार असल्याचं सांगितलं गेलं आणि आता ‘लाखात एक आमचा दादा’ ही झी मराठीवर नवीन मालिका सुरू होणार आहे.
Zee Marathi New Serial Lakhat Ek Aamcha Dada
प्रेक्षकांचं प्रेम आणि टीआरपीमध्ये पुढे राहण्यासाठी झी मराठी एकामागे एक नवीन मालिका सुरू करतंय. पण आता या नवीन मालिकेला प्रेक्षकांचा किती प्रतिसाद मिळतो ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. या नवीन मालिकेत कोणते कलाकार असणार आणि ही मालिका कधी सुरू होणार हे सर्व लवकरच कळेल. पण या मालिकेबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता वाढायला लागली आहे.
मनोरंजनविश्वातील अशाच नवनवीन बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईटला नक्की फॉलो करा.
तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद !