ऋतुजा बागवे  मराठी इंडस्ट्री गाजवल्यानंतर आता हिंदीत एन्ट्री करायला तयार आहे.

नुकताच तिच्या 'माटी से बंधी डोर' या हिंदी मालिकेचा जबरदस्त प्रोमो समोर आलाय.

या मालिकेत तिची प्रमुख भूमिका असून ती वैजू या मराठी मुलीची भूमिका साकारणार आहे.

मालिकेच्या प्रोमोवरून कळतंय, ती मालिकेत शेतकरी घरातील तरुणीची भूमिका साकारतेय.

बैलाच्या पायाला लागतं म्हणून ती शेतात स्वतः नांगराने नांगरते.

ऋतुजा बागवेची हिंदी मालिका प्रोमो शेअर करत ऋतुजाने 'लवकरच' असं कॅप्शनमध्ये लिहलंय.

तिच्या या पोस्टवर फॅन्सनी आणि अनेक मराठी कलाकारांनी शुभेच्छा दिल्यात.

मालिकेत ऋतुजा बागवेसोबत अंकित गुप्ता मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

तुझ्यात जीव रंगला' मालिकेत बरकतच्या भूमिकेतील अमोल नाईकसुद्धा महत्वपूर्ण भूमिकेत

आपणही ऋतुजाला शुभेच्छा देऊयात.