अभिनेता सुबोध भावे लवकरच 'तू भेटशी नव्याने' ही नवीन मालिका घेऊन येतोय.

या मालिकेत त्याच्यासोबत अभिनेत्री शिवानी सोनारसुद्धा दिसणार आहे.

ती राजा राणीची गं जोडी, सिंधुताई माझी माई या मालिकांमुळे लोकप्रिय झालीय.

या मालिकेची कथा एका कॉलेजवर आधारित आहे.

अभिनेत्री शिवानी सोनार या मालिकेत कॉलेजची विद्यार्थिनी आहे. तर सुबोध भावे प्रोफेसर.

त्याच्या पात्राचं नाव अभिमन्यू सर आहे. तो कॉलेजमधील अतिशय कडक प्रोफेसर आहे.

सुबोधने त्याच कॉलेजमध्ये 25 वर्षांपूर्वी शिकणाऱ्या माहीचीसुद्धा भूमिका केलीय.

AI टेक्नॉलॉजीचा वापर करून किशोर वयातील सुबोधला दाखवण्यात आलंय.

या नवीन मालिकेची प्रेक्षक खूपच आतुरतेने वाट पाहत आहेत.

तर तुम्ही पाहणार का ही मालिका ?