थोडं तुझं आणि थोडं माझं या नवीन मालिकेचा प्रोमो शेअर करण्यात आलाय.
या मालिकेतून लोकप्रिय अभिनेत्री शिवानी सुर्वे टीव्हीवर पुनरागमन करतेय.
देवयानी मालिकेनंतर तब्बल 9 वर्षांनी पुन्हा एकदा नवीन मालिकेत ती दिसणार आहे.
प्रोमोवरून कळतंय की शिवानी या मालिकेत मानसी ही भूमिका साकारताना दिसणार आहे.
ती अत्यंत हुशार, प्रामाणिक आणि स्वाभिमानी मुलगी आहे. कॉलेजची ती स्कॉलर मुलगी आहे.
मानसी आपल्या कॉलेजच्या गायत्री मॅडमला आपलं आयडल मानते.
पण ही गायत्री मॅडम अतिशय स्वार्थी स्वभावाची आहे कोणीही जिंकलेलं तिला आवडत नाही.
आता मालिकेची कथा काय असेल आणि मुख्य अभिनेता कोण असेल याबद्दल माहिती नाही.
शिवानी सुर्वे पुन्हा एकदा मालिकेत दिसणार असल्यामुळे तिचे फॅन्स खूप खुश झाले आहेत.
तुझेच मी गीत गात आहे मालिका बंद होईल.