अभिनेत्री धनश्री भालेकर 'नवरी मिळे हिटलरला' या मालिकेत फाल्गुनी ही भूमिका साकारतेय.
याआधी ती 'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेत सुहानीची भूमिका साकारताना दिसली होती.
काही दिवसांपूर्वी अभिनेत्री धनश्री भालेकर चया आईचं दुःखद निधन झालं होतं.
आता तिने आईसोबतचे फोटो शेअर करत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केलीय.
आईच्या अस्थी विसर्जन करताना आलेला अनुभव तिने पोस्टमध्ये मांडलाय.
धनश्रीच्या आईने तिला नेहमीचं अभिनय क्षेत्रात करिअरसाठी प्रोत्साहन दिलं.
धनश्रीनेही आईला तिचं स्वप्न पूर्ण करण्याचं वचन दिलंय.
अभिनेत्री धनश्री भालेकर आईबद्दलचं प्रेम आणि मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.
तिच्या या पोस्टवर कमेंट्स करत अनेकांनी तिचं सांत्वन केलं आहे.
आपणही त्यांना श्रद्धांजली वाहूया.