ऋतुजा बागवेची हिंदी मालिका लोकप्रिय मराठी अभिनेत्री ऋतुजा बागवे ही मराठी इंडस्ट्री गाजवल्यानंतर आता हिंदी मनोरंजनविश्वात एन्ट्री करायला तयार आहे. नुकताच तिच्या ‘माटी से बंधी डोर’ या हिंदी मालिकेचा जबरदस्त प्रोमो समोर आलाय. स्टार प्लस चॅनलवर तिची ही मालिका येणार आहे. या मालिकेत तिची प्रमुख भूमिका असणार आहे. यात ती वैजू या मराठी मुलीची भूमिका साकारणार आहे.
ऋतुजा बागवेची हिंदी मालिका
मालिकेच्या प्रोमोवरून कळतंय की ती या मालिकेत शेतकरी घरातील तरुणीची भूमिका साकारतेय. बैलाच्या पायाला लागतं म्हणून ती शेतात स्वतः नांगराने नांगरते. तिला एक मुलगा लग्नासाठी बघायला येणार असतो म्हणून आई तिला बोलवायला तिथे येते आणि म्हणते तुला बघायला मुलगा येतोय. आधीच तुला 17 मुलं नाकारून गेलेत. वैजू म्हणते त्या 17 लोकांच्या नशिबात मी नव्हते. इतक्यात तोच मुलगा एका माणसासह तिथे येतो आणि कदम कुठे राहतात ते विचारतो ? तिची आई सांगते हाच तो मुलगा आहे जो तुला बघण्यासाठी येणार होता. तो माणूससुद्धा त्या मुलाला हीच मुलगी असल्याचं सांगतो. लगेच तो मुलगा वैजूला पाहतो आणि नकार देऊन निघून जातो.
ऋतुजा बागवेची हिंदी मालिका प्रोमो शेअर करत ऋतुजाने ‘लवकरच’ असं कॅप्शनमध्ये लिहलंय. तिच्या या पोस्टवर फॅन्सनी आणि अनेक मराठी कलाकारांनी कमेंट्स करत ऋतुजाला या नवीन हिंदी मालिकेसाठी आणि पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.
Rutuja Bagwe Hindi Serial
‘माटी से बंधी डोर’ मालिकेत ऋतुजा बागवेसोबत अंकित गुप्ता मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेत बरकतच्या भूमिकेत दिसलेला अभिनेता अमोल नाईकसुद्धा महत्वपूर्ण भूमिकेत दिसेल.
सुबोध भावेची नवी मालिका कलर्स मराठीवर
आणखी दुसरे कोणकोणते कलाकार मालिकेत असतील हे आपल्याला लवकरच कळेल. मालिका कधी सुरू होणार तेसुद्धा लवकर समोर येईल. पण ऋतुजाचे फॅन्स तिच्या या हिंदी मालिकेची आतुरतेने वाट पाहताय.
मनोरंजनविश्वातील अशाच नवनवीन बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईटला नक्की फॉलो करा.
तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद !