Shivani Surve New Serial स्टार प्रवाहच्या इंस्टाग्रामवर मागील काही दिवसांपासून ‘एक लोकप्रिय अभिनेत्री परत येतेय’ अशा पोस्ट शेअर करण्यात येत होत्या त्यामुळे प्रेक्षकांना प्रश्न पडला होता की कोणती अभिनेत्री परत येणार आहे ? सर्वांनी आपले अंदाजदेखील लावले होते पण आज सकाळी बरोबर 7 वाजता इंस्टाग्रामवर ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ या नवीन मालिकेचा प्रोमो शेअर करण्यात आला आणि या मालिकेतून लोकप्रिय अभिनेत्री शिवानी सुर्वे टीव्हीवर पुनरागमन करतेय.
शिवानी सुर्वे ‘देवयानी’ मालिकेनंतर तब्बल 9 वर्षांनी पुन्हा एकदा नवीन मालिकेत (Shivani Surve New Serial) दिसणार आहे. ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ हे तिच्या नवीन मालिकेचं नाव आहे.
Shivani Surve New Serial
प्रोमोवरून कळतंय की शिवानी या मालिकेत मानसी ही भूमिका साकारताना दिसणार आहे. ती अत्यंत हुशार, प्रामाणिक आणि स्वाभिमानी मुलगी आहे. आपल्या कॉलेजची ती स्कॉलर मुलगी आहे.
मानसी आपल्या कॉलेजच्या गायत्री मॅडमला आपलं आयडल मानते. ती गायत्री मॅडमपासून खूप प्रभावित आहे. पण ही गायत्री मॅडम अतिशय स्वार्थी स्वभावाची आहे आणि तिला आपल्यासमोर कोणीही जिंकलेलं आवडत नाही. तिला हरलेले चेहरे पाहायला आवडतात.
कॉलेजच्या वार्षिक पारितोषिक वितरण सोहळ्यात या दोघींमध्ये वाद होतो. गायत्री या सोहळ्यात आपलं रेकॉर्ड मोडण्यासाठी मानसीला शेवटचा टास्क देते आणि ती तो टास्क पूर्ण करत गायत्रीचा रेकॉर्ड मोडते त्यामुळे गायत्रीचा अहंकार मोडतो यामुळे ती खूप चिडते. ती मानसीला ट्रॉफी देते आणि आयुष्यात पुन्हा माझ्यासमोर येऊ नकोस असं सांगते.
Thoda Tujha Thoda Majha Star Pravah Serial
आता या मालिकेची कथा काय असेल आणि मालिकेत मुख्य अभिनेता कोण असेल याबद्दल माहिती देण्यात आलेली नाही. पुढील काही दिवसांमध्ये ही माहिती समोर येईलच.
‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ ही मालिका (Shivani Surve New Serial) येत्या 17 जूनपासून सोमवार ते शुक्रवार रात्री 9 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर दाखवण्यात येणार आहे. याचा अर्थ ‘तुझेच मी गीत गात आहे‘ मालिका लवकरच बंद होणार आहे.
या मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय आणि अभिनेत्री शिवानी सुर्वे पुन्हा एकदा मालिकेत दिसणार असल्यामुळे तिचे फॅन्स खूप खुश झाले आहेत. फॅन्सनी तिला या नवीन मालिकेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. सर्वजण तिच्या या नवीन मालिकेची आतुरतेने वाट पाहताय. शिवानीच्या ‘देवयानी’ मालिकेला प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळालं होतं आता तिच्या या नवीन मालिकेला प्रेक्षकांचं किती प्रेम मिळतं हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
मनोरंजनविश्वातील अशाच नवनवीन बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईटला नक्की फॉलो करा.
तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद !