या 5 बँका देताय फिक्सड डिपॉझिटवर सर्वाधिक व्याज

फिक्सड डिपॉझिटवर सर्वाधिक व्याज

फिक्सड डिपॉझिटवर सर्वाधिक व्याज अनेकांजवळ पैसे तर असतात, परंतु हे पैसे गुंतवायचे कोठे हा त्यांच्यासमोर सर्वात मोठा प्रश्न असतो. अशावेळेस शेअर मार्केट, म्युच्युअल फंड आणि बँकांमधील एफडी असे अनेक पर्याय समोर उपलब्ध असतात. परंतु कोणता पर्याय निवडावा, याबद्दल खूप कन्फ्युजन असतं.

फिक्सड डिपॉझिटवर सर्वाधिक व्याज

जे लोक रिस्क घेऊ शकतात आणि त्यांना हाय रिटर्न हवा आहे त्यांच्यासाठी शेअर बाजार आणि म्युच्युअल फंड हा चांगला पर्याय आहे. परंतु ज्या लोकांना रिस्क घ्यायची नाहीये आणि रिटर्न थोडाफार कमी मिळाला तरी चालेल, अशा लोकांसाठी मात्र बँकांमधील एफडी सर्वात उत्तम पर्याय आहे.

म्हणूनचं आज आम्ही तुमच्यासाठी अशा पाच बँकांची लिस्ट घेऊन आलो आहोत, जे FD म्हणजेचं फिक्सड डिपॉझिटवर सर्वाधिक व्याज देत आहेत. मग कोणत्या आहेत त्या बँका, आपण त्याबद्दल सर्वात आधी जाणून घेऊया.

1) युनिटी स्मॉल फायनान्स बँक : ही बँक एफडीवर सर्वाधिक व्याज देत आहे. 1001 दिवसांच्या एफडीवर तब्बल नऊ टक्के व्याजदर देणारी ही पहिलीचं बँक आहे. तुम्हालाही फिक्स डिपॉझिटमध्ये पैसे गुंतवून जास्त व्याज कमवायचं असेल, तर हा तुमच्यासाठी एक चांगला ऑप्शन ठरू शकतो.

2) सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक : ही बँक दोन वर्षांच्या एफडीवर तब्बल 8.65% व्याजदर ऑफर करते. म्हणजे दोन वर्ष तुम्ही पैसे गुंतवल्यावर  चांगलं व्याज कमवू शकता.

3) उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक : ही बँक 15 महिन्यांच्या एफडीवर तब्बल 8.5 टक्के व्याजदर ऑफर करत आहे. ज्यांना एफडीमध्ये पैसे गुंतवून चांगला रिटर्न मिळवायचा आहे, त्यांच्यासाठी हा चांगला ऑप्शन आहे.

4) जन स्मॉल फायनान्स बँक : या बँकेत जर तुम्ही 365 दिवस म्हणजे एक वर्षांची एफडी केली, तर तुम्हाला 8.5% व्याजदर मिळतं.

5) इक्विटास स्मॉल फायनान्स बँक : ही बँक 444 दिवसांच्या एफडीवर 8.5% व्याजदर ऑफर करत आहे.

Highest Interest Rate On Fixed Deposit
Highest Interest Rate On Fixed Deposit

म्हणजे एकूणचं बाजारात अनेक गुंतवणुकीचे पर्याय आहेत. (फिक्सड डिपॉझिटवर सर्वाधिक व्याज) मग तुम्हाला कुठे पैसे गुंतवायचे, हा संपूर्णपणे तुमचा निर्णय असायला हवा. कोणत्याही गुंतवणूक पर्यायचा सखोल अभ्यास केल्यानंतरचं तेथे पैसे गुंतवणूक उत्तम असतं.

महाबँक युवा योजनेबद्दल संपूर्ण माहिती

तर तुम्ही पैसे गुंतवण्यासाठी कोणत्या पर्यायावर भर देतात ? शेअर मार्केट, म्युच्युअल फंड की बँक एफडी ? नक्कीचं कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.

खूप खूप धन्यवाद !

Scroll to Top