RTGS Full Form बँकेच्या या फायदेशीर योजनेबद्दल माहितेय का ?

RTGS Full Form 

मित्रांनो आज आपण RTGS Full Form आणि RTGS बद्दल महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत.

RTGS Full Form 

RTGS Full Form आहे Real Time Gross Settlement.

RTGS म्हणजे काय ?

RTGS च्या माध्यमातून आपण एका बँक अकाऊंटमधून दुसऱ्या बँक अकाऊंटला पैसे ट्रान्सफर करू शकतो. या माध्यमातून फक्त मोठ्या रकमाच पाठवल्या जातात. RTGS ही पैसे ट्रान्सफर करण्यासाठी खूपच फास्ट आणि सुरक्षित सर्व्हिस आहे.

RTGS सर्व्हिसमध्ये तुमची पैसे ट्रान्सफर करण्याची ऑर्डर गेली की तुमची एकट्याची ऑर्डर लगेच प्रोसेस केली जाते आणि पैसेसुद्धा लगेच ट्रान्सफर केले जातात. याउलट NEFT मध्ये बॅचेसमध्ये ट्रांझेक्शन केले जातात आणि त्यासाठी वेळही लागतो.

RTGS च्या माध्यमातून 2 लाख रुपयेच्यावरच पैसे ट्रान्सफर करू शकता. यापेक्षा कमी पैसे NEFT च्या माध्यमातून पाठवू शकता. RTGS सर्व्हिस बँकेच्या प्रत्येक ब्रांचला उपलब्ध नसते त्यामुळे तुम्ही रिजर्व बँकेच्या वेबसाईटवर RTGS सर्व्हिस कोणत्या ब्रांचला उपलब्ध आहे ते चेक करू शकता.

RTGS म्हणजे काय
RTGS म्हणजे काय

RTGS ने पैसे कसे पाठवायचे :

RTGS द्वारे पैसे पाठवण्यासाठी तुम्हाला खालीलप्रमाणे प्रोसेस करावी लागेल :

1. सर्वात आधी तुम्हाला तुमच्या बँकेला कॉन्टॅक्ट करून इंटरनेट बँकिंगची सुविधा सुरू करून घ्यावी लागेल.

2. त्यानंतर बँकेच्या ऑनलाईन वेब पोर्टलला जाऊन तुम्हाला दिलेल्या लॉगिन ID आणि पासवर्डने लॉगिन करा.

3. तुमच्या प्रोफाईलला जाऊन beneficiary हा ऑप्शन सिलेक्ट करा.

4. त्यानंतर RTGS हा ऑप्शन सिलेक्ट करा. मग Add beneficiary सिलेक्ट करून beneficiary चं नाव, पत्ता, बँक अकाऊंट नंबर आणि IFSC कोड या डिटेल्स भरा.

5. Confirm करून Accept terms and service बटनवर क्लिक करा.

6. तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर सिक्युरिटी पासवर्ड येईल तो तिथे टाकायचा आहे.

7. त्यानंतर काही वेळाने beneficiary चं अकाऊंट activate होईल आणि हे अकाऊंट activate होताच तुम्ही पैसे ट्रान्सफर करू शकता.

8. मग Payments/ Transfers या टॅबमध्ये inter bank transfer या लिंकवर क्लिक करा

9. त्यानंतर RTGS हा ऑप्शन निवडा. रक्कम टाका आणि beneficiary सिलेक्ट करा आणि Accept terms and service confirm करून पैसे ट्रान्सफर करा.

SBI बँकेचा शेअर

RTGS ने पैसे पाठवण्यासाठी काय काय लागतं:

RTGS ने पैसे पाठवण्यासाठी आपल्याला बँकेला काही माहिती द्यावी लागते.

1. किती रक्कम पाठवायची त्याचे डिटेल्स

2. ज्या बँक अकाऊंटमधून रक्कम काढायची त्याचे डिटेल्स

3. RTGS Full Form Beneficiary चं नाव

4. Beneficiary च्या बँक आणि ब्रांचचं नाव

5. Beneficiary चा बँक अकाऊंट नंबर

6. बँकेचा IFSC कोड

7. पैसे पाठवणाऱ्याची आणि घेणाऱ्याची अन्य काही माहिती.

RTGS ने पैसे पाठवण्यासाठी चार्जेस काय असतात :

RTGS ने पैसे ट्रान्सफर करण्यासाठी खालीलप्रमाणे चार्जेस घेतात :

इंटर बँक मनी ट्रान्सफर सर्व्हिससाठी थोडी फी द्यावी लागते आणि RTGS सर्व्हिस सुरू करण्यासाठीही काही चार्ज भरावा लागतो.

1.  2 लाखांपासून ते 5 लाख रुपयांपर्यंत पैसे ट्रान्सफर करण्यासाठी –
           बँकेच्या ब्रांचमध्ये 25 रुपये घेतात आणि
           इंटरनेट बँकिंगद्वारे व्यवहार केल्यास 5 रुपये + टॅक्स

2.  5 लाख रुपयांपासून पुढे पैसे ट्रान्सफर करण्यासाठी-
          बँकेच्या ब्रांचमध्ये 50 रुपये आणि
          इंटरनेट बँकिंगद्वारे व्यवहार केल्यास 10 रुपये + चार्जेस

RTGS ने पैसे पाठवण्याचे फायदे :

1. (RTGS Full Form) RTGS मुळे आपण ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करू शकतो त्यामुळे पैसे चोरी जाण्याचा संभव नसतो.

2. आधी जास्त पैशांची रक्कम ऑनलाईन पाठवण्यासाठी डिमांड ड्राफ्टचा वापर केला जायचा पण त्यासाठी खूपच वेळ लागायचा.
पण आता RTGS च्या माध्यमातून काही मिनिटात पैसे ट्रान्सफर होतात त्यामुळे वेळेची बचत होते.

3. RTGS च्या माध्यमाने कोणत्याही कागदपत्रांशिवाय जास्त रक्कम सोप्या पद्धतीने पाठवता येते.

4. RTGS Full Form मुळे बिझनेस करण्यासाठी खूप फायदा होतो. तुम्ही बायरला वस्तू पाठवल्यानंतर तो लगेच तुम्हाला RTGS च्या माध्यमातून लगेच पैसे पाठवू शकतो.

5. मोठी रक्कम ट्रान्सफर करता येत असल्यामुळे बिझनेस चालवण्यासाठी भांडवल जमवता येते आणि बिझनेस चालवण्यासाठी त्याचा फायदा होतो.

6. RTGS मुळे काऊंटर पार्टी डिफॉल्टचे चान्सेस कमी होतात.

RTGS (RTGS Full Form) सर्व्हिसद्वारे जर पैसे ट्रान्सफर झाले नाहीत तर बँक तुम्हाला त्याबद्दल माहिती देते आणि डेबिट झालेले पैसे तुमच्या बँक अकाऊंटला परत जमा करते.

RTGS पेमेंट सर्व्हिसमुळे मोठ्या रकमा अगदी त्वरित आणि सुरक्षितपणे पाठवणे खूप सोपं झालं आहे. बँकिंग व्यवस्थेमध्ये होणारा हा टेक्नॉलॉजीचा वापर सामान्य माणसाच्या खूपच उपयोगी पडतोय.

मित्रांनो तुम्हाला हा आर्टिकल आवडला असेल तर आमचे दुसरे आर्टिकल सुद्धा नक्की वाचा. 

खूप खूप धन्यवाद !

Scroll to Top