Portable Neck Fan किचनमध्ये घामाघूम होऊन स्वयंपाक बनवणाऱ्या बायकोला गिफ्ट करा

Portable Neck Fan

Portable Neck Fan या वाढत्या उन्हाचं काय करावं, हा प्रश्न सगळ्यांनाचं पडलाय. मग जास्तीत जास्त फॅन, कूलर किंवा एसीच्या सानिध्यात राहणं अनेक जण पसंत करत आहेत. परंतु आपल्या घरातील माता-भगिनींचं काय, ज्या किचनमध्ये आपल्यासाठी स्वादिष्ट जेवण बनवतात. परंतु किचनमध्ये काम करत असताना त्यांना उष्णतेचा सामना करावा लागतो.

शक्यतो किचनमध्ये कोणीही एसी, फॅन किंवा कुलर बसवत नाही. त्यामुळे स्त्रियांना किचनमध्ये काम करताना कोणतीही कुलिंग मिळत नाही आणि त्या घामाघुम होतात.

Portable Neck Fan

घरातील स्त्रियांना असं घामाघुन पाहून तुम्हालाही त्यांची दया आली असेल, तर आम्ही तुमच्यासाठी आज अशा एका नवीन वस्तूबद्दल माहिती घेऊन आलो आहोत, जे किचनमध्ये काम करत असताना स्त्रियांना अगदी एसीसारखी हवा देईल.

आम्ही बोलतोय (Portable Neck Fan) पोर्टेबल नेक फॅनबद्दल. आता तुम्ही म्हणाल हे नेमकं काय आहे ? आम्ही नेक बँडबद्दल ऐकलंय. मग हे नेक फॅन काय आहे ? आता या नावातच सगळं दडलंय. हा पोर्टेबल फॅन आहे, ज्याला कोणताही इलेक्ट्रिसिटी सप्लाय द्यायची गरज नाहीये. बॅटरीच्या साह्याने तुम्ही त्याला पावर देऊ शकता आणि गर्मीला दूर पळवू शकता.

Portable Neck Fan
Portable Neck Fan

या पोर्टेबल नेक फॅनमध्ये एसीसारखे व्हेंट असतात. त्यातून थंड हवा बाहेर पडते. या पोर्टेबल नेक फॅनमध्ये अनेक फीचर्स असतात. स्पीड कमी किंवा जास्तही करता येतो. म्हणजे तुम्हाला जेवढं गरम होत असेल, त्यानुसार तुम्ही ही हवा ऍडजेस्ट करू शकतात.

एसीमध्ये १ टन, २ टन काय असतं माहितेय का ?

बायकोला गिफ्ट द्या पोर्टबल नेक फॅन

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, यामध्ये बॅटरी किती मोठी असते ? सध्या मार्केटमध्ये जे प्रॉडक्ट उपलब्ध आहेत, त्यामध्ये 2000 mah ते 4000 mah पर्यंतची बॅटरी उपलब्ध आहे. म्हणजे तुम्ही किचनमध्ये चार ते सहा तास काम करत असाल, तर हे प्रॉडक्ट तुमच्यासाठी खूप उपयोगी आहे.

परंतु सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे या पोर्टेबल नेक फॅनची (Portable Neck Fan) किंमत किती आहे ? तर ॲमेझॉन, फ्लिपकार्ट किंवा मीशोवरून तुम्हाला हा पोर्टेबल नेक फॅन ऑर्डर करता येईल. 300 रुपयापासून ते 1000 रुपये पर्यंत तुम्हाला चांगले पोर्टेबल नेक फॅन भेटू शकतात.

जर तुम्ही पुरुष असाल आणि तुम्ही तुमच्या पत्नीला हा पोर्टेबल फॅन गिफ्ट केला, तर तुम्हाला या उन्हाळ्यातसुद्धा शितल अनुभव येतील, एवढं मात्र नक्की.

तर तुम्ही घेणार का हा (Portable Neck Fan) पोर्टेबल नेक फॅन. नक्कीचं कमेंट करुन सांगा आणि अशाचं नवीन नवीन माहितीसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.

खूप खूप धन्यवाद ! 

Scroll to Top