Car Brake Fail गाडीचे ब्रेक फेल झाल्यावर जीव कसा वाचवायचा ?

Car Brake Fail

Car Brake Fail आजपर्यंत तुम्ही अनेक चित्रपट किंवा मालिकांमध्ये पाहिलं असेल की, खलनायक नायक किंवा नायिकेच्या गाडीचे ब्रेक फेल करतो आणि त्यानंतर त्यांचा अपघात होतो. गाडी भरवेगात असते आणि अशावेळेस गाडीचे ब्रेक फेल झाले तर ती थांबवणे शक्य होत नाही आणि मोठा अपघात होतो.

परंतु खऱ्या आयुष्यात मात्र गाडीचे ब्रेक फेल झाल्यावर अपघात होईलचं असं नाहीये. तुम्ही जर प्रसंगावधान राखलं, तर मोठा अपघात टळू शकतो. अनेकांचा जीव वाचू शकतो. मग गाडीचा ब्रेक फेल (Car Brake Fail) झाल्यावर नेमकं करायचं ? तर आज आपण त्याबद्दल जाणून घेऊया.

Car Brake Fail

समजा तुम्ही गाडी चालवताय, गाडी ही भरधाव वेगात आहे आणि तुम्ही ब्रेक दाबण्याचा प्रयत्न केला तेव्हा तुमच्या लक्षात आलं की, गाडीचे ब्रेक फेल (Car Brake Fail) झाले आहेत. मग अशावेळेस काय करायचं ? तर सर्वात आधी तर घाबरून जाऊ नका. तुम्ही गाडी थांबवू शकता. अजूनही काही बिघडलेलं नाहीये, असा मनात विश्वास ठेवा.

Car Brake Fail
Car Brake Fail

तुमचा गाडीचा ब्रेक जरी फेल झाला असला तरी, तुमच्याकडे हँड ब्रेक आहे. ह्या हॅन्ड ब्रेकचा वापर करून तुम्ही गाडीचा स्पीड कमी करू शकता. परंतु चित्रपटांमध्ये दाखवल्याप्रमाणे हँड ब्रेक संपूर्ण वापरायचा नाहीये. नाहीतर गाडीची चाकं लॉक होऊन गाडी पलटी होऊ शकते.

गाडीचे ब्रेक फेल झाल्यावर काय करायचं ?

तुम्हाला हळूहळू हा हॅन्ड ब्रेक अप्लाय करायचा आहे. ज्यामुळे गाडीचा वेग कमी होईल. त्याचबरोबर तुम्हाला गाडी ज्या गिअरमध्ये आहे, त्यापेक्षा ती खालच्या गिअरमध्ये आणावी लागेल. त्यामुळे गाडीचा वेग कमी होण्यास मदत होईल.

जर तुमच्याकडे एवढा जास्त वेळ नसेल, त्यावेळेस अशी एखादी तरी वस्तू, जागा पहा, ज्यावर तुम्हाला गाडी धडकवता येईल आणि कमीत कमी नुकसान होईल. अनेकवेळेस एखादा मातीचा ढिगारा, वाळू यावर चढवून गाडीचा स्पीड कमी होऊ शकतो.

बजाजने लॉन्च केली आजपर्यंतची सर्वात धमाकेदार पल्सर

अशा आपत्कालीन परिस्थितीत ड्रायव्हरने संयम ठेवणं हे खूप महत्त्वाचं असतं. नाहीतर मोठी हानी होऊ शकते. अनेक लोक घाबरून गाडीचं इंजिन सुद्धा बंद करतात. असं झालं तर गाडीचे सर्व कंट्रोल तुमच्या हातून निघून जातील आणि मग ब्रेक दाबण्याचं किंवा गिअर दाबण्याचाही काही फायदा होणार नाही आणि मोठा अपघात होईल.

तर तुम्हाला काय वाटतं याबद्दल नक्कीचं कमेंट करुन सांगा आणि अशाचं नवीन नवीन माहितीसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.

खूप खूप धन्यवाद !

Scroll to Top