शुभविवाह मालिका मध्ये भूमीची सवत बनून येणार ही अतिशय सुंदर अभिनेत्री

शुभविवाह मालिका

शुभविवाह मालिका सध्या प्रेक्षकांना खूपच आवडतेय. या मालिकेत अभिनेता यशोमन आपटे आणि अभिनेत्री मधुरा देशपांडे हे दोघे मुख्य भूमिकेत आहेत. आकाश आणि भूमीची ही प्रेमकहाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलीय. सध्या ही मालिका खूपच उत्कंठावर्धक बनली आहे.

या मालिकेच्या फॅन्ससाठी आणखी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. आता या मालिकेत एका लोकप्रिय अभिनेत्रीची एन्ट्री होणार आहे. ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेतील अभिनेत्री सई कल्याणकर ही लवकरच आपल्याला ‘शुभविवाह’ मालिकेत एका महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. ती या मालिकेत आकाशची मैत्रीण वेदांगीच्या भूमिकेत दिसेल.

शुभविवाह मालिका
शुभविवाह मालिका

शुभविवाह मालिका  

शुभविवाह मालिका चा प्रोमो इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये अभिनेत्री सई कल्याणकरची आकाशच्या घरी एन्ट्री दाखवण्यात आलीय. तिची आणि आकाशची लहानपणापासूनची मैत्री दाखवण्यात आलीय आणि घरातले सगळेसुद्धा तिला खूप चांगलं ओळखतात.

शुभविवाह मालिका
शुभविवाह मालिका

अभिनेत्री सई कल्याणकर हिने नाटक, मालिका आणि चित्रपट या तिन्ही माध्यमात काम केलंय. तिने तुझे नि माझे घर श्रीमंताचे, दख्खनचा राजा ज्योतिबा, बाप्पा मोरया, भेटी लागी जिवा, फ्रेशर्स, ठिपक्यांची रांगोळी या मालिकांमध्येही काम केलंय.

अभिनेत्री सई कल्याणकर  

यासोबतच सई अभिनेता अंकुश चौधरीसोबत ‘झक्कास’ चित्रपटात दिसली होती. तिने ‘आम्ही पाचपुते’ या नाटकात महत्वपूर्ण भूमिका साकारलीय.

हसताय ना, हसायलाचं पाहिजे कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेत्याची बायको

नुकतीच अभिनेत्री सई कल्याणकर आपल्याला सोनी मराठीवरील ‘अबोल प्रीतीची अजब कहाणी’ या मालिकेत जोजोच्या भूमिकेत दिसली होती. या मालिकेत तिची एन्ट्री खूपच जबरदस्त होती आणि तिची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली होती. तिने ‘ठिपक्यांची रांगोळी‘ मालिकेत मानसी कानिटकर ही भूमिका साकारली होती.

आता सई वेदांगीच्या भूमिकेतून ‘शुभविवाह मालिका मध्ये एन्ट्री केल्यानंतर आकाश आणि भूमीच्या नात्यावर त्याचा काय परिणाम होतो हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. आता यापुढेही मालिकेत अनेक ट्विस्ट येणार आहेत त्यामुळे मालिका पाहण्यात आणखीन मजा येईल.

मनोरंजनविश्वातील अशाच नवनवीन बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईटला नक्की फॉलो करा. 

तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद !

Scroll to Top