एटीएममधून फाटक्या नोटा आल्या तर त्या कुठे बदलायच्या

एटीएममधून फाटक्या नोटा

एटीएममधून फाटक्या नोटा मित्रांनो अनेकदा तुम्हाला अनुभव आला असेल की पूर्वी एटीएममधून पैसे काढायला गेल्यावर एकदम कोऱ्या करकरीत नोटा निघायच्या पण आजकाल एटीएममधून अनेकदा जुन्या, खूप वापरलेल्या आणि कधीकधी तर फाटलेल्या नोटासुद्धा निघतात.

अशावेळी आपण खूप टेन्शनमध्ये येतो कारण एटीएममधून निघालेल्या नोटा आपण परत एटीएममधेही टाकू शकत नाही आणि मार्केटमध्ये खर्च करायला गेल्यावर व्यापारीही त्या घ्यायला सरळ नकार देतात.

एटीएममधून फाटक्या नोटा

सगळ्यात शेवटी मग या नोटांचं काय करायचं हा प्रश्न प्रत्येकालाच पडतो त्यामुळे आज आम्ही याच विषयावर तुम्हाला माहिती देणार आहोत की एटीएममधून फाटक्या नोटा आल्या तर त्या कुठे बदलायच्या ?

एटीएममधून फाटक्या नोटा बदलण्यासाठी काय नियम आहेत :

आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ATM मधून निघणाऱ्या फाटलेल्या नोटा बदलण्यासाठी काही नियम बनवले आहेत.

या नियमांनुसार एटीएममधून खराब फाटलेल्या नोटा बाहेर आल्या त्याची पूर्णपणे जवाबदारी ही बँकेची आहे.

तुम्ही बँकेत जाऊन या फाटलेल्या नोटा बदलून घेऊ शकता. बँक नोटा बदलून देण्यासाठी तुम्हाला नाही म्हणू शकत नाही आणि यासाठी तुम्हाला कोणताही चार्ज लागणार नाही.

एटीएममधून फाटक्या नोटा
एटीएममधून फाटक्या नोटा

खराब नोटेवर जर सिरीयल नंबर, महात्मा गांधींचा वॉटर मार्क आणि गव्हर्नरची शपथ दिसली नाही तर बँकेला ती नोट बदलून द्यावीच लागेल.

एटीएममधून बाहेर येणाऱ्या नोटेमध्ये काहीही दोष असल्यास बँक कर्मचाऱ्याकडून त्याची चौकशी केली गेली पाहिजे.

रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार एक व्यक्ती एकावेळी जास्तीत जास्त 20 नोटा बदलू शकतात आणि त्या नोटांची एकूण किंमत 5000 रुपये असायला हवी.

एटीएममधून फाटक्या नोटा बँकेत जाऊन बदलण्याची प्रक्रिया :

ज्या बँकेच्या एटीएममधून फाटलेल्या नोटा बाहेर आल्या त्याच बँकेत तुम्हाला नोटा बदलण्यासाठी जावं लागेल.

नोटा बदलण्यासाठी तुम्हाला बँकेत एक अर्ज लिहून द्याव लागेल त्यात तुम्हाला पैसे काढल्याची तारीख, वेळ आणि ठिकाणची माहिती द्यावी लागेल.

एटीएममधून फाटक्या नोटा
एटीएममधून फाटक्या नोटा

या अर्जासोबत एटीएममधून पैसे काढताना मिळालेली ट्रांझेक्शन स्लिप जोडावी लागेल आणि ही स्लिप नसेल तर पैसे काढल्यानंतर तुमच्या मोबाईलवर जो मेसेज आला असेल त्याच्या डिटेल्स द्याव्या लागतील.

यानंतरच बँक तुम्हाला तुमच्या नोटा बदलून देईल.

एटीएममधून कोणत्या फाटक्या नोटा बदलू शकत नाही ?

तुम्ही बँकेत जळालेल्या किंवा खूपच जास्त फाटलेल्या नोटा बदलून घेऊ शकत नाही.

या नोटा रिझर्व्ह बँकेच्या इशू ऑफिसमध्ये जमा कराव्या लागतील.

पोस्टाचं बचत खातं कसं उघडायचं ?

सामान्य नागरिक अतिशय कष्टाने घाम गाळून पैसे कमावतात त्यामुळे त्यांच्या कष्टाच्या कमाईचं नुकसान होऊ नये यासाठी रिझर्व्ह बँकेने आणलेले हे नियम खूपच चांगले आहेत. यामुळे सामान्य माणसाला खूप फायदा होईल.

मित्रांनो तुम्हाला हा आर्टिकल उपयोगी वाटला असेल तर आमचे दुसरे आर्टिकलसुद्धा नक्कीच वाचा.

खूप खूप धन्यवाद !

Scroll to Top