IMEI Number Full Form मित्रांनो आज आपण IMEI Number चा full form आणि IMEI Number म्हणजे काय ते जाणून घेणार आहोत.
IMEI Number Full Form
IMEI Number Full Form आहे International Mobile Equipment Identity.
IMEI नंबर हा 15 ते 17 अंकांचा नंबर असतो जो आपल्या प्रत्येकाच्या मोबाईलच्या आयडेंटिफिकेशनसाठी दिलेला असतो आणि प्रत्येकाच्या मोबाईलचा IMEI नंबर हा वेगळा असतो.
हा कोड प्रत्येक मोबाईलच्या बॅटरीवर खालच्या बाजूला छापलेला असतो.
आपल्या प्रत्येकाच्या मोबाईलच्या आयडेंटिफिकेशनसाठी हा नंबर दिलेला असतो. जर आपला मोबाईल चोरीला गेला किंवा हरवला तर या IMEI नंबरच्या साहाय्याने आपण आपल्या मोबाईलचा शोध लावू शकतो.
IMEI नंबरच्या साहाय्याने आपल्या हरवलेल्या मोबाईलची लोकेशन सुद्धा शोधता येते.
आपल्या मोबाईलचा IMEI नंबर कसा शोधायचा :
IMEI नंबर आपल्या मोबाईलच्या बॅटरीवर खालील बाजूस छापलेला असतो.
त्याचबरोबर आपण जर आपल्या मोबाईलच्या कीपॅडवर *#06# हा नंबर डायल केला तर आपल्या मोबाईलचा IMEI नंबर समोर येतो.
दुसरी पद्धत म्हणजे तुम्ही तुमच्या मोबाईलच्या सेटिंगमध्ये जाऊन About phone वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला मोबाईलच्या model and hardware सोबतच IMEI नंबरबद्दल सर्व माहिती मिळते.
IMEI नंबर काय काय दर्शवतो :
IMEI नंबरमध्ये Model name, System serial number आणि source दिसतो.
IMEI नंबरमध्ये आपल्या मोबाईलच्या कंपनी आणि मॉडेलबद्दलसुद्धा माहिती असते.
IMEI नंबरवरून आपला चोरी झालेला मोबाईल कसा शोधला जातो :
IMEI नंबरच्या साहाय्याने आपल्या मोबाईलची लोकेशन शोधता येते.
मोबाईल फोन हरवल्यास काय करायचं ?
जर आपला मोबाईल हरवला किंवा चोरीला गेला तर सर्वात आधी आपण मोबाईल नेटवर्क कंपनीला आपल्या मोबाईलचा IMEI नंबर द्यायचा आणि आपल्या सिमकार्डची सर्व्हिस बंद करायला लावायची म्हणजे आपल्या मोबाईलचा गैरवापर कोणीही करू शकणार नाही.
त्यानंतर पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर पोलीस IMEI नंबरच्या साहाय्याने मोबाईलची लोकेशन शोधून काढतात. अशाप्रकारे IMEI नंबरच्या मदतीने आपल्या मोबाईलचा शोध लावला जातो.
मोबाईलचा IMEI नंबर खूपच महत्वाचा असतो त्यामुळे प्रत्येकाने तो माहीत करणं खूप गरजेचं आहे.
मित्रांनो तुम्हाला हा आर्टिकल उपयोगी वाटला असेल तर आमचे दुसरे आर्टिकलसुद्धा नक्की वाचा.
खूप खूप धन्यवाद !