White Egg Vs Brown Egg : पांढरं की ब्राऊन आरोग्यासाठी कोणतं अंडं चांगलं

White Egg Vs Brown Egg

White Egg Vs Brown Egg चांगल्या आरोग्यासाठी अंडी खाण्याचा सल्ला डॉक्टर नेहमीचं देत असतात. परंतु आता मार्केटमध्ये फक्त पांढऱ्या रंगाचचं नाही, तर ब्राऊन रंगाचं अंडसुद्धा आलंय. त्यामुळे अनेकांच्या मनात हा प्रश्न असतो की, ब्राऊन रंगाचं अंड खावं की पांढऱ्या रंगाचं ? या दोन अंड्यामध्ये नेमका फरक काय ? अंड्यांचा रंग असा वेगळा का असतो ? आणि कोणतं अंडं शरीरासाठी सर्वात जास्त फायदेशीर असतं ? आज आपण त्याबद्दल जाणून घेणार आहोत.

White Egg Vs Brown Egg

तुमच्या मनात हा प्रश्न नक्कीचं आला असेल की, अंड तर पांढऱ्या रंगाचं असतं, मग ते ब्राऊन रंगाचं कसं झालं ? तर अंड्याचा रंग हा कोंबडी कोणत्या जातीची आहे, यावर अवलंबून असतो.

White Egg Vs Brown Egg
White Egg Vs Brown Egg

तसंच अंड्याची साईज सुद्धा कमी किंवा जास्त असते. मग हाही प्रश्न उत्पन्न होतो की असं का ? तर कोंबडीला जो खुराक दिला जातो, तसंच कोंबडीच्या आजूबाजूचं जे वातावरण असतं, त्यावर तिने दिलेल्या अंड्याचा आकार अवलंबून असतो.

पांढरं की ब्राऊन आरोग्यासाठी कोणतं अंडं चांगलं

आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कोणत्या रंगाचं अंडं खावं ? कोणत्या रंगाच्या अंड्यामध्ये पोषणद्रव्य जास्त असतात ?

या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्याआधी आपण एकूणचं अंड्याचा आपल्या शरीराला काय फायदा  होतो, ते जाणून घेऊया. अंडं हे प्रोटीनचा सर्वात मोठा स्रोत म्हणून ओळखलं जातं. त्याचबरोबर इम्युनिटी सिस्टीम प्रभावी करण्यासाठी अंडं खूप फायदेशीर असतं. अंडं खाल्ल्याने हाडं खूप मजबूत होतात.

White Egg Vs Brown Egg
White Egg Vs Brown Egg

अंड पांढर असो किंवा ब्राऊन (White Egg Vs Brown Egg) त्यामध्ये विटामिन ए, डी, बी 12 आणि आयरनसारखे पोषक द्रव्य असतात. हो एवढं नक्की आहे की, ब्राऊन रंगाच्या अंड्यामध्ये पांढऱ्या पेक्षा जास्त पोषकद्रव्य असतात. परंतु हा फरक एवढा मोठा नसतो की, तुम्ही ब्राऊन अंडंच खायला पाहिजे.

तुमच्या या सवयीमुळे येताय चेहऱ्यावर पिंपल्स

त्यामुळे जर तुम्ही अंडी खात असाल, तर ब्राऊन किंवा पांढरं (पांढरं की ब्राऊन आरोग्यासाठी कोणतं अंडं चांगलं) कोणत्याही रंगाचं अंड खाऊ शकता. ते तुमच्या शरीरासाठी उपयोगी आहे, यात शंका नाही.

तर तुम्ही कोणतं अंडं खाता (White Egg Vs Brown Egg) पांढरं की ब्राऊन ? तुम्हाला अंड्यांमधील हा फरक माहीत होता का ? नक्कीचं कमेंट करून सांगा आणि अशाचं नवीन नवीन माहितीसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.

खूप खूप धन्यवाद !

Scroll to Top