Gold Rate Update आपल्या भारतात सोन्याला किती अनन्यसाधारण महत्त्व आहे, हे सर्वांनाचं माहितीये. स्त्रिया असो किंवा पुरुष सुंदर दिसण्यासाठी, मिरवण्यासाठी सोन्याचे दागिने घालतात. तर गुंतवणुकीचा एक चांगला पर्याय म्हणून सुद्धा सोन्याकडे पाहिलं जातं.
Gold Rate Update
परंतु मागील काही दिवसांमध्ये सोन्याचे भाव रेकॉर्ड ब्रेक उंचीवर होते. सोनं पहिल्यांदाचं 75 हजार रुपये तोळा या भावाला जाऊन पोहोचलं. त्यामुळे सोन्यात गुंतवणूक करावी की नाही ? हा प्रश्न अनेकांना पडला होता. कारण अचानक सोन्याचे भाव कमी होऊ शकत होते.
सोन्याच्या रेकॉर्ड ब्रेक भाववाढीचं (Gold Rate Update) कारण होतं इजरायल आणि इराण या देशांमध्ये सुरू झालेलं युद्ध. हे युद्ध सुरू झाल्यानंतर जागतिक बाजारात सोन्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले. परंतु आता काही आठवड्यानंतर हे युद्ध जास्त काळ चालणार नाही, असं दिसतंय. त्यामुळे सोण्याचे भाव कमी होऊ लागले आहेत. रेकॉर्डब्रेक 75000 रुपये तोळा या दरावरून आता सोनं 70 हजार रुपये प्रति तोळ्यापर्यंत पोहोचलंय.
अक्षय तृतीयेआधी सोनं झालं स्वस्त
Gold Rate Update सोन्याच्या भावात आणखीन घट होऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जातेय. सध्या भारतात लगीनसराई सुरू आहे. मोठ्या प्रमाणात लग्न होत आहे आणि लग्नात सोन्याच्या दागिन्यांची खरेदी केली जाते.
तसेचं येत्या 10 मेला अक्षय तृतीया साजरी केली जाईल. या दिवशी सोनं खरेदी करण्याला विशेष महत्त्व आहे. परंतु दरवाढीमुळे एवढं महाग सोनं (Gold Rate Update) खरेदी करण्याची ग्राहकांची इच्छा नव्हती. त्यामुळे सोन्याचं विक्री कमी होईल, असा अंदाज लावला जात होता. परंतु आता सोनं स्वस्त झाल्यामुळे सगळ्यांचा जीव भांड्यात पडलाय.
भारतात कोठे आहेत सोन्याच्या खाणी
मागील वर्षी अक्षय तृतीयेदरम्यान सोन्याचा भाव जवळपास 61 हजार रुपये प्रति तोळा होता. तो आता 70000 रुपये प्रति तोळा आहे. म्हणजे एका वर्षात 10 हजार रुपये प्रति तोळ्याची वाढ झाली आहे.
परंतु सोन्याचा भाव कितीही वाढला, तरीही भारतीयांचा सोनं खरेदी करण्याचा उत्साह काही कमी होणार नाही, एवढं मात्र नक्की. सणासुदीच्या काळात आणि लग्नसराईत मोठ्या प्रमाणात सोण्याची खरेदी केली जाते.
तर तुम्ही सोनं खरेदी गुंतवणुकीसाठी करतात की वापरण्यासाठी ? नक्कीचं कमेंट करून सांगा आणि अशाचं नवीन नवीन माहितीसाठी आमचे इतर लेख नक्कीचं वाचा.
खूप खूप धन्यवाद !