अभिनेता दिग्दर्शक क्षितिज झारपकर यांचं दुःखद निधन झालंय.

क्षितिज झारपकर मागील काही महिन्यांपासून कँसरशी झगडत होते.

त्यातचं मल्टिपल ऑर्गन डिसऑर्डरमुळे त्यांना हार्ट अटॅक आला.

त्यांच्या जाण्याने मराठी मनोरंजन विश्वाला जबर धक्का बसलाय.

क्षितिज झारपकर यांनी अभिनेता म्हणून करिअरला सुरुवात केलेली.

आभाळमाया आणि दामिनी सारख्या मालिकांमध्ये त्यांची भूमिका गाजली.

आयडियाची कल्पना आणि बालगंधर्व या चित्रपटातही ते दिसले होते.

सुंदरा मनामध्ये भरली आणि सख्खे शेजारी त्यांचे गाजलेले नाटक.

काही दिवसांपूर्वी ते चर्चा तर होणारचं या नाटकात दिसले होते.

आपणही त्यांना श्रद्धांजली वाहूया.