'नवरी मिळे हिटलरला' या मालिकेतील अभिनेता अजिंक्य दातेच्या घरी लक्ष्मीचं आगमन झालंय.
अजिंक्य नवरी मिळे हिटलरला या मालिकेत विश्वरूपची भूमिका साकारतो.
तो मालिकेची शूटिंग करत होता तेव्हा त्याला ही आनंदाची बातमी मिळाली होती.
त्याने पत्नीचा हात आणि त्यावर आपल्या बाळाचा हात असा सुंदर फोटो शेअर केला आहे.
त्याने यासोबतच एक पोस्ट लिहत ही आनंदाची बातमी फॅन्ससोबत शेअर केली आहे.
लग्नाच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी त्याच्या मुलीचा जन्म झालाय.
अजिंक्यचा मुलीचा जन्म पुण्यात झालाय आणि तो शूटिंगसाठी ठाण्याला होता.
मुलीच्या जन्माची बातमी मिळाल्यानंतर तो खूप रडला, पण हे आनंदाचे अश्रू.
अधिक माहितीसाठी स्वाईप अप करा.
Learn more