Love Marriage Story : लव मॅरेज केलेली मुलगी पाच वर्षानंतर घरी परतली तेव्हा

Love Marriage Story

Love Marriage Story नेत्रा एका उच्चभ्रू कुटुंबातील खूप सुंदर आणि सुशिक्षित मुलगी. तिचे आई वडील हे दोघेही एका मोठ्या कॉलेजमध्ये प्रोफेसर होते. घरात कोणत्याही गोष्टीची कमी नव्हती. त्यातचं नेत्रा ही एकुलती एक मुलगी असल्याने सर्वांचीचं लाडकी. तिची कोणतीच हौस मौस नव्हती, जी तिच्या आई-बाबांनी पूर्ण केली नव्हती. त्यामुळे नेत्रा ही चांगलीच हट्टी ही बनली होती. तिला जे हवं असायचं, ते ती मिळवायची.

कॉलेजमध्ये गेल्यावर तर नेत्राला आणखीच पंख फुटले होते. ती आई-बाबांचा एकही शब्द ऐकत नव्हती. अभ्यासात तिचं लक्ष राहत नव्हतं. मित्र, पार्ट्या, सिनेमे यामध्येचं तिचा जास्त वेळ जायचा. अशातचं तिचं एका मुलावर प्रेम जडलं होतं. हे दोघे एकमेकांवर खूप प्रेम करत होते. या मुलाने नेत्राला लग्नाची मागणी घातली आणि नेत्रा लग्नासाठी हो म्हणाली.

Love Marriage Story

एक दिवस नेत्रा घरी आली आणि आईबाबांना म्हणाली, “आई बाबा माझं एका मुलावर प्रेम आहे आणि मला त्याच्याशी लग्न करायचंय.” आई-बाबांनी विचारलं, “कोण आहे तो मुलगा ?” तर नेत्र म्हणाली, “माझ्या कॉलेजमध्ये आहे. मला तो खूप आवडतो. त्यालाही मी आवडते. Love Marriage Story आम्ही दोघांनी लग्न करायचं ठरवलंय.”

आई-बाबा तिला समजावून सांगतात, “अजून तुझं शिक्षण घेण्याचं वय आहे. लग्न करण्याचं नाही. आधी आपलं शिक्षण पूर्ण कर, करिअर कर आणि मग लग्नाचा विचार. तू ज्या मुलाबद्दल सांगतेय, तो सुद्धा अजून कॉलेजमध्येचं आहे. तो सेटल नाही, काही वर्षानंतर तुमच्या लग्नाचा आपण बघू.”

परंतु नेत्रा हट्टाला पेटली होती आणि काहीही करून मी हे लग्न करणार, असं ती म्हणाली. Love Marriage Story आधी तर आई-बाबांना वाटलं, ती जास्त सिरीयस नाही, परंतु एक आठवड्यानंतर नेत्रा घर सोडून पळून गेली आणि या मुलाबरोबर तिने कोर्ट मॅरेज केलं, लव मॅरेज केलं. त्यादिवशी नेत्राच्या आई-बाबांना खूप वाईट वाटलं आणि त्यांनी नेत्राशी सगळे संबंध तोडून टाकले. बघता बघता पाच वर्ष झालीत. पाच वर्षांपासून नेत्रा आणि तिच्या आई-बाबामध्ये कोणतही संभाषण झालेलं नव्हतं. नेत्रा कोठे राहते, काय करते, याबद्दल तिच्या आई-बाबांना काहीही माहिती नव्हतं.

आता आपण दोघेचं एकमेकांसाठी आहोत, Love Marriage Story हा विचार करून दोघेही कसंबसं आयुष्य जगत होते. परंतु एक दिवस अचानक त्यांना मोठा धक्काचं बसला. जेव्हा पाच वर्षानंतर नेत्रा घरी पोहोचली. तिची शारीरिक अवस्था खूपचं वाईट होती. शरीरावर अनेक जखमा हित्या अन तिला धड उभही राहता येतं नव्हतं. कशीबशी ती दरवाज्याला पकडून उभी होती आणि अंगातील सर्व शक्ती एक करून तिने आई बाबा अशी हाक मारली. रात्रंदिवस ऐशोआरामात राहणारी नेत्रा, Love Marriage Story जिला आईबाबांनी एका राजकुमारीप्रमाणे वाढवलं होतं. त्या नेत्राची ही अवस्था पाहून आई-बाबांच्या पायाखालची जमीनचं सरकते. त्यांना तर आधी ही आपलीचं नेत्र आहे का, हा प्रश्न पडतो.

नेत्रा दारावरचं उभी असते आणि आई-बाबांना पाहून ती ढसाढसा रडू लागते. Love Marriage Story आई-बाबाच्याही डोळ्यात पाणी येतं. आई नेत्राला जवळ घेते आणि विचारते, “बाळा कशी आहेस ?” नेत्रा रडत असते, हुंदके देत असते. तिच्या तोंडून एक शब्दही फुटत नाही. बाबा म्हणतात, “आधी तिला आत घे. प्रश्न नको विचारत बसू.”

आई नेत्राला घरात आणते, सोफ्यावर बसवते. तेव्हा नेत्राची हिंमतचं नाही होत, Love Marriage Story आई बाबांच्या नजरेला नजर द्यायची. आई विचारते, “काय झालं नेत्रा, तू इतकी दुःखी का दिसतेस ? तुझी तब्येतसुद्धा किती खराब झाली आहे ? तुला साधं उभही राहता येत नाहीये.” नेत्रा  म्हणते, “आई मला खूप भूक लागलीये.” हे ऐकून आई आणि बाबा दोघांच्या काळजाचा ठोका चुकतो. आई धावतचं किचनमध्ये जाते Love Marriage Story आणि नेत्रासाठी जेवणाचं ताट घेऊन येते.

हे दोघे नेत्राला स्वतःच्या हाताने भरवतात. तिला Love Marriage Story ज्यूसही पाजतात. तेव्हा कुठे नेत्राच्या अंगात त्राण येतात. बाबा आईला म्हणतात, “तिला आधी झोपू दे. काही तासांचा आराम झाला, तर तिला बरं वाटेल.” आई नेत्राला खोलीमध्ये घेऊन जाते आणि स्वतःच्या मांडीवर झोपवते. नेत्रा पुढील चार तास गाढ झोपलेली असते.

थोड्या वेळानंतर नेत्राचे डोळे उघडतात. तेव्हा आई बाबा तिच्या समोर उभे असतात. Love Marriage Story बाबा विचारतात, “नेत्रा आता सांग काय झालंय तुला ? तुझी अशी अवस्था कशी झाली ? तुझ्या अंगावर हे मारहाणीचे वरण कसले आहेत ? आमच्या मनाची जी शंका येतेय, ती खरी आहे का ?” बाबांचा हा प्रश्न ऐकून नेत्रा ढसाढसा रडू लागते. आई तिला आपल्या कुशीत घेते आणि म्हणते, “बाळा शांत हो, रडू नकोस. काही नाही होणार, काय झालंय ते सांग आम्हाला.”

नेत्रा स्वतःला सावरते आणि म्हणते, “आई बाबा मला माफ करा. मी तुमचं नाही ऐकलं. तुमचा विरोध असताना मी पळून जाऊन लग्न केलं आणि ती माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक ठरली. माझा नवरा केदार कॉलेजच्या काळात माझ्यावर जेवढं प्रेम करायचा, तेवढं लग्नानंतर त्याने कधीचं केलं नाही. Love Marriage Story लग्न झाल्यावर सगळं बदललं आणि मला समजलं की, खरं आयुष्य काय असतं.”

आई विचारते, “असं काय झालं बाळा, स्पष्ट सांग ना आम्हाला.” नेत्रा सांगते, “केदार आणि त्याचं कुटुंब हे जुन्या रूढी परंपरांमध्ये मानणारं होतं. लग्न झाल्यानंतर केदारने आणि त्याच्या आई-बाबांनी मला खूप साऱ्या गोष्टींची सक्ती केली. मला घराबाहेरही पडू देत नव्हते. आमच्या घरच्या सुना घराबाहेर पडत नाही, Love Marriage Story असं म्हणून ते नेहमी मला घरातचं ठेवायचे. माझी कोणतीही हौस मौस करत नव्हते. मला 24 तास साडी नेसून आणि डोक्यावर पदर ठेवूनचं रहावं लागायचं. मी सगळ्यांसमोर केदारशी बोलूही शकत नव्हते. केदार आणि माझा संबंध फक्त रात्रीचा होता.

केदारचं वागणंसुद्धा पूर्णपणे बदललं होतं. जो केदार कॉलेजमध्ये माझा मित्र होता, माझा बॉयफ्रेंड, प्रियकर होता, Love Marriage Story तो केदार आता फक्त एक पुरुष होता ज्याला आपल्या बायकोकडून फक्त तेचं हवं होतं आणि रोज रात्री तो फक्त तेच करायचा.

लग्नानंतर एक वर्षाच्या आतचं मी गरोदर राहिले. तेव्हा माझ्या सासूबाईंनी मला सांगितलं की, आमच्या घराण्याचं हे Love Marriage Story पहिलं बाळ आहे आणि तो मुलगाचं झाला पाहिजे. मुलगा व्हावा यासाठी मला खूप उपास तपास करायला लावले. डॉक्टरांकडे नेऊन माझ्या पोटात काय आहे हे चेक करून घेतलं आणि तेव्हा माझ्या पोटात मुलगी आहे, असं त्यांना कळलं. त्यामुळे त्यांनी माझं अबॉर्शन करून घेतलं.

हे ऐकून नेत्राच्या आई-बाबांना खूप वाईट वाटतं. आपली नेत्रा एवढी दुःखात होती आणि आपण तिची विचारपूसही Love Marriage Story केली नाही, त्यामुळे त्यांना अपराध्यासारखं वाटतं. नेत्रा म्हणते, “आई बाबा जेव्हा पहिल्यांदा हे घडलं, मला खूप वाईट वाटलं. पण परत असं होणार नाही, हा विचार मी केला. परंतु पुढील अनेकवेळेस हेच घडलं. दरवेळेस मी गरोदर राहिल्यानंतर माझ्या पोटात मुलगीच असायची आणि ते दरवेळेस माझं अबोर्शन करायचे.

माझी तब्येत दिवसेंदिवस बिघडत गेली. एक दिवस मी त्यांना विरोध केला, नाही आता मी अबोर्शन करणार नाही. Love Marriage Story मुलगा असो किंवा मुलगी, मला ते हवय. तर माझा नवरा आणि सासू-सासरे माझ्यावर खूप चिडले. मी त्यांना म्हणाले, तुम्ही जर माझ्याशी असंच वागणार असाल, तर मी माझ्या आई-बाबांकडे निघून जाईल. तर माझ्या नवऱ्याने चक्क मला एका खोलीत कोंडून ठेवलं.

आई बाबा मागील दोन वर्षांपासून मी त्या खोलीच्या बाहेर निघाले नव्हते. त्यांनी मला त्या घरात डांबून ठेवलं होतं.” Love Marriage Story नेत्राबरोबर काय घडलंय, हे ऐकत असताना आई-बाबांच्या डोळ्यातून अश्रू वाहत असतात. ज्या मुलीला आपण राजकन्येप्रमाणे वाढवलं, तिची ही काय अवस्था झालीये, हे पाहून त्यांना खूप वाईट वाटतं.

नेत्रा सांगते की, आज घरात कुणीही नव्हतं. सगळे एका नातेवाईकाच्या लग्नाला गेले होते. तेव्हा कशी बशी मी घरातून बाहेर पडले आणि तुमच्याकडे आले. आई बाबा मला आता त्या घरी परत नाही जायचं. कधीचं नाही जायचं. तुम्ही मला तुमच्याकडेचं राहू द्या ना.” असं म्हणून नेत्रा पुन्हा एकदा रडू लागते. आई तिला छातीशी कवटाळते. Love Marriage Story आईच्याही डोळ्यात पाणी असतं. बाबाही रडत असतात.

नेत्रा म्हणते, “तुम्ही मला सांगत होता, आधी तुझं शिक्षण पूर्ण कर, करियर कर. मुलाचं बॅकग्राऊंड चेक कर. परंतु मी ऐकलं नाही. Love Marriage Story प्रेमात आंधळी झाले होते. तुम्ही मला जन्म दिला, वाढवलं, शिक्षण दिलं, परंतु मी तुमचा विचार नाही केला. कॉलेजमध्ये सहा महिने वर्षभरापूर्वी भेटलेल्या मुलाच्या प्रेमात मी वेडी झाले होते आणि मी माझ्या आयुष्याचं खूप मोठ नुकसान करून घेतलं.”

माझं पहिलं प्रेमपत्र

बाबा म्हणतात, “नेत्रा आजकालच्या तरुण मुलांना हेच कळत नाही की, आई बाबा जर त्यांना काही सांगत असतील, तर ते त्यांच्या Love Marriage Story भल्यासाठीचं असतं. परंतु मुलं त्यांना दुश्मन समजतात. आपल्या स्वप्नांसमोर आलेली मोठी आडकाठी समजतात आणि मग चुकीचे निर्णय घेतात. ज्याचे परिणाम फक्त त्यांनाचं नाही, तर त्यांच्या आई बापालाही भोगावे लागतात.

जाऊ दे, जे झालं ते आपण नाही बदलू शकत. पण मी तुला वचन देतो, आता तुला परत त्या घरी जायची गरज नाही पडणार आणि Love Marriage Story त्यांनी तुझ्याबरोबर जे काही केलंय, त्याची शिक्षा त्यांना भोगावीचं लागेल. आपण त्यांच्याविरुद्ध तक्रार करूया. त्यांना त्यांच्या पापांची शिक्षा देऊया. आता आपण येथे नाही राहायचं. आपण एक नवीन आयुष्य सुरू करू. तू तुझं शिक्षण पूर्ण कर, करियर सुरू कर. भूतकाळात जे काही घडलं, ते विसरून जा.

नेत्रा कशीबशी उभी राहते आणि बाबांना मिठी मारते. ज्या मुलीवर आपण सर्वात जास्त प्रेम केलं. तिला तळहाताच्या फोडाप्रमाणे Love Marriage Story जपलं. तिची अवस्था पाहून बापाचं काळीजही तुटतं. परंतु आता मुलीला साथ द्यायची, तिला तिची चूक सुधारण्यात मदत करायची, तिचं आयुष्य पुन्हा एकदा रुळावर आणायचं, असं आई आणि बाबा दोघांनीही ठरवलेलं असतं.

तर मैत्रिणींनो आणि मित्रांनोझ कशी वाटली तुम्हाला आजची कथा, नक्कीचं कमेंट करून सांगा आणि अशाचं नवीन नवीन कथांसाठी आमचे इतर लेखही नक्कीच वाचा.

खूप खूप धन्यवाद !

Scroll to Top