How Wireless Charger Works मित्रांनो मोबाईल ही अन्न, वस्त्र, निवाराप्रमाणेच माणसाची एक जीवनावश्यक गरज बनली आहे. मोबाईलशिवाय माणसाचं कामच होऊ शकत नाही. एका मोबाईलच्या स्क्रीनवर अख्खं जग सामावले आहे.
मोबाईलने माणसाचं आयुष्यच बदलून टाकलं आहे. मोबाईलच्या साहाय्याने आज आपण एखाद्याला संपर्क करण्यापासून ते शॉपिंग, तिकीट बुकिंग, एंटरटेनमेंट अशा अनेक गोष्टी करू शकतो. मोबाईलच्या मदतीने आपण पैसेसुद्धा कमावू शकतो.
How Wireless Charger Works
सध्या मोबाईल हा त्याच्या सगळ्यात ऍडव्हान्स स्टेजमध्ये आहे. दिवसेंदिवस अनेक नवीन टेक्नॉलॉजी मोबाईलमध्ये येत असतात. अशीच एक नवीन टेक्नॉलॉजी आहे ती म्हणजे वायरलेस चार्जिंग.
वायरलेस चार्जिंगमध्ये फोन चार्ज (How Wireless Charger Works) करण्यासाठी कोणत्याही प्रकारची वायर वापरली जात नाही. यामध्ये एका प्लेटवर मोबाईल फोन ठेवला की तो चार्ज होऊ लागतो. यासाठी फोनला कोणतंही कनेक्शन द्यायची गरज नाही. वायरलेस चार्जिंगचा वापर आजकाल मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.
वायरलेस चार्जरने फोन कसा चार्ज होतो
आज आम्ही तुम्हाला तुमचा फोन वायरलेस चार्ज कसा होतो ते सांगणार आहोत. आपल्या नेहमीच्या चार्जरमध्ये वायरमधून वीज जाते आणि फोन चार्ज होतो. पण वायरलेस चार्जिंगमध्ये वायर वापरली जात नाही यामध्ये चार्जिंगसाठी एक प्लेट वापरली जाते तिला इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन असं म्हणतात.
ही प्लेट नेहमीच्या चार्जरप्रमाणेच लाईटला जोडतात मग ते हवेत विद्युत ऊर्जा सोडते.
यामुळे सगळीकडे चुंबकीय क्षेत्र (How Wireless Charger Works) तयार होते. तुमच्या मोबाईल फोनमधील कॉपर कॉईल इथूनच एनर्जी घेते आणि मोबाईलच्या बॅटरीला पाठवते. अशाप्रकारे मोबाईलची बॅटरी चार्ज होऊ लागते.
पण वायरलेस चार्जिंग (How Wireless Charger Works) ही मोबाईलसाठी घातकसुद्धा असू शकते.
जास्त हायटेक नसलेल्या मोबाईल फोनसाठी वायरलेस चार्जिंग उपयुक्त ठरत नाही.
हे फोन वायरलेस चार्जिंग (How Wireless Charger Works) करताना जास्त गरम होऊ शकतात त्यामुळे फोन खराब होऊ शकतात किंवा फोनचा स्फोट होऊ शकतो.
यासोबतच वायरलेस चार्जिंग करताना फोन पुन्हा पुन्हा डिस्कनेक्ट होतो त्यामुळे फोनला काही नुकसान होऊ शकतं.
वायरलेस चार्जिंगचे काही फायदे आणि काही नुकसानसुद्धा आहेत त्यामुळे प्रत्येकाने आपल्या आवश्यकतेप्रमाणे वायरलेस चार्जिंग या नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करायला हवा.
मित्रांनो तुम्हाला हा आर्टिकल उपयोगी वाटला असेल तर आमचे दुसरे आर्टिकलसुद्धा नक्की वाचा.
खूप खूप धन्यवाद !