Career After 12th : बारावीनंतर तुम्ही डेअरी उद्योगात करू शकता करिअर

Career After 12th

Career After 12th मित्रांनो नुकताच 10 वी, 12 वीचा निकाल लागला आणि पुढे काय करायचं हा विचार सगळ्याच विद्यार्थी आणि पालकांच्या मनात सुरू आहे. कोणत्या क्षेत्रात करिअर करावं, कुठे चांगला स्कोप आहे हा संभ्रम प्रत्येकाच्या मनात असेल.

आज आम्ही तुमच्यासाठी असाच एक नवीन करियरचा मार्ग घेऊन आलो आहोत. तो म्हणजे 12 वीनंतर तुम्ही डेअरी उद्योगातसुद्धा करिअर करू शकता.

Career After 12th 

आपला भारत हा कृषिप्रधान देश आहे आणि देशातील बहुसंख्य लोकसंख्या ही शेती आणि शेतीशी निगडित जोडधंदे करतात. आपल्याकडे शेतीशी निगडित पशुपालन आणि दुग्धव्यवसाय हे जोडधंदे केले जातात.

या दुग्धव्यवसायावर अनेक शेतकरी कुटुंबाची उपजीविका चालते. मागील 30 वर्षात दूध उत्पादनामध्ये आपल्या देशाने भरपूर प्रगती केली आहे. जगात दूध उत्पादनात आघाडीला असलेल्या देशांमध्ये भारताचं नाव पुढे आहे.

12 वी नंतर तुम्ही डेअरी उद्योगात करू शकता करिअर  

एकेकाळी छोट्या गावांमध्ये असलेला दुधाच्या डेअरीचा व्यवसाय (Career After 12th) आता मोठ्या शहरांमध्येही खूप वाढलाय. लोकसंख्या वाढ आणि आरोग्यासाठी दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचं महत्व आणि उत्पन्नात झालेली वाढ यामुळे दुधाची मागणी वाढतेय.

आपल्या भारत देशात 24% दुधाचं उत्पादन केलं जातं आणि देशातील एकूण 7 कोटी परिवार दूध उत्पादन करतात.

या वाढलेल्या दूध व्यवसायामुळे (Career After 12th) या क्षेत्रात करियरच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. दुग्धतंत्रज्ञान आणि त्याच्याशी संबंधित अभ्यासक्रमांचंही महत्त्व वाढलं आहे.

डेअरी क्षेत्रात करिअर
डेअरी क्षेत्रात करिअर

आज आपण दुग्धतंत्रज्ञान म्हणजेच डेअरी टेक्नॉलॉजी या अभ्यासक्रमाविषयी जाणून घेऊ :

या अभ्यासक्रमाला बी टेक इन डेअरी टेक्नॉलॉजी असं म्हणतात. हा अभ्यासक्रम चार वर्षांचा असतो आणि एकूण आठ सेमिस्टर असतात.

कोरफड शेती करून कमवा लाखों रुपये

पदवीचा अभ्यासक्रम पाच विषयांत विभागलेला आहे. दुग्धतंत्रज्ञान, दुग्ध रसायनशास्त्र, दुग्ध सूक्ष्मजीवशास्त्र, दुग्ध अभियांत्रिकी, दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन अशा विषयांचा समावेश होतो.

यात चार प्रशिक्षण असतात आणि अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर बी टेक इन डेअरी टेक्नॉलॉजी (Career After 12th) अशी डिग्री मिळते.

सध्या महाराष्ट्रात यवतमाळ जिल्ह्यातील वरुड पुसद आणि लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे दुग्धतंत्रज्ञानाची दोन महाविद्यालये आहेत. ही महाविद्यालये महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर अंतर्गत काम करतात.

या दोन्ही महाविद्यालयात प्रत्येकी 32 अशी प्रवेशक्षमता आहे. या महाविद्यालयातून तुम्ही बी टेक इन डेअरी टेक्नॉलॉजी ही पदवी मिळवू शकता.

या अभ्यासक्रमासाठी तुम्ही प्रवेश कसा मिळवू शकता :

www.mafsu.in या वेबसाईटवर जाऊन तुम्ही अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया आणि इतर सर्व माहिती जाणून घेऊ शकता.

प्रवेश मिळवण्यासाठी तुम्ही 12 वी सायन्समध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथस आणि इंग्लिश या विषयांत खुल्या गटातील विद्यार्थ्यांना 50% आणि राखीव गटातील विद्यार्थ्यांना 40% मार्क्स असणे आवश्यक आहे.

12 वी सायन्सच्या गुणवत्ता यादीनुसार प्रवेश देण्यात येतो आणि या महाविद्यालयात प्रवेशपरीक्षा पास होणं गरजेचं आहे.

ज्या विद्यार्थ्यांकडे शेतीचा 7/12 चा उतारा किंवा भूमिहीन शेतमजुराचा उतारा असतो त्यांना मेरिट लिस्टमध्ये 12 मार्क्स जोडून दिले जातात. मेरिट लिस्ट फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथस, इंग्लिश, शेतीचा 7/12 चा उतारा किंवा शेतमजुराचा उतारा यावर बनलेली असते. यासाठी जास्तीत जास्त 20 गुण आवश्यक आहे.

पदवीनंतर नोकरीच्या संधी :

ही पदवी मिळवल्यानंतर तुम्हाला रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत.

जिल्हा दुग्धव्यवसाय (Career After 12th) विकास अधिकारी, अन्नसुरक्षा अधिकारी, भारतीय अन्न महामंडळ, राष्ट्रीय दुग्धविकास महामंडळ, विद्यापीठातील सहाय्यक प्राध्यापक, भारतीय कृषी अनुसंधान परिषदमध्ये सायंटिस्ट, तसेच बँकेतसुद्धा नोकरी मिळते.

सहकार क्षेत्रातील अनेक मोठ्या कंपन्या आणि मल्टीनॅशनल कंपनीत नोकरीच्या अनेक संधी आहेत.

यासोबतच तुम्ही दूध आणि दुग्ध उत्पादनावर आधारित व्यवसाय (Career After 12th) करून स्वयंरोजगार सुद्धा निर्माण करू शकता.

तुम्ही या नवीन करियरचा नक्कीच विचार करू शकता त्यामुळे तुमच्या उज्ज्वल भवितव्यासाठी नक्कीच फायदा होईल.

मित्रांनो तुम्हाला हा आर्टिकल आवडला असेल तर आमचे दुसरे आर्टिकलसुद्धा नक्की वाचा. 

खूप खूप धन्यवाद !

Scroll to Top