Best Marathi Names For Boy : मुलांसाठी 10 बेस्ट मराठी नावं

Best Marathi Names For Boy

Best Marathi Names For Boy प्रत्येकजण आपल्या मुलांवर खूप प्रेम करतो आणि घरात बाळ जन्माला आल्यानंतर तर घराचं नंदनवन होतं. घरामध्ये आनंदचं आनंद असतो. परंतु बाळ जन्मल्यानंतरचं सगळ्यात मोठं टेन्शन म्हणजे, त्या बाळाचं नाव काय ठेवायचं ?

आपल्या बाळाचं नाव हे युनिक असायला पाहिजे, सगळ्यांपेक्षा वेगळं असायला पाहिजे. दुसऱ्या कोणाचंही ते नाव नको. त्याचबरोबर हे नाव खूप सुंदर असायला हवं. अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते. म्हणूनचं आज आम्ही तुमच्यासाठी युनिक आणि नाविन्यपूर्ण अशी मुलांची दहा नावे (Best Marathi Names For Boy) घेऊन आलो आहोत. तर चला ही नावं कोणती आहेत, ते पाहूया.

Best Marathi Names For Boy

1) अतुल्य : हे नाव खूप सुंदर आहे आणि या नावाचा अर्थ नावातंच दडलाय. अतुल्य म्हणजे ज्याची तुलना होऊ शकत नाही असा. प्रत्येकालाचं असं वाटतं की, आपलं बाळ हे अतुलनीय असावं. त्याची तुलना जगात कोणाशी होऊ नये आणि त्याचं नावचं जर अतुल्य असेल, तर आणखी काय हवं ? तुम्ही तुमच्या बाळाचं अतुल्य नाव नक्की ठेवू शकता.

2) अगस्त्य : अगस्त्य हे आपल्या पुराणातील एका ऋषीचं नाव आहे. हे तर आपल्या सर्वांना माहितीये. सध्या हे नाव चांगलंच ट्रेंडिंगमध्ये आहे. जर तुम्ही तुमच्या मुलाचं हे नाव ठेवलं, तर ते नक्कीचं युनिक असेल, यात शंका नाही.

3) हितांशू : हे Best Marathi Names For Boy नावसुद्धा खूपचं सुंदर आहे. या नावातचं अर्थ दडला आहे. हितांशू म्हणजे सर्वांचं हित चिंतणारा.

4) जयवर्धन : तुम्हाला जर तुमच्या मुलाचं नाव एकदम राजेशाही ठेवायचं असेल, तर हे नाव तुमच्यासाठी अगदी योग्य आहे. ज्याचा विजय नेहमी वाढत असतो तो जयवर्धन. असा या नावाचा अर्थ आहे.

5) मुरारी : भगवान श्रीकृष्ण यांचं हे एक नाव आहे. जर तुम्हाला बाळाचं नाव श्रीकृष्णाच्या नावावर ठेवायचं असेल आणि नेहमीची नावं नको असतील, तर मुरारी हे नाव तुमच्यासाठी योग्य आहे.

नवीन लग्न झालेल्या मुलींसाठी १० बेस्ट मराठी उखाणे

6) प्रचेत : या नावाचा अर्थ होतो हुशार आणि ज्ञानी. तुम्ही सुद्धा तुमच्या लहान बाळाचं नाव हे नक्की ठेवू शकता.

7) रेवंथ : या नावाचा अर्थ आहे सूर्य. तुमचं बाळ सूर्यासारखं तेजस्वी होईल, म्हणूनचं तुम्ही हे नाव नक्की ठेवू शकतात.

8) सौमित्र : सध्या आपल्या आयुष्यात मित्रांना खूप महत्त्व आहे. नातेवाईकांपेक्षाही मित्र आयुष्यात जास्त साथ देतात. म्हणून चांगला मित्र असा अर्थ असलेलं हे नाव, तुम्ही तुमच्या बाळाचं नक्की ठेऊ शकता.

9) वैदिक : वेदांचे ज्ञान असलेला असा या नावाचा अर्थ होतो. हे सुद्धा खूपचं युनिक आणि सुंदर असं नाव आहे.

10) वत्सल : या नावाचा अर्थ होतो प्रेमळ. तुमच्या प्रेमळ बाळासाठी हे अगदी योग्य नाव आहे.

तर तुम्हाला यापैकी कोणतं नाव आवडलं ? Best Marathi Names For Boy नक्कीचं कमेंट करुन सांगा आणि अशाचं नवीन नवीन माहितीसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.

खूप खूप धन्यवाद !

Scroll to Top