रात्रीच्या जेवणाची योग्य वेळ कोणती ? या वेळेत जेवण केल्याने सुधारते आरोग्य

रात्रीच्या जेवणाची योग्य वेळ

रात्रीच्या जेवणाची योग्य वेळ दुपारी आणि संध्याकाळी आपण सगळेचं जेवण करत असतो. परंतु प्रत्येक जण आपापल्या कामानुसार, मिळालेल्या वेळेनुसार जेवण करतो. काही लोक रात्रीचं जेवण संध्याकाळी 7 वाजता  करतात. तर काहींना रात्रीच्या जेवणासाठी 11 आणि 12 ही वाजतात. परंतु अनेकांच्या मनात हा प्रश्न असतो की, रात्रीच्या जेवणाची योग्य वेळ कोणती आहे ?

योग्य वेळेत जेवण हे आरोग्यासाठी खूप उत्तम असतं तर चुकीच्या वेळेस जेवल्यामुळे अनेक आरोग्य विषयक समस्याही उद्भवू शकतात. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी रात्रीच्या जेवणाची योग्य वेळ कोणती ? याबद्दल माहिती घेऊन आलो आहोत.

रात्रीच्या जेवणाची योग्य वेळ

रात्रीच्या जेवणाची योग्य वेळ आहे संध्याकाळी 7 ते 8 वाजेपर्यंत. यावेळी जेवण करणं सर्वात उत्तम मानलं जातं. आता तुम्ही म्हणाल की, आमच्या नोकरी व्यवसायामुळे आम्ही इतक्या लवकर जेऊ शकत नाही. मग आम्ही काय करायचं ? यासाठी एक समाधान म्हणजे तुमची झोपण्याची वेळ आणि जेवणाची वेळ यामध्ये कमीत कमी 3 तासांचं अंतर पाहिजे. जर तुम्ही जेवून लगेच झोपत असाल, तर पचन होण्यास खूप त्रास होतो.

Best Time For Dinner
Best Time For Dinner

म्हणजे जर तुम्ही रात्री 10 वाजता झोपत असाल, तर रात्री 7 वाजता जेवण करणं हे योग्य असतं. वेळेवर जेवण झाल्यामुळे तुम्ही झोपण्याआधीचं अन्न पचतं आणि अन्नाचे सर्व गुण तुमच्या शरीराला मिळतात. अपचनामुळे होणारे त्राससुद्धा दूर होतात. परंतु जेवण उशिरा करणं आणि लगेचं झोपण यामुळे अपचन आणि इतर त्रास वाढतात.

Best Time To Have Dinner

काही लोकांना दुपारी जेवण्यासही खूप उशीर होतो. त्यामुळे ते रात्री उशिरा जेवण करण्याचा विचार करतात. अशा लोकांना अपचन, ऍसिडिटी आणि लठ्ठपणा या समस्यांचा सामना करावा लागतो.

मसाला डोसा रेसिपी

तसंच अनेक लोक हाही प्रश्न विचारतात की, दुपारचं जेवण करणं योग्य की अयोग्य ? सकाळी नाष्टा करायला हवा का ? दुपारचं जेवण करायलाचं हवं का ? आपण दिवसभर काम करतो आणि त्यासाठी आपल्याला ऊर्जा हवी असते. अनेक लोक सकाळी नाश्त्याला फक्त चहा किंवा दूध पितात, हे अयोग्य आहे.

Best Time For Dinner
Best Time For Dinner

सकाळी नाष्टामध्ये पोट भरेल, असं जेवण करायला हवं. त्यामुळे तुम्हाला दिवसभर ऊर्जा मिळत राहते. असं म्हटलं जातं की, सकाळचा नाश्ता राजासारखा करायला हवा. दुपारचं जेवण हे सर्वसामान्य माणसासारखं करायला हवं आणि रात्रीचे जेवण गरीबासारखं, म्हणजेचं रात्री कमीत कमी जेवायला हवं.

तर तुम्ही रात्री कधी जेवता ? तुमच्या जेवणाच्या वेळा काय आहेत ? नक्कीचं कमेंट करुन सांगा आणि अशाचं नवीन नवीन माहितीसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.

खूप खूप धन्यवाद !

Scroll to Top