National Pension Scheme 2024
National Pension Scheme 2024 ज्या सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर पेन्शन मिळते, त्यांना उरलेल्या आयुष्यातील उदरनिर्वाहाची कोणतीही काळजी राहत नाही. दर महिन्याला पगाराप्रमाणेचं त्यांच्या बँक अकाउंटवर ही पेन्शन जमा होते. ज्याचा उपयोग ते त्यांच्या उदरनिर्वाहासाठी, रोजचे खर्च भागवण्यासाठी करू शकतात.
परंतु या पेन्शनचा फायदा फक्त सरकारी नोकरदारांनाचं मिळतो. मग त्या लोकांचं काय जे प्रायव्हेट नोकरी करतात किंवा स्वतःचे व्यवसाय करतात. जे लोक असंघटित क्षेत्रामध्ये काम करतात. हे लोकसुद्धा एका वयानंतर काम करणं थांबवतात, रिटायर होतात. पण त्यांना कोणतीच पेन्शन मिळत नाही. मग रिटायर झाल्यानंतर त्यांच्या उदरनिर्वाहाचं काय.
ही एक खूप मोठी सामाजिक समस्या आहे आणि या सामाजिक समस्येचं समाधान घेऊन आलीये केंद्र सरकारची एक योजना. या योजनेचं नाव आहे नॅशनल पेन्शन स्कीम म्हणजेच एनपीएस. मग ही नॅशनल पेन्शन स्कीम काय आहे ? या योजनेअंतर्गत कोणाला सहभाग घेता येतो ? या National Pension Scheme 2024 योजनेचे फायदे काय आहेत ? पात्रता आणि अटी काय आहेत ? गुंतवणूक किती करावी लागते ? आज आपण या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेणार आहोत.
नॅशनल पेन्शन स्कीम योजनेची उद्दिष्टे
भारत सरकारने 1 जानेवारी 2004 रोजी नॅशनल पेन्शन स्कीम National Pension Scheme 2024 या योजनेची घोषणा केली होती. या योजनेचा मुख्य उद्देश प्रत्येक भारतीयाला वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर पेन्शन मिळावी हा होता.
सुरुवातीला ही National Pension Scheme 2024 योजना फक्त केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठीचं होती. परंतु त्यानंतर ही योजना सर्व भारतीयांसाठी उपलब्ध करून देण्यात आली. नॅशनल पेन्शन स्कीम योजना त्या लोकांसाठी खूप फायदेशीर आहे. जे सरकारी नोकरी नाही करत आणि ज्यांना सेवानिवृत्तीनंतर पेन्शन मिळावी अशी इच्छा आहे. ते या योजनेमध्ये गुंतवणूक करू शकतात आणि सेवानिवृत्तीनंतर पेन्शन मिळू शकतात.
नॅशनल पेन्शन स्कीम योजनेची वैशिष्ट्ये
1) नॅशनल पेन्शन स्कीम National Pension Scheme 2024 ही केंद्र सरकारच्या इतर गुंतवणुकीच्या योजनांपेक्षा जास्त परतावा, जास्त रिटर्न देते. त्याचे मुख्य कारण म्हणजे तुम्ही या योजनेत जे पैसे गुंतवता, त्याचा एक हिस्सा इक्विटी फंडमध्ये गुंतवला जातो. इक्विटी फंडमध्ये गुंतवला जाणारा हिस्सा जास्त रिस्की आहे, परंतु त्याचवेळेस या योजनेने 9 ते 12 टक्के वार्षिक परतावा दिला आहे. जो इतर कोणत्याही केंद्रीय सरकारच्या योजनेपेक्षा जास्त आहे.
2) सध्या नॅशनल पेन्शन स्कीम योजनेअंतर्गत इक्विटी एक्सपोजर 75 ते 50 टक्के दरम्यान आहे. यामुळेचं जोखीम सुद्धा कमी होतं, त्याचबरोबर परतावाही इतर योजनेपेक्षा जास्त मिळतो.
3) गुंतवणूक केलेल्या व्यक्तीच्या वयाच्या 50 आणि 60 वर्षानंतर इक्विटी एक्सपोजरची टक्केवारी कमी जास्त होत असते. त्यामुळे त्याला जोखीमसुद्धा कमी होत असते.
4) नॅशनल पेन्शन स्कीमचे सर्वात मोठे वैशिष्ट्य हे आहे की, येथे इतर योजना प्रमाणे तुम्हाला जे पैसे गुंतवायचे असतात, ते कोणत्याही तारखेला किंवा किती पैसे गुंतवायचे, याबद्दलचं कोणतंही बंधन नाहीये. एका आर्थिक वर्षात तुम्हाला हवे तेव्हा, हवे तेवढे पैसे तुम्ही या योजनेत गुंतवणूक करू शकतात.
5) या National Pension Scheme 2024 योजनेत गुंतवणूक केल्यावर गुंतवणूकदारांना आयकर नियम 80C अंतर्गत दीड लाख रुपयांचा करमुक्तमुक्त रकमेचा फायदाही मिळतो.
सेवानिवृत्तीनंतर एनपीएसमध्ये जमा राशीचे नियम
एखाद्या गुंतवणूकदाराने वयाची अनेक वर्ष National Pension Scheme 2024 एनपीएस योजनेमध्ये गुंतवणूक केली आहे आणि आता तो सेवानिवृत्त झाला आहे. त्याचं वय वर्ष 60 पूर्ण झालं असेल, तर त्याने एनपीएस योजनेमध्ये गुंतवलेल्या रकमेबद्दल काही नियम आहेत.
1) जर या योजनेमध्ये गुंतवणूकदाराची 5 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम असेल, तर त्याला या रकमेच्या 60 टक्के रक्कमचं एका वेळेस काढता येते. उरलेली 40% रक्कम त्याला अशा एका वार्षिक योजनेमध्ये गुंतवावी लागेल, ज्यामुळे त्याला दरमहा पेन्शन मिळेल.
2) परंतु जर गुंतवणूकदाराची या योजनेमध्ये 5 लाख रुपयांपेक्षा कमी रक्कम असेल, तर त्याला ही संपूर्ण रक्कम एकाचं वेळेस काढून घेता येते आणि मग त्याला पेन्शन मिळणार नाही.
3) या योजनेअंतर्गत जमा झालेली रक्कम ही करमुक्त असते. तुम्हाला परताव्यावर कोणताही कर भरावा लागत नाही.
4) जर एखाद्या गुंतवणूकदारास नॅशनल पेन्शन स्कीम योजनेमध्ये गुंतवलेली रक्कम त्याच्या सेवानिवृत्तीच्या आधी म्हणजे 60 वर्षे पूर्ण होण्याच्या आधीचं काढायची असेल, तर त्याबद्दलही वेगवेगळे नियम आहेत.
5) सेवानिवृत्तीआधी जर एनपीएसमधील रक्कम काढायची असेल आणि ही रक्कम अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असेल, तर संपूर्ण रक्कम एकाच वेळेस काढता येते.
6) परंतु जर एनपीएसमध्ये गुंतवली रक्कम अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त असेल, तर मात्र एकूण रकमेच्या 80 टक्के रक्कम वार्षिक उत्पन्न योजना घेण्यासाठी खर्च करावी लागते. ज्यामुळे गुंतवणूकदारास दरमहा पेन्शन मिळेल आणि फक्त 20 टक्के रक्कम तुम्ही काढू शकता.
7) या National Pension Scheme 2024 योजनेत गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदाराचा अकाली मृत्यू झालास संपूर्ण गुंतवलेली रक्कम वारसदाराला दिली जाते.
हेही वाचा : Mukhyamantri Tirth Yatra Yojana | मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजनेची माहिती
नॅशनल पेन्शन स्कीम योजनेच्या पात्रता आणि अटी
या National Pension Scheme 2024 योजनेत गुंतवणूक करायची असल्यास काही पात्रता आणि अटी भारत सरकारने आखून दिल्या आहेत, आपण त्या पाहुयात.
1) भारताची मूळनिवासी एनपीएस अकाउंट उघडू शकते.
2) गुंतवणूकदाराचं वय 18 ते 70 वर्षे या वयोगटा दरम्यान असायला हवं.
3) नॅशनल पेन्शन स्कीम ही योजना एक वैयक्तिक पेन्शन स्कीम असल्यामुळे तिसरी व्यक्ती दुसऱ्या कोणासाठीही अकाउंट उघडू शकत नाही.
नॅशनल पेन्शन स्कीममध्ये गुंतवणूक कशी करावी
या National Pension Scheme 2024 योजनेमध्ये तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्हीही पद्धतीने गुंतवणूक करू शकतात. मासिक 250 रुपये किंवा वार्षिक 1 हजार रुपये ही कमीत कमी गुंतवणुकीची मर्यादा आहे. जास्तीच्या गुंतवणुकीची या योजनेत कोणतीही अट नाही.
इतर गुंतवणुकीच्या पर्यायांसमोर एनपीएस
सध्या बाजारात गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. जशी ही नॅशनल पेन्शन स्कीम आहे. त्याचप्रमाणे बँकांच्या एफडी आणि पब्लिक प्रॉव्हिडंट फंड या सरकारी योजनासुद्धा उपलब्ध आहेत. मग एनपीएस आणि या इतर योजनांमध्ये नेमका फरक काय ते जाणून घेऊया.
1) बँकांची एफडी तुम्ही तुमच्या इच्छेनुसार सहा महिने, वर्षभर किंवा अनेक वर्षांपर्यंत ठेवू शकता. पीपीएफ मध्ये तुम्हाला 15 वर्षे पैसे ठेवायला लागतात. परंतु एनपीएसमध्ये हीच मर्यादा सेवानिवृत्तीपर्यंत आहे.
2) पीपीएफ आणि एफडीमधील तुमची गुंतवणूक, तुम्ही एकाचं वेळेस काढून घेऊ शकतात. परंतु एनपीएसमध्ये गुंतवलेली फक्त 60% रक्कमच तुम्हाला काढता येते बाकीची 40% रक्कम तुम्हाला वार्षिक योजनेमध्ये गुंतवावी लागते.
3) एफडी आणि पीपीएफमध्ये गुंतवलेल्या रकमेवर कोणतही जोखीम नाहीये. कारण यातील हिस्सा इक्विटी फंडमध्ये गुंतवला जात नाही. परंतु एनपीएसमध्ये तुम्ही गुंतवलेल्या रकमेचा काही भाग इक्विटी फंडमध्ये गुंतवला जातो. त्यामुळे यामध्ये जोखीम सामील आहे.
4) एफडी आणि पीपीएफमध्ये (PPF) तुम्हाला आठ टक्क्यांपेक्षा जास्त व्याजदर कधी मिळत नाही. परंतु पीपीएफमध्ये मागील काही वर्षांच्या अनुभवानुसार 7 टक्के ते 12 टक्के वार्षिक परतावा मिळतो.
नॅशनल पेन्शन स्कीम एनपीएसचं महत्त्व
नॅशनल पेन्शन स्कीम म्हणजेचं एनपीएस National Pension Scheme 2024 ही सरकारी गुंतवणूक योजना त्या लोकांसाठी आहे, ज्यांना रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार नाही. ते एखादी खाजगी नोकरी किंवा व्यवसाय करतात. परंतु त्यांना पेन्शन हवी आहे. असे लोक या योजनेमध्ये गुंतवणूक करू शकतात. त्याचबरोबर ज्यांना जास्त रिटर्न हवा आहे, त्यांच्यासाठी ही योजना फायदेशीर आहे. कारण तुम्ही गुंतवलेल्या रकमेचा काही हिस्सा इक्विटी फंडमध्ये गुंतवला जातो. यामुळे वार्षिक परतावा जास्त मिळतो.
म्हणूनचं ज्या लोकांना सेवानिवृत्तीनंतर पेन्शन हवी आहे आणि ते थोडीशी जोखीम स्वीकारून जास्त परतावा मिळवण्याची इच्छा व्यक्त करतात, अशा लोकांसाठी ही National Pension Scheme 2024 योजना परफेक्ट आहे.
FAQ About National Pension Scheme नॅशनल पेन्शन स्कीमबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न
1) प्रश्न : नॅशनल पेन्शन स्कीम योजना कधी सुरू करण्यात आली ?
उत्तर : भारत सरकारने नॅशनल पेन्शन स्कीम ही योजना 1 जानेवारी 2004 रोजी सुरू केली होती.
2) प्रश्न : National Pension Scheme 2024 या योजनेचे उद्दिष्ट काय आहे ?
उत्तर : या योजनेअंतर्गत त्या लोकांना पेन्शन मिळू शकते, ज्यांना त्यांच्या खाजगी नोकरीतून किंवा व्यवसायातून सेवानिवृत्तीनंतर कोणतीही पेन्शन मिळू शकत नाही.
3) प्रश्न : नॅशनल पेन्शन स्कीममध्ये गुंतवलेली रक्कम आणि परतावा करमुक्त आहे का ?
उत्तर : होय, या योजनेअंतर्गत गुंतवलेली 1.5 लाख रुपयांपर्यंतची रक्कम आयकर नियम 80C अंतर्गत करमुक्त आहे. त्याचबरोबर परतावा सुद्धा करमुक्त आहे.
4) प्रश्न : National Pension Scheme 2024 मध्ये गुंतवलेल्या रकमेवर किती टक्के व्याजदर मिळत ?
उत्तर : या योजनेमध्ये तुम्ही गुंतवलेल्या रकमेचा काही हिस्सा इक्विटी फंडमध्ये गुंतवला जातो. त्यामुळे या योजनेत इतर सरकारी योजनेपेक्षा जास्त नऊ ते बारा टक्के वार्षिक परतावा मिळतो.
5) प्रश्न : नॅशनल पेन्शन स्कीममध्ये गुंतवलेली रक्कम जोखीम विरहित आहे का ?
उत्तर : नाही, या योजनेमध्ये गुंतवलेली रक्कम जोखीम विरहित नाहीये.
एकूणचं नॅशनल पेन्शन स्कीम National Pension Scheme 2024 त्या लोकांसाठी आहे, ज्या लोकांना सेवानिवृत्तीनंतर पेन्शन हवी आहे आणि ते गुंतवलेल्या रकमेवर जोखीमही स्वीकारू शकतात आणि त्यांना जास्त परतावा मिळण्याची अपेक्षा आहे.
तुमच्या मनात नॅशनल पेन्शन स्कीमबद्दल आणखी काही प्रश्न असतील, तर नक्कीचं कमेंट करून विचारा. आम्ही त्या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करू आणि गुंतवणुकीच्या आणखी योजनांबद्दल जाणून घेण्यासाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.
खूप खूप धन्यवाद !