रामायणातील कलाकार आज कसे दिसतात भारतीय टेलिव्हिजनच्या इतिहासातील सर्वात जास्त लोकप्रिय आणि प्रेक्षकांनी पाहिलेला कार्यक्रम म्हणजे रामायण. रामानंद सागर यांनी रामायण कार्यक्रमाची निमिर्ती, लेखन आणि दिग्दर्शन केलं होतं. 1987 साली हा कार्यक्रम टीव्हीवर प्रसारित करण्यात आला होता.
लोकांनी या शोसोबतच यातील कलाकारांनाही डोक्यावर घेतलं आणि प्रसिद्धीचे सर्व रेकॉर्डस् या कार्यक्रमाने मोडले. या शोमधील कलाकारांची लोकप्रियता अशी होती की लोक त्याकाळी या कलाकारांना खरोखरचे देव मानायला लागले होते आणि सार्वजनिक ठिकाणी लोकं या कलाकारांना पाहताच त्यांचे पायासुद्धा पडत होते. आजही या शोमधील कलाकार लोकांमध्ये खूपच लोकप्रिय आहेत.
रामायणातील कलाकार आज कसे दिसतात
त्यामुळे आज आपण तेव्हाच्या रामायणातील कलाकार आज कसे दिसतात ते जाणून घेणार आहोत.
1. राम – अरुण गोविल
अरुण गोविल यांनी रामाची भूमिका साकारली होती. ते सध्या 64 वर्षांचे आहेत. रामाच्या भूमिकेमुळे त्यांची लोकप्रियता जबरदस्त आहे. लोक त्यांना आजही रामाच्या भूमिकेमुळे ओळखतात. त्यांनी पहेली, हिम्मतवाला, लवकुश, जुदाई या चित्रपटात सुद्धा काम केलं.
रामायणातील कलाकार आज कसे दिसतात सध्या ते अभिनयापासून दूर आहेत पण सोशल मीडियाच्या माध्यमातून खूप सक्रिय आहेत आणि आपल्या प्रशंसकांशी संपर्कात असतात.
2. सीता – दीपिका चिखलिया
दीपिका चिखलिया यांनी रामायणात सीताचं पात्र साकारलं होतं. त्यांची ही भूमिका अत्यंत लोकप्रिय ठरली होती. त्या सध्या 58 वर्षांच्या आहेत. रामायणासोबतच त्यांनी रुपये दस करोड, घर का चिराग, खुदाई, बाला, आशा ओ भालोबाशा यासारख्या चित्रपटात काम केलं. रामायणातील कलाकार आज कसे दिसतात निरमा सुपरच्या ऍडमधेही त्या दिसल्या होत्या. सोशल मीडियावरही त्या खूपच ऍक्टिव्ह असतात.
3. लक्ष्मण – सुनील लहरी
सुनील लहरी यांनी रामायणात लक्ष्मणची भूमिका साकारली होती. सध्या ते 62 वर्षांचे आहेत. त्यांनी अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये अभिनय केलाय. विक्रम वेताळ, दादा दादी की कहानिया या मालिकांमध्ये त्यांनी अभिनय केला यासोबतच बहारो के मंझिल या चित्रपटातसुद्धा अभिनय केला. रामायणातील कलाकार आज कसे दिसतात सुनील लहरी या वयातही खूपच फिट आहेत.
4. हनुमान – दारा सिंह
स्वर्गीय दारा सिंह यांनी रामायणात हनुमानचं पात्र साकारलं होतं. ते पहिलवान, अभिनेते, दिग्दर्शक आणि राजनेते होते. त्यांनी साकारलेलं पात्र प्रेक्षकांच्या खूपच पसंतीस उतरलं होतं. दारा सिंह यांनी मेरा नाम जोकर, किंग कांग, मर्द, लवकुश, कभी धूप कभी छाव यासारख्या चित्रपट आणि मालिकांमध्ये सुद्धा भूमिका साकारल्या आहेत. रामायणातील कलाकार आज कसे दिसतात आज ते आपल्यात नाहीत पण त्यांच्या कामाच्या माध्यमातून ते नेहमी आपल्यासोबत राहतील.
5. भरत – संजय जोग
स्वर्गीय संजय जोग यांनी रामायणात भरतची भूमिका केली होती. त्यांनी साकारलेली भरतची भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडली होती. भरत जोग हे मराठी सिनेमात उत्तम अभिनेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी अनेक मराठी सिनेमात अभिनय केला. आज ते आपल्यात नाहीत पण त्यांच्या अभिनयामुळे ते नेहमीच आपल्यासोबत राहतील.
6. रावण – अरविंद त्रिवेदी
स्वर्गीय अरविंद त्रिवेदी यांनी रामायणात रावणची भूमिका निभावली होती. आपल्या जबरदस्त अभिनयाच्या माध्यमातून त्यांनी ही भूमिका अजरामर केली. ते उत्तम अभिनेते आणि राजनेते होते.
लग्नाच्या 1 वर्षांनंतर या अभिनेत्रीने केला लग्नाचा खुलासा
अरविंद त्रिवेदी यांनी गुजराती सिनेमामध्ये 40 वर्ष काम केलंय. त्यांनी अनेक सामाजिक आणि पौराणिक नाटकांमध्ये काम केलं. यासोबतच त्रिमूर्ती, जंगल में मंगल, पराया धन यासारख्या चित्रपटात त्यांनी अभिनय केला. आज ते आपल्यात नाहीत. रामायणातील कलाकार आज कसे दिसतात. पण त्यांनी साकारलेल्या भूमिकांमुळे ते नेहमी आपल्यासोबत राहतील.
7. शत्रुघ्न – समीर राजदा
समीर राजदा यांनी रामायणात शत्रुघ्नचं पात्र साकारलं होतं. सध्या ते 60 वर्षांचे आहेत. प्रसिद्ध लेखक आणि दिग्दर्शक मूलराज राजदा यांचे ते पुत्र आहे. त्यांनी अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये अभिनय केलाय. सध्या ते गुजराती सिनेमात काम करतात.
8. मंथरा – ललिता पवार
ज्येष्ठ दिवंगत अभिनेत्री ललिता पवार यांनी रामायणात मंथराची भूमिका साकारली होती. त्यांनी मराठी, हिंदी आणि गुजराती भाषांमध्ये 700 पेक्षा जास्त सिनेमांमध्ये काम केलंय. रामायणातील कलाकार आज कसे दिसतात अभिनेत्री ललिता पवार यांच्या नावावर 70 वर्षांपेक्षा जास्त मोठं अभिनय करियर असल्याचं गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आहे.
9. कैकयी – पद्मा खन्ना
पद्मा खन्ना यांनी रामायणात कैकयीची भूमिका केली होती. त्या उत्तम अभिनेत्री, डान्सर आणि निर्देशक आहेत. भोजपुरी चित्रपटातही त्या प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. त्यांनी अनेक चित्रपटातसुद्धा अभिनय केलाय. रामायणातील कलाकार आज कसे दिसतात 2008 साली त्यांनी न्यूयॉर्कच्या एव्हरी फिशर हॉलमध्ये 64 ऍक्टर आणि डान्सर्ससोबत रामायणावर आधारित संगीत नाटकाचं दिग्दर्शन केलं आणि त्यात अभिनयही केला.
10. मांडवी – सुलक्षणा खत्री
मांडवी ही रामायणामध्ये भरतची पत्नी होती आणि तिला लक्ष्मी देवीच्या शंखचा अवतार मानलं जातं. तिचं पात्र सुलक्षणा खत्री यांनी साकारलं होतं. आजही सुलक्षणा खत्री अभिनयाशी निगडित आहेत. रामायणातील कलाकार आज कसे दिसतात त्यांनी अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये उत्तम अभिनय केला आहे.
11. कुश – स्वप्नील जोशी
स्वप्नील जोशीने रामायणात रामाचा मुलगा कुशची भूमिका केली होती. तेव्हा तो बालकलाकार होता. त्याची ही भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडली होती. यानंतर स्वप्नील जोशीने अनेक टीव्ही शो आणि रामायणातील कलाकार आज कसे दिसतात चित्रपटात अभिनय केला. आज तो मराठीतील आघाडीचा अभिनेता म्हणून ओळखला जातो.
मित्रांनो तुम्हाला हा आर्टिकल आवडला असेल तर आमचे दुसरे आर्टिकलसुद्धा नक्की वाचा.
खूप खूप धन्यवाद !