मराठी अभिनेत्री नवीन कार लोकप्रिय मराठी अभिनेत्री अनिता दाते केळकरच्या फॅन्ससाठी खूपच आनंदाची बातमी समोर आलीय. ती म्हणजे अनिताने नुकतीच ‘Hyundai Exter’ ही आलिशान कार खरेदी केली आहे. तिने ग्रे कलरची कार घेतलीय. या कारची किंमत अंदाजे 6 ते 10 लाखांपर्यंत असू शकते.
मराठी अभिनेत्री नवीन कार
अनिता आपल्या नवीन कारची डिलिव्हरी घेण्यासाठी शोरूमला गेली तेव्हा ती खूपच आनंदात दिसत होती. तिने शोरूममधून कारची डिलिव्हरी घेतानाचा व्हिडिओ आपल्या इंस्टाग्रामवर अकाउंटवर शेअर केला आहे. यावेळी तिच्यासोबत अभिनेते उमेश जगतापदेखील उपस्थित होते. अनिताने आपल्या नवीन गाडीची पूजा केली. त्यानंतर शोरूम वाल्यांनी कारची चावी देऊन तिचं अभिनंदन केलं. मग अनिताने केक कापून सेलिब्रेशन केलं आणि सर्वांना आपल्या हाताने केक भरवला.
मराठी अभिनेत्री नवीन कार अनिताने शेअर केलेला हा नवीन गाडीचा व्हिडिओ खूप व्हायरल होतोय. या व्हिडिओवर तिच्या फॅन्ससोबतच मनोरंजनविश्वातील मयुरी वाघ, राधिका आपटे, अक्षर कोठारी, श्रुती मराठे, शर्मिला शिंदे, किशोरी अंबिये, सुशील इनामदार या सर्व कलाकारांनी कमेंट करत तिला नवीन गाडीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
अमित भानुशाली सोडणार ठरलं तर मग मालिका
अनिताच्या अभिनयप्रवासाबद्दल बोललं तर ती ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेमुळे घराघरात लोकप्रिय झाली. याशिवाय तिने ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’, ‘नवा गडी नवं राज्य’ या मालिकांमध्येही भूमिका साकारल्यात. सध्या ती कलर्स मराठीवरील ‘इंद्रायणी‘ या नवीन मालिकेत आनंदीबाई ही भूमिका साकारताना दिसून येतेय.
अभिनेत्री अनिता दातेने विकत घेतली नवी कार
यासोबतच अनिताने अनेक मराठी चित्रपटांमध्येही काम केलंय. तिने वाळवी, मी वसंतराव, तुंबाड, अईय्या, अ पेईंग घोस्ट, कॉफी आणि बरंच काही, जोगवा, सनई चौघडे असे अनेक चित्रपटदेखील केलेत.
अनिता ‘माझ्या बायकोचा नवरा’ या नाटकात अभिनेता सागर देशमुख आणि पुष्कराज चिरपुटकरसोबत काम करतेय.
अनिता अभिनयक्षेत्रात खूपच यशस्वी आणि लोकप्रिय आहे. याशिवाय ती सोशल मीडियावरसुद्धा खूप सक्रिय असते. तिचे लाखों फॉलोअर्सदेखील आहेत. या माध्यमातून ती आपल्या फॅन्सच्या नेहमी संपर्कात राहते.
आता मराठी अभिनेत्री नवीन कार अनिताने आयुष्यात आणखी एक पायरी पुढे जात नवीन गाडी घेतलीय त्यामुळे तिचे फॅन्स खूपच खुश झाले आहेत आणि तिला शुभेच्छा देत आहेत.
मनोरंजनविश्वातील अशाच नवनवीन बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईटला नक्की फॉलो करा.
तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद !