ठरलं तर मग फेम अभिनेता अमित भानुशाली सध्या ‘ठरलं तर मग’ मालिकेत अर्जुन सुभेदार ही भूमिका साकारतोय. या मालिकेत अर्जुन हा एक अत्यंत हुशार वकील आहे. अमितची ही भूमिका प्रेक्षकांना फारच आवडतेय. अमित भानुशाली आणि जुई गडकरीची जोडी ही सध्या मराठी मालिकाविश्वातील नंबर 1 ची जोडी आहे. टीआरपी रेटिंगमध्येही ते टॉपला आहेत. प्रेक्षकांचं भरपूर प्रेम या मालिकेला मिळतंय.
ठरलं तर मग
अभिनेता अमित भानुशालीचे असंख्य फॅन्स आहेत. तो सोशल मीडियावरही खूप सक्रिय असतो. त्याने नुकताच आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून व्हिडिओ शेअर करत फॅन्सना आनंदाची बातमी दिली आहे. ती म्हणजे लवकरच अमित आपल्याला ‘ठरलं तर मग’ या मालिकेशिवाय आणखी एका दुसऱ्या शोमध्ये दिसणार आहे.
अमित भानुशाली दिसणार मी होणार सुपरस्टारमध्ये
अमित भानुशाली लवकरच आपल्याला स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मी होणार सुपरस्टार जोडी नंबर 1’ या शोमध्ये पाहायला मिळणार आहे.
मी होणार सुपरस्टार जोडी नंबर 1 या शोमध्ये अभिनेत्री समृद्धी केळकरसोबत सूत्रसंचालन करताना अमित भानुशाली आपल्याला दिसणार आहे.
या शोचं सूत्रसंचालन समृद्धी केळकर करते, पण सध्या तिच्याबरोबर प्रत्येक भागात स्टार प्रवाहवरील मालिकेतील अभिनेते पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे अमित भानुशाली आपल्याला समृद्धी केळकरसोबत या शोचं सूत्रसंचालन करताना दिसेल.
येत्या शनिवारी आणि रविवारी रात्री 9 वाजता अमित भानुशाली आपल्याला ‘मी होणार सुपरस्टार जोडी नंबर 1’ शोमध्ये सूत्रसंचालन करताना दिसेल. त्याच्या फॅन्ससाठी ही खूपच आनंदाची बातमी आहे.
अमितने आपल्या इंस्टाग्रामवरून या शोच्या सेटवरील व्हिडिओ शेअर केलाय. तो या सेटवर फिरताना दिसतोय, समृद्धी केळकरसोबत आणि अप्सरा चित्रपटाच्या कलाकारांसोबत गप्पा मारताना दिसतोय. अमित या शोमध्ये खूपच धमाल करताना दिसतोय.
अमित आपल्याला या शोमध्ये एका नवीन अंदाजात पाहायला मिळणार आहे. तो आपल्याला शोचं सूत्रसंचालन करताना दिसणार आहे. यामुळे ठरलं तर मग अमितचे फॅन्स खूपच आनंदात आहेत आणि ते अमितला या शोमध्ये पाहण्यासाठी प्रचंड उत्सुक आहेत.
मनोरंजनविश्वातील अशाच नवनवीन बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईटला नक्की फॉलो करा.
तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद !