Sukh Kalale Serial Cast | सुख कळले मालिकेतील कलाकार

Sukh Kalale Serial Cast

Sukh Kalale Serial Cast ‘सुख कळले‘ ही नवीन मालिका 22 एप्रिल पासून सोमवार ते शुक्रवार रात्री 9 वाजता कलर्स मराठी चॅनलवर सुरू झाली आहे. या मालिकेची कथा एका जोडप्यावर आधारित आहे. मिथिला आणि माधवच्या प्रेमाची ही कथा आहे. हे दोघे वयाच्या एका टप्प्यावर एकमेकांना सांभाळत, एकमेकांना सावरत जीवनप्रवास करताना आपल्या परिवाराची कशी काळजी घेतात हे आपल्याला मालिकेत पाहायला मिळणार आहे.

Sukh Kalale Serial Cast 

आज आपण या मालिकेतील कलाकारांची माहिती जाणून घेणार आहोत.

1. स्पृहा जोशी – स्पृहा या मालिकेत मिथिला ही भूमिका साकारताना दिसतेय. ती मालिकेची नायिका आहे आणि माधवची बायको आहे. लोकमान्य मालिकेनंतर स्पृहा या मालिकेत दिसतेय.

स्पृहा जोशी
स्पृहा जोशी

2. सागर देशमुख – सागर या मालिकेत माधवच्या भूमिकेत दिसणार आहे. तो या मालिकेचा नायक आहे आणि मिथिलाचा नवरा आहे.

सागर देशमुख
सागर देशमुख

3. मिमी खडसे – बालकलाकार मिमी या मालिकेत माहीची भूमिका साकारतेय. ती मिथिला आणि माधवची मुलगी आहे.

मिमी खडसे
मिमी खडसे

4. स्वप्नील परजणे – स्वप्नील या मालिकेत अद्वैतची भूमिका साकारतोय. तो मिथिलाच्या भावाच्या भूमिकेत आहे.

स्वप्नील परजणे
स्वप्नील परजणे

5. सुनील गोडबोले – ते या मालिकेत तात या भूमिकेत दिसतील. ते माधवच्या बाबांच्या भूमिकेत आहेत.

Sukh Kalale Colors Marathi Serial Cast
Sukh Kalale Colors Marathi Serial Cast

याशिवाय मालिकेत (Sukh Kalale Serial Cast) अर्णवी खडसे, अनिरुद्ध जोशी, स्वाती देवल, स्वराध्य देवल, आरती वडगबाळकर, शशांक दर्णे, स्वाती बोवलेकर हे सर्व कलाकार आहेत. या मालिकेची कथा मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध लेखक दिग्दर्शक केदार शिंदे यांची आहे. मालिकेची निर्मिती सुचित्रा बांदेकर आणि सोहम बांदेकर यांच्या सोहम प्रोडक्शन्सने केली आहे.

Tharla Tar Mag Serial Cast | ठरलं तर मग मालिकेची कास्ट

‘सुख कळले’ या मालिकेची कथा आणि सर्वच कलाकारांचा (Sukh Kalale Serial Cast) अभिनय प्रेक्षकांना फारच आवडतोय. या मालिकेत येत्या काळात अनेक चढउतार येणार आहेत त्यामुळे ती प्रेक्षकांची अजूनच जास्त आवडती मालिका होईल.

मनोरंजनविश्वातील अशीच महत्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईटला नक्की फॉलो करा. 

तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद !

Scroll to Top