How To Open Petrol Pump मित्रांनो पेट्रोल डिझेलचे भाव सध्या गगनाला भिडले आहेत तरी सामान्य माणसाला ते विकत घेतल्याशिवाय पर्याय नाही कारण त्याशिवाय ट्रान्सपोर्ट पूर्णपणे ठप्प होऊन जाईल.
आपल्या देशात पेट्रोल डिझेलची मागणी जबरदस्त आहे. एखादा दिवस जरी पेट्रोल पंपांचा संप असला तरी सगळ्या गोष्टी ठप्प होऊन जातात. आपलं आयुष्यचं थांबल्यासारखं वाटतं.
How To Open Petrol Pump
पेट्रोल डिझेलला पर्याय म्हणून CNG आणि इलेक्ट्रिक वाहने आलीत पण त्यांचा वापर अजूनही मोठ्या प्रमाणावर केला जात नाही.
पेट्रोल डिझेलच्या वाढलेल्या भावाकडे पाहून सामान्य माणसाच्या मनात नेहमी विचार येतो की सरकारची सगळ्यात जास्त कमाई पेट्रोल डिझेलमधूनच होते आणि या पेट्रोल पंपच्या व्यवसायातून खूपच कमाई होते.
त्यामुळेच आज आपण पेट्रोल पंप कसा उघडायचा, (How To Open Petrol Pump) त्यासाठी काय प्रक्रिया असते, कुठे अर्ज करावा लागतो, यातून कमाई किती होते हे सगळं जाणून घेणार आहोत.
पेट्रोल पंप उघडण्यासाठी पात्रता :
1. पेट्रोल पंप उघडण्यासाठी (How To Open Petrol Pump) अर्ज करणारा उमेदवार हा भारतीय नागरिक असावा.
2. उमेदवाराचं वय कमीतकमी 21 वर्ष आणि जास्तीत जास्त 55 वर्ष असावं.
3. जर तुम्हाला शहरी भागात पेट्रोल पंप उघडायचा असेल तर तुमचं शिक्षण 12 वी पास असावं आणि ग्रामीण भागात पेट्रोल पंप उघडायचा असेल तर तुमचं शिक्षण 10 वी पास असावं.
4. पेट्रोल पंप उघडण्यासाठी (How To Open Petrol Pump) उमेदवाराकडे स्वतःची जागा आणि गुंतवणुकीसाठी पैसे हवेत.
5. ज्या जमिनीवर पेट्रोल पंप उघडायचा आहे ती शेतजमीन नसावी.
6. उमेदवाराकडे पेट्रोल पंपासाठी स्वतःची जमीन असावी किंवा मग दुसऱ्याची जमीन असेल तर त्याची NOC असावी.
इंटरनेट बँकिंगबद्दल संपूर्ण माहिती
पेट्रोल पंप उघडण्यासाठी लागणारी कागदपत्रे :
पेट्रोल पंपासाठी खालील कागदपत्रे महत्त्वाची असतात :
1. आधारकार्ड
2. पॅनकार्ड
3. जमिनीच्या नकाशाबद्दल आवश्यक कागदपत्रे
4. जमीन लीजवर घेतली असेल तर त्याबद्दल कागदपत्रे
5. बँक पासबुकचे डिटेल्स
6. तुमचा पासपोर्ट साईझ फोटो
पेट्रोल पंप डीलरशीप घेण्यासाठी किती फी द्यावी लागते :
ग्रामीण भागात पेट्रोल पंप डीलरशीपसाठी किती फी द्यावी लागते :
सामान्य वर्गातील लोकांना 8000 रुपये फी द्यावी लागते.
मागासवर्गीय वर्गातील लोकांना 4000 रुपये फी द्यावी लागते.
अनुसूचित जाती जमातीतील लोकांना 2000 रुपये फी द्यावी लागते.
शहरी भागात पेट्रोल पंप डीलरशीपसाठी किती फी द्यावी लागते :
सामान्य वर्गातील लोकांना 10000 रुपये फी द्यावी लागते.
मागासवर्गीय वर्गातील लोकांना 5000 रुपये फी द्यावी लागते.
अनुसूचित जाती जमातीतील लोकांना 3000 रुपये फी द्यावी लागते.
पेट्रोल पंप उघडण्यासाठी (How To Open Petrol Pump) पैसे आणि जमीन किती लागते :
तुम्हाला जर पेट्रोल पंप हायवेच्या जवळ उघडायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला 1200 ते 1600 वर्ग मीटर जमिनीची आवश्यकता असेल.
अशा हायवेजवळच्या जमिनीला पाणी आणि विजेची उपलब्धता सुद्धा हवी.
त्याचबरोबर तुम्हाला जर ग्रामीण भागात पेट्रोल पंप उघडायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला 15 ते 20 लाख रुपयांचं भांडवल लागेल.
शहरी भागात पेट्रोल पंप उघडायचा असेल तर तुम्हाला 30 ते 35 लाख रुपये भांडवल लागेल.
पेट्रोल पंप उघडण्याचे फायदे :
पेट्रोल पंप उघडल्यानंतर (How To Open Petrol Pump) तुमचा आर्थिक फायदा खूप होऊ शकतो.
1. पेट्रोल पंपवर ज्या पेट्रोल डिझेलची विक्री केली जाते त्यावर ऑईल कंपनी दर लीटरमागे पेट्रोल पंप मालकांना 2 ते 3 रुपयांचं कमिशन देते.
2. या बिझनेसमध्ये जोखीम खूप कमी असते.
3. पेट्रोल पंप उघडण्यासाठी तुम्हाला बँकेकडून कर्ज सुद्धा मिळवू शकतं. बँकेकडून 50 हजार रुपये ते 2 करोड रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकतं.
पेट्रोल पंपची डीलरशीप घेण्यासाठी अर्ज कसा करायचा :
कोणत्याही नव्या ठिकाणी पेट्रोल पंप सुरू करायचा असेल (How To Open Petrol Pump) तर ऑईल कंपन्या त्याबद्दल जाहिरात प्रकाशित करते.
या जाहिरातींमध्ये ऑईल कंपनी पेट्रोल पंप खोलण्याबद्दल सर्व माहिती देते त्यावर तुम्हाला लक्ष द्यावं लागतं. ऑईल कंपन्यांकडूनच पेट्रोल पंप खोलण्याचं लायसेन्स मिळतं.
पेट्रोल पंप डीलरशीपसाठी (How To Open Petrol Pump) तुम्हाला पेट्रोल पंप डीलर चयनच्या ऑफिशियल वेबसाईटवर जावं लागेल. तिथे तुम्ही रजिस्ट्रेशन करून ऑनलाईन फॉर्म भरू शकता आणि फीसुद्धा भरू शकता.
अशाप्रकारे तुम्ही पेट्रोल पंप डीलरशीपसाठी ऑनलाईन ऍप्लिकेशन करू शकता.
मित्रांनो तुम्हाला हा आर्टिकल उपयोगी वाटला असेल तर आमचे दुसरे आर्टिकलसुद्धा नक्की वाचा.
खूप खूप धन्यवाद !