What Is Internet Banking बँकेचे व्यवहार हे आपल्या दैनंदिन जीवनातील खूप महत्त्वाचा भाग आहे. प्रत्येक माणसाला कधी ना कधी बँकेत आपल्या कामासाठी जावंच लागतं.
पण बँकेत गेल्यावर प्रत्येक माणसाची एकच तक्रार असते ती म्हणजे बँकेत असणाऱ्या लांबच लांब रांगा. या लांब रांगेत उभं राहायला प्रत्येकालाच कंटाळा येतो. याशिवाय बँकेचे कर्मचारी आपलं काम खूपच संथ गतीने करतात यामुळेही आपल्याला त्रास होतो.
What Is Internet Banking
पण यावर एक उपाय म्हणजे इंटरनेट बँकिंग. आजच्या वाढत्या डिजिटल युगामध्ये बँकिंग व्यवहारासाठी इंटरनेट बँकिंग (What Is Internet Banking) हे खूपच सोपं आणि सोयीस्कर आहे. प्रत्येक बँकेने आपल्या ग्राहकांना ऑनलाईन बँकिंग फॅसिसिटी पुरवण्यासाठी इंटरनेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंग वेबसाईट लॉंच केल्या आहेत.
इंटरनेट बँकिंग म्हणजे काय ?
इंटरनेट बँकिंग (What Is Internet Banking) म्हणजे तुम्ही इंटरनेटच्या साहाय्याने घरबसल्या सर्व बँकिंग व्यवहार करू शकता ज्यासाठी तुम्हाला आधी बँकेत जावं लागायचं.
प्रत्येक बँकेने आपल्या वेबसाईट लॉंच केल्या आहेत त्या वेबसाईटवर लॉगिन करून आपण बँकिंग सुविधांचा लाभ घेऊ शकतो.
इंटरनेट बँकिंगला नेट बँकिंग किंवा ऑनलाईन बँकिंगसुद्धा म्हटलं जातं.
इंटरनेट बँकिंगचा (What Is Internet Banking) वापर करण्यासाठी आपल्याकडे ऍक्टिव्ह बँक अकाऊंट असणं गरजेचं आहे आणि तुम्हाला ऑनलाईन बँकिंगसाठी रजिस्टर सुद्धा करावं लागेल त्यानंतरच तुम्ही इंटरनेट बँकिंगचा वापर करू शकता.
इंटरनेट बँकिंग खूपच सोपं, सोयीस्कर आणि सुरक्षित आहे.
इंटरनेट बँकिंग (What Is Internet Banking) आल्यापासून आपल्याला आर्थिक व्यवहारांसाठी बँकेत जायची गरज राहिलेली नाही.
इंटरनेट बँकिंगसाठी रजिस्टर कसं करायचं :
इंटरनेट बँकिंग (What Is Internet Banking) वापरण्यासाठी खालीलप्रमाणे प्रक्रिया करावी :
1. तुम्ही बॅंकेत जाऊन इंटरनेट बँकिंगचा फॉर्म भरू शकता. अनेकदा अकाऊंट ओपनिंग करतानाच नेट बँकिंगची किट सोबत दिली जाते. त्यावेळीही तुम्ही फॉर्म भरू शकता.
किंवा बँकेच्या ऑफिशियल वेबसाईटवरून तुम्ही फॉर्म डाऊनलोड करू शकता आणि मग तो भरून प्रिंट काढू शकता.
त्यानंतर हा फॉर्म बँकेत जमा करायचा आहे.
बँकेचे प्रतिनिधी व्हेरिफिकेशन करतील आणि त्यानंतर तुम्हाला User ID आणि Password मिळेल त्याच्या साहाय्याने तुम्ही नेट बँकिंगसाठी लॉगिन करू शकता.
इंटरनेट बँकिंगद्वारे आपण काय काय करू शकतो :
इंटरनेट बँकिंगद्वारे (What Is Internet Banking) आपण घरबसल्या बँकेची अनेक कामे करू शकतो :
1. तुम्ही तुमचा बँक बॅलन्स कधीही चेक करू शकता.
2. तुम्ही तुमच्या बँक अकाऊंटला लिंक असलेलं लोनसुद्धा पाहू शकता.
3. बिल पेमेंट करू शकता आणि दुसऱ्याच्या अकाऊंटला पैसेही ट्रान्सफर करू शकता.
4. तुम्ही जनरल इन्शुरन्स खरेदी करू शकता.
5. ऑटोमॅटिक पेमेंट आणि स्टँडिंग ऑर्डर्स सेट करू शकता किंवा मग कॅन्सलही करू शकता.
6. तुम्ही चेक बुकसुद्धा मागवू शकता.
7. बँक अकाऊंटशी लिंक असलेल्या इन्व्हेस्टमेंटसुद्धा पाहू शकता.
8. इंटरनेट बँकिंग (What Is Internet Banking) तुमच्या ID आणि पासवर्डमुळे खूपच सुरक्षित असते.
इंटरनेट बँकिंगचे फायदे :
1. इंटरनेट बँकिंग (What Is Internet Banking) हे खूपच सुरक्षित आणि फास्ट आहे. इंटरनेट बँकिंगच्या वापराने तुम्ही पैसे ट्रान्सफर करू शकता, ऑनलाईन पेमेंट करू शकता. तुमच्या User ID आणि पासवर्डमुळे हे खूपच सुरक्षित आहे.
2. बँकेप्रमाणे इंटरनेट बँकिंगला कोणतीही टाईमलिमिट नसते. दिवसरात्र कोणत्याही वेळी तुम्ही बँकिंग सुविधांचा वापर करू शकता. सर्व सुविधा ऑनलाईन असल्यामुळे वेळेची मर्यादा नसते. तुम्ही कधीही बँक बॅलन्स चेक करू शकता, पैसे ट्रान्सफर करू शकता आणि अकाऊंट स्टेटमेंट काढू शकता.
3. इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून आपण जे आर्थिक व्यवहार केलेत त्यांचं व्यवस्थित रेकॉर्ड ठेवू शकतो. अकाऊंट होल्डरचं नाव, बँक अकाऊंट नंबर, अमाऊंट आणि पेमेंटची डेट आणि टाईम ही सर्व इन्फॉर्मेशन आपल्याला दिसते.
4. इंटरनेट बँकिंगमध्ये (What Is Internet Banking) आपण आपल्या सुविधेने कधीही पैसे ट्रान्सफर करू शकतो किंवा बिल पेमेंट करू शकतो. यासाठी आपल्याला कोणत्याही रांगेत उभं राहण्याची गरज नाही.
5. बँक बॅलन्स चेक करणं, चेक बुक मागवणे, बँक अकाऊंट स्टेटमेंट पाहणं या गोष्टीसुद्धा आपण घरबसल्या करू शकतो.
इंटरनेट बँकिंगद्वारे आपण पैसे कसे पाठवू शकतो :
इंटरनेट बँकिंगद्वारे (What Is Internet Bankin आपण NEFT, RTGS, आणि IMPS या 3 प्रकारे पैसे ट्रान्सफर करू शकतो.
1. NEFT द्वारे आपण 24 तासात कधीही दुसऱ्याच्या अकाऊंटवर पैसे पाठवू शकतो. NEFT द्वारे 10 मिनिटांत पैसे ट्रान्सफर होऊ शकतात.
2. RTGS द्वारे लगेच पैसे ट्रान्सफर केले जातात. RTGS द्वारे मोठ्या अमाऊंट ट्रान्सफर केल्या जातात. कमीतकमी 2 लाख रुपये पाठवू शकता आणि जास्त अमाऊंटची काही लिमिट नाही.
RTGS सुविधाद्वारे तुम्ही कधीही पैसे पाठवू शकता.
3. IMPS सुविधेद्वारे आपण दुसऱ्या व्यक्तीला फक्त त्याच्या मोबाईल नंबरच्या साहाय्याने पैसे पाठवू शकतो. त्यासाठी बँक अकाऊंट नंबर आणि IFSC कोडची आवश्यकता नाही.
IMPS सुविधेचा वापर करून मोबाईल, इंटरनेट आणि ATM द्वारे (What Is Internet Banking) पैसे पाठवले जातात. NEFT आणि RTGS पेक्षा IMPS खूपच स्वस्त आहे.
आजच्या डिजिटल युगात इंटरनेट बँकिंगमुळे बँक ही आपल्या घरीच आली आहे. घरबसल्या आपण बँकेचे सर्व व्यवहार करू शकतो. इंटरनेट बँकिंगमुळे बँकेचे सर्व व्यवहार सामान्य माणसासाठी खूपच सोपे झाले आहेत त्यामुळे प्रत्येक नागरिकाने इंटरनेट बँकिंगचा वापर केलाच पाहिजे.
मित्रांनो तुम्हाला हा आर्टिकल आवडला असेल तर आमचे दुसरे आर्टिकलसुद्धा नक्कीच वाचा.
खूप खूप धन्यवाद !