DigiLocker Information In Marathi आपल्याकडे अनेक महत्वाची कागदपत्रे असतात ज्याची आपल्याला कोणतंही काम करताना खूप गरज पडते. ही कागदपत्रे खूप सांभाळूनही ठेवावी लागतात कारण त्याशिवाय आपलं काम अडू शकतं.
पण अनेकदा ही कागदपत्रे हरवून जातात त्यामुळे आपलं मोठं नुकसान होऊ शकतं. अशीच महत्वाची कागदपत्रे सांभाळून ठेवण्यासाठी सरकारने आपल्याला एक डिजिटल माध्यम दिलं आहे.
DigiLocker Information In Marathi
ते म्हणजे (DigiLocker Information In Marathi) डिजीलॉकर. या डिजीलॉकरमध्ये आपण आपली सर्व महत्त्वाची
कागदपत्रे सांभाळून ठेवू शकतो आणि ही कागदपत्रे डिजिटल स्वरूपात असल्यामुळे हरवण्याचंही टेन्शन राहणार नाही.
डिजीलॉकर म्हणजे काय ?
डिजीलॉकर म्हणजे डिजिटल लॉकर.
डिजिटल इंडिया या योजनेअंतर्गत डिजीलॉकर (DigiLocker Information In Marathi) ही सुविधा सरकारने देशातील नागरिकांसाठी बनवली आहे.
या सुविधेद्वारे सरकारचं उद्दिष्ट हे पेपरलेस सिस्टीम बनवणं आणि देशातील वेगवेगळ्या संस्थांमध्ये इलेक्ट्रॉनिक डॉक्युमेंट्सची देवाणघेवाण सुद्धा आहे.
या लॉकरमध्ये आपण आपली महत्वपूर्ण कागदपत्रे अपलोड करून सुरक्षित ठेवू शकतो.
प्रधानमंत्री मुद्रा योजनेची संपूर्ण माहिती
या डिजीलॉकरमध्ये कागदपत्रे अपलोड करण्यासाठी तुम्हाला आधारकार्डची गरज आहे. आधारकार्ड शिवाय तुम्ही डिजीलॉकरची सुविधा वापरू शकत नाही.
डिजीलॉकरमध्ये (DigiLocker Information In Marathi) तुम्ही तुमची सर्व कागदपत्रे अपलोड करून सुरक्षित ठेवू शकतात आणि नंतर तुम्ही डाऊनलोड सुद्धा करू शकता. जर दुसऱ्या कोणाला द्यायचे असतील तर त्याला पाठवू सुद्धा शकता.
ही सुविधा वापरणं अगदी मोफत आहे यासाठी तुम्हाला काहीही पैसे द्यायची गरज नाही.
डिजीलॉकर वापरायला खूपच सोपं आणि सुरक्षित आहे.
डिजीलॉकरचे फायदे :
1. डिजीलॉकरमध्ये कागदपत्रे स्कॅन करून अपलोड केले जातात. कागदपत्रे डिजीलॉकरमध्ये सांभाळून ठेवले की ओरिजिनल कागदपत्रे सोबत ठेवण्याची गरज नाही.
2. डिजीलॉकरमध्ये (DigiLocker Information In Marathi) तुमची महत्वाची कागदपत्रे सुरक्षित ठेवली जातात.
3. डिजीलॉकर सुविधा फ्री आहे त्यामुळे यासाठी काहीही पैसे लागत नाही.
4. ही कागदपत्रे तुम्ही कधीही डिजीलॉकरमधून डाऊनलोड करू शकता किंवा दुसऱ्या कोणाबरोबर शेअरसुद्धा करू शकता.
5. डिजीलॉकर वापरण्यास खूप सोपं आणि सुरक्षित असल्यामुळे कुठेही सहज वापरू शकता.
डिजीलॉकरमध्ये अकाऊंट कसं उघडायचं :
1. डिजीलॉकरमध्ये (DigiLocker Information In Marathi) अकाऊंट उघडण्यासाठी तुम्हाला प्लेस्टोरवरून digilocker ऍप डाउनलोड करावं लागेल किंवा digilocker च्या ऑफिशियल वेबसाईट https://www.digilocker.gov.in/ वर जावं लागेल.
2. त्यानंतर होमपेजवर sign up वर क्लिक करायचं. समोर आलेल्या फॉर्ममध्ये सर्व वैयक्तिक माहिती भरायची आहे.
3. फॉर्म सबमिट केल्यानंतर तुम्ही माहिती दिलेल्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल तो ओटीपी भरल्यानंतर तुम्हाला काही प्रश्न विचारले जातील त्याची उत्तरे दिल्यानंतर तुमचं अकाऊंट तयार होईल.
4. आता तुम्ही तुमच्या digilocker अकाऊंटला sign in करून तुमची कागदपत्रे अपलोड करून सुरक्षित ठेवू शकता.
डिजीलॉकरमध्ये लॉगिन कसं करायचं :
डिजीलॉकरमध्ये लॉगिन करण्यासाठी तुम्हाला डिजीलॉकरच्या ऍप किंवा ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन sign in ऑप्शनवर क्लिक करावं लागेल.
त्यानंतर तुमच्यासमोर एक पेज ओपन होईल त्यात विचारली गेलेली माहिती आधार नंबर किंवा मोबाईल नंबर टाकावा लागेल.
नंतर तुमच्या मोबाईलवर ओटीपी येईल तो टाकल्यानंतर तुम्ही sign in ऑप्शनवर क्लिक केल्यावर तुम्ही लॉगिन होऊन जाल.
डिजीलॉकरमध्ये कागदपत्रे अपलोड कसे करायचे :
1. डिजीलॉकरमध्ये (DigiLocker Information In Marathi) कागदपत्रे अपलोड करायचे असतील तर सर्वात आधी digilocker ऍप किंवा digilocker च्या ऑफिशियल वेबसाईटवर लॉग इन करावं लागेल.
2. लॉग इन केल्यानंतर तुमच्या अकाऊंटमध्ये तुम्हाला 2 ऑप्शन दिसतील. पहिल्या ऑप्शनमध्ये तुम्हाला सरकारी एजन्सीद्वारे जाहीर केलेले प्रमाणपत्र आणि त्यांची माहिती दिसेल. तर दुसऱ्या ऑप्शनमध्ये तुम्हाला जी कागदपत्रे अपलोड करायची आहेत त्यासाठी अपलोडचा ऑप्शन दिसेल.
3. त्यानंतर तुम्हाला जे डॉक्युमेंट अपलोड करायचं असेल ते मीडियामधून सिलेक्ट करायचं. नंतर my document या ऑप्शनवर क्लिक करायचं.
4. विचारलेली माहिती भरून अपलोड ऑप्शनवर क्लिक करायचं.
अशाप्रकारे तुम्ही तुमची कागदपत्रे डिजीलॉकरवर अपलोड करू शकता.
डिजीलॉकर (DigiLocker Information In Marathi) ही सुविधा डिजिटल इंडिया या योजनेअंतर्गत उदयास आली आहे. तुमचे सर्व डॉक्युमेंट्स हे डिजिटल स्वरूपात सेव्ह केले जातात त्यामुळे कागदाची आवश्यकता कमी होते आणि याचा वृक्षतोड थांबवण्यास खूप मदत होते. ही सरकारने पुरवलेली खूप प्रशंसनीय सुविधा आहे.
मित्रांनो तुम्हाला हा आर्टिकल आवडला असेल तर आमचे दुसरे आर्टिकलसुद्धा नक्की वाचा.
खूप खूप धन्यवाद !