Spruha Joshi Bollywood Debut अभिनेत्री स्पृहा जोशीची ‘सुख कळले’ ही नवीन मालिका कलर्स मराठी वाहिनीवर नुकतीच सुरू झाली आहे. या मालिकेतील स्पृहाची भूमिका सर्वांना खूपच आवडतेय. आता स्पृहा जोशीच्या फॅन्ससाठी आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.
अभिनेत्री स्पृहा जोशी आपल्याला लवकरच हिंदी वेबसिरीजमध्ये महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. नुकतीच प्रदर्शित झालेल्या ‘रणनीती’ या वेबसिरीजमध्ये तिने भूमिका साकारली आहे. या वेबसिरीजमध्ये तिने बॉलीवूड अभिनेता जिमी शेरगिलसोबत काम केलंय.
Spruha Joshi Bollywood Debut
याबद्दल स्पृहाने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. स्पृहाने पोस्टमध्ये लिहलंय की, रणनीती सिरीजमध्ये छोट्याशा भूमिकेसाठी मला जे प्रेम मिळालं कौतुक झालं त्यासाठी मी खूप आनंदी आहे आणि सदैव ऋणी राहीन. ही सिरीज तुम्ही जिओ सिनेमावर बघू शकता.
अतिशय चांगला माणूस आणि माझ्या सर्वात आवडत्या जिमी शेरगिलसोबत ‘रंगबाज फिरसे’ नंतर पुन्हा एकदा काम करणं खूप अद्भुत होतं. सेटवरील प्रत्येक क्षण हा मनात साठवण्यासारखा अनुभव होता.
कलर्स मराठी नवीन मालिका सुख कळले
इतक्या उत्तम कलाकारासोबत काम करण्याची संधी दिल्याबद्दल आणि या प्रवासाचा भाग असल्याबद्दल मी खूप आभारी आहे.
ही जादू मिस करू नका आणि रणनीती सिरीज जिओ सिनेमावर लगेच पहा.
या शब्दांत स्पृहाने (Spruha Joshi Bollywood Debut) आपलं मनोगत व्यक्त केलं आहे.
स्पृहाची भूमिका असलेली ही वेबसिरीज तिच्या अनेक फॅन्सनी बघितलीदेखील आहे आणि त्यांनी तिच्या पोस्टवर कमेंट करत तिचं उत्तम अभिनयासाठी कौतुकसुद्धा केलंय. मराठी कलाकारांनी आणि स्वतः जिमी शेरगिलने कमेंट करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
अभिनेत्री स्पृहा जोशी करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण
रणनीती वेबसिरीज ही बालाकोट एअरस्ट्राईक या घटनेवर बनवली गेली आहे. प्रेक्षकांना एअरस्ट्राईक संदर्भात आणखी माहिती मिळणार आहे. या वेबसिरीजमध्ये जिमी शेरगिल, लारा दत्ता हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. आता त्यांच्यासोबतच आपली मराठमोळी अभिनेत्री स्पृहा जोशीसुद्धा (Spruha Joshi Bollywood Debut) महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार असल्यामुळे तिचे फॅन्स खूप खुश झाले आहेत.
सध्या मराठीतील अनेक लोकप्रिय कलाकारांनी हिंदीतील चित्रपट आणि वेबसिरीजमध्ये उत्तम भूमिका साकारायला सुरुवात केलीय. त्यांचं काम प्रेक्षकांना फार आवडतंय. यातच आता स्पृहा जोशीनेसुद्धा हिंदीत आपल्या उत्तम अभिनयाची छाप पाडली आहे. सगळीकडे तिचं खूप कौतुक केलं जातंय.
मनोरंजनविश्वातील अशाच नवनवीन बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईटला नक्की फॉलो करा.
तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद !