Kanyadan Serial Actor Marriage मराठी मालिकाविश्वातील आणखी एक प्रसिद्ध अभिनेता नुकताच लग्नबंधनात अडकला आहे. ‘कन्यादान’ मालिकेतील लोकप्रिय अभिनेता चेतन गुरवने 2 मेला धुमधडाक्यात लग्न केलं. चेतनने पायल हरमलकर हिच्याशी लग्न केलंय. या दोघांची जोडी खूपच सुंदर दिसत होती.
चेतन आणि पायलच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. या दोघांनी मस्त पोजमध्ये फोटो काढले आहेत. चेतन आणि पायलने आपल्या लग्नासाठी मराठमोळा लूक केला होता. चेतनने लग्नात पांढऱ्या रंगाचा सदरा घातला होता त्यावर पिवळ्या रंगाची किनार होती आणि त्याने मरून कलरचा शेला आणि डोक्यावर फेटा घातला होता.
Kanyadan Serial Actor Marriage
तर पायलने पिवळ्या रंगाची नऊवारी साडी त्यावर वर्क केलेला मरून कलरचा ब्लाऊज, सुंदर दागिने आणि हिरवा चुडा असा लूक केला होता. हे दोघेही नवरी नवरदेवाच्या वेशात खूपच सुंदर दिसत होते. पाहुणेमंडळी म्हणून मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकार त्यांच्या लग्नासाठी हजर होते.
दोन दिवसांपूर्वी चेतनची (Kanyadan Serial Actor Marriage) हळद खूप आनंदात पार पडली. अनेक कलाकार या हळदीला हजर होते. चेतनने हळदीचे फोटोसुद्धा सोशल मीडियावर शेअर केले होते.
कन्यादान फेम अभिनेता चेतन गुरवचं लग्न
चेतन आणि पायलला त्यांच्या लग्नासाठी आणि पुढील आयुष्यासाठी अनेक कलाकारांनी आणि फॅन्सनी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.
अभिनेता चेतन गुरव (Kanyadan Serial Actor Marriage) सोशल मीडियावरसुद्धा खूपच लोकप्रिय आहे. त्याने आपल्या हळदीचे आणि लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. या निमित्ताने फॅन्सना त्याच्या लग्नाचे फोटो पाहायला मिळालेत त्यामुळे त्याचे फॅन्स खूप आनंदात आहेत.
या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचं लग्न
मागील काही दिवसांमध्ये अनेक मराठी कलाकारांनी लग्न करून आपल्या नवीन आयुष्याला सुरुवात केलीय. अनेकांनी आपल्या लग्नातील सुंदर फोटोसुद्धा फॅन्ससोबत शेअर केलेत. आता अभिनेता चेतन गुरवनेसुद्धा लग्न करत फॅन्सना आनंदाची बातमी दिली आहे. या बातमीमुळे चेतनचे फॅन्स खूपच खुश आहेत.
मनोरंजनविश्वातील अशाच नवनवीन बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईटला नक्की फॉलो करा.
तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद !