Mutual Fund Information In Marathi आजकालच्या महागाईच्या काळात दैनंदिन खर्च भागवणे खूपच अवघड होत चाललं आहे त्यामुळे पैसे कमावण्याबरोबरच पैसे वाचवणे हीसुद्धा एक कला आहे. पैशांची योग्य गुंतवणूक करणं हेही तितकंच महत्वाचं आहे.
आजकाल प्रत्येकजण हा नवनवीन इन्व्हेस्टमेंटच्या मार्गाचा शोध घेत असतो जेणेकरून जास्तीत जास्त रिटर्न्स मिळतील आणि तेही कमीतकमी जोखमीत.
Mutual Fund Information In Marathi
सगळ्या गुंतवणुकीच्या मार्गांपैकी चांगला परतावा देणारा आणि कमी जोखमीचा मार्ग म्हणजे म्युच्युअल फंड. बँकेच्या व्याजदारापेक्षा जास्त रिटर्न्स म्युच्युअल फंडमध्ये मिळतो त्यामुळे यात गुंतवणूक करणं फायद्याचं आहे.
म्युच्युअल फंड म्हणजे काय ?
म्युच्युअल फंड (Mutual Fund Information In Marathi) म्हणजे एक ऍसेट मॅनेजमेंट कंपनी लोकांनी गुंतवणूक केलेले पैसे एकत्रितपणे शेअर मार्केटमध्ये गुंतवते आणि त्यावर जो नफा मिळतो तो सगळ्यांमध्ये समान वाटून दिला जातो.
ही कंपनी लोकांचे पैसे शेअर्स, गव्हर्नमेंट बॉण्ड्स, डिबेंचर्समध्ये गुंतवते आणि होणाऱ्या नफ्याचं सर्व लोकांमध्ये वाटप करते.
ही ऍसेट मॅनेजमेंट कंपनी वेगवेगळे म्युच्युअल फंड (Mutual Fund Information In Marathi) प्लॅन सादर करत असते आणि लोकांनी गुंतवणूक केलेल्या पैशांचं मॅनेजमेंट करते.
पैशांचं व्यवस्थापन करण्यासाठी म्युच्युअल फंड (Mutual Fund Information In Marathi) कंपन्यांमध्ये फंड मॅनेजर असतात ते शेअर मार्केटचा अभ्यास करून शेअर्समध्ये पैसे गुंतवतात.
म्युच्युअल फंडचे प्रकार :
म्युच्युअल फंडचे तीन प्रकार आहेत.
1. इक्विटी फंड
2. डेब्ट फंड
3. हायब्रीड फंड
1. इक्विटी फंड
हा म्युच्युअल फंडमध्ये सर्वात लोकप्रिय प्रकार आहे.
हे जास्त कंपनीच्या शेअर्समध्ये पैसे इन्व्हेस्ट करतात.
यामध्ये जास्त रिटर्न्स मिळवण्याची क्षमता असते आणि लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी खूप फायद्याचे आहे.
या फंडचं उद्दिष्ट संपत्ती बनवणे किंवा भांडवल वाढवणे असतं.
2. डेब्ट फंड
हा फंड फिक्स इन्कम करण्याच्या दृष्टीने तशाच सिक्युरिटीजमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो.
हा फंड सरकारी आणि कमर्शियल बॉण्ड्ससारख्या डेब्ट सिक्युरिटीजमध्ये इन्व्हेस्ट केला जातो.
त्यानंतर उरलेले पैसे कुठेही गुंतवणूक केले जातात.
3. हायब्रीड फंड
हायब्रीड फंड हा इक्विटी फंड आणि डेब्ट फंड या दोन्ही फंडचं कॉम्बिनेशन आहे.
हा फंड इक्विटी फंड आणि डेब्ट फंड दोन्हींमध्येही गुंतवणूक करतात.
यामध्ये रिटर्न कायमस्वरूपी असतो आणि रिस्कसुद्धा कमी असतं.
म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी लागणारी कागदपत्रे :
ओळखीचा पुरावा
1. पॅनकार्ड
2. आधारकार्ड / पासपोर्ट / मतदान ओळखपत्र / ड्रायव्हिंग लायसेन्स
पत्त्याचा पुरावा
3. रेशनकार्ड
4. पासपोर्ट
5. आधारकार्ड
6. ड्रायव्हिंग लायसेन्स
7. मतदार ओळखपत्र
8. बँक अकाऊंट स्टेटमेंट
9. युटिलिटी बिल
म्युच्युअल फंडमध्ये (Mutual Fund Information In Marathi) गुंतवणूक कशी करू शकतो :
1. लंपसम इन्व्हेस्टमेंट – Lumpsum
जेव्हा गुंतवणूकदार हा एकरकमी पैसे म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करतो तेव्हा त्याला लंपसम इन्व्हेस्टमेंट म्हणतात.
म्युच्युअल फंडच्या परफॉर्मन्सनुसार तुम्हाला रिटर्न मिळतात. यात तुम्ही आणखी पैसे इन्व्हेस्टसुद्धा करू शकता आणि पैसे काढूसुद्धा शकता.
2. सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन – SIP
ज्यांना म्युच्युअल फंडमध्ये एकरकमी पैसे गुंतवणूक करायचे नसतील त्यांच्यासाठी सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन बनवण्यात आला आहे.
SIP च्या माध्यमातून तुम्ही म्युच्युअल फंड स्कीममध्ये दर महिन्याला कमीतकमी 100 रुपये इन्व्हेस्ट करू शकता.
दर महिन्याच्या एका ठराविक तारखेला तुमच्या बँकेच्या अकाऊंटमधून ऑटोमटेड पद्धतीने पैसे काढून घेतले जातात आणि इन्व्हेस्ट केले जातात.
दर महिन्याला थोडे थोडे पैसे इन्व्हेस्ट करून तुम्हाला गुंतवणूकीची सवय लागते आणि ठराविक काळानंतर चांगले रिटर्नसुद्धा मिळतात.
म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचे लाभ :
1. म्युच्युअल फंडमध्ये फंड मॅनेजरच्या कुशलतेचा फायदा होतो. तो पैसे कुठे इन्व्हेस्ट करायचे याचा निर्णय घेतो. प्रोफेशनल व्यक्ती तुमचा पोर्टफोलिओ मॅनेज करतो त्यामुळे तुमचा फायदा होतो.
2. म्युच्युअल फंडमध्ये वैयक्तिक इन्व्हेस्टमेंटपेक्षा कमी रिस्क असते कारण तुमची इन्व्हेस्टमेंट ही वेगवेगळ्या ठिकाणी केलेली असते.
3. म्युच्युअल फंडमुळे तुमच्या पोर्टफोलिओमध्ये स्टॉक्स, बॉण्ड्स, कमोडिटी असे वेगवेगळ्या प्रकारचे इन्व्हेस्टमेंट असतात. वेगवेगळ्या प्रकारच्या इन्व्हेस्टमेंट असल्यामुळे लॉस होण्याचं रिस्क कमी होतं.
4. इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी म्युच्युअल फंड हा खूप सोपा मार्ग आहे कारण यात खरेदी आणि विक्री ही ब्रोकर किंवा ऍसेट कंपनीद्वारे केली जाते आणि गुंतवणूक करण्यासाठी खूप कमी भांडवल लागते.
5. म्युच्युअल फंडसाठी दुसऱ्या इन्व्हेस्टमेंटपेक्षा कमी फीस लागते आणि त्याचबरोबर इन्कम टॅक्समध्येसुद्धा फायदा मिळतो त्यामुळे पैशांची बचत होते. म्युच्युअल फंड आपल्याला टॅक्समध्ये बचत करून देतात.
6. म्युच्युअल फंडस् ब्रोकर आणि फायनान्शियल कंपन्याकडून अगदी सहज खरेदी आणि विक्री होऊ शकतात. गुंतवणूकदार हे कधीही अगदी सोप्या पद्धतीने आपले इन्व्हेस्टमेंट कॅश करू शकतात.
7. म्युच्युअल फंडमुळे (Mutual Fund Information In Marathi) आपल्याला वेगवेगळे इन्व्हेस्टमेंट ऑप्शन मिळतात.
8. प्रोफेशनल व्यक्ती पोर्टफोलिओ मॅनेज करतो आणि वेगवेगळे इन्व्हेस्टमेंट ऑप्शन मिळतात त्यामुळे म्युच्युअल फंड ठराविक काळानंतर दुसऱ्या इन्व्हेस्टमेंटपेक्षा खूप चांगले रिटर्न्स देतात.
म्युच्युअल फंडमधून किती रिटर्न्स मिळू शकतात :
म्युच्युअल फंडमधून (Mutual Fund Information In Marathi) मिळणारे रिटर्न्स हे फिक्स नसतात पण गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न्स मिळवून देतात.
म्युच्युअल फंडमधून जवळपास 14 ते 18% चे रिटर्न मिळतात.
म्युच्युअल फंड कोणत्या प्रकारचा आहे, फंडचा प्रकार कोणता आहे, इन्व्हेस्टमेंटचं स्ट्रक्चर आणि इन्व्हेस्टमेंटचा कालावधी यावर तुम्हाला मिळणारा रिटर्न अवलंबून असतो.
भांडवली नफ्याच्या स्वरूपानुसार म्युच्युअल फंड गुंतवणूकीवर टॅक्स आकारला जातो.
लॉंग टर्म कॅपिटल गेन :
लॉंग टर्म कॅपिटल गेनमध्ये 1 लाख रुपयांपर्यंत कोणताही टॅक्स नाही. 1 लाख रुपयांवर 10% टॅक्स आकारला जातो.
शॉर्ट टर्म कॅपिटल गेन
शॉर्ट टर्म कॅपिटल गेनमध्ये 15% टॅक्स आकारला जातो.
म्युच्युअल फंडसवर (Mutual Fund Information In Marathi) टॅक्स कसे असतात :
म्युच्युअल फंडवर काही टॅक्ससुद्धा असतात.
1. इक्विटी फंडवर 15% चा फ्लॅट टॅक्स आकारला जातो.
2. डेब्ट फंडच्या बाबतीत फ्लॅट 20% चा टॅक्स आकारला जातो.
3. हायब्रीड फंडच्या बाबतीत फ्लॅट 15% टॅक्स आकारला जातो.
मित्रांनो तर ही होती म्युच्युअल फंडबद्दल सर्व माहिती.
मित्रांनो तुम्हाला हा आर्टिकल उपयोगी वाटला असेल तर आमचे दुसरे आर्टिकलसुद्धा नक्की वाचा.
खूप खूप धन्यवाद !