Full Form Of Wifi : तुम्हाला WiFi चा फुल फॉर्म माहितेय का ?

Full Form Of Wifi

Full Form Of Wifi मित्रांनो आज आपण Wi Fi चा full form आणि काही महत्वाची माहिती जाणून घेणार आहोत.

Full Form Of Wifi 

Full Form Of Wifi आहे Wireless Fidelity.

Wi fi हे एक वायरलेस नेटवर्क आहे. या नेटवर्कच्या माध्यमातून आपण अनेक डिव्हाईस कनेक्ट करू शकतो आणि सोबतच इंटरनेट ऍक्सेस करू शकतो.

जगभर Wi fi हे घरोघरी आणि ऑफिसमध्ये इंटरकनेक्शन आणि इंटरनेटसाठी वापरले जाते.

Wi fi नेटवर्क चा शोध 1997 साली लावण्यात आला

Internet चा फुल फॉर्म माहितेय का ?

हे नेटवर्क स्मार्टफोन, कॉम्प्युटर, स्मार्टटीव्ही, सिक्युरिटी कॅमेरे, गेमिंग कंसोल, स्मार्ट डिव्हाईस कनेक्ट करण्यासाठी वापरण्यात येते.

Wi fi चे फायदे :

1. Wi fi नेटवर्कचा इंटरनेटचा स्पीड हा दुसऱ्या नेटवर्क प्रोवायडरच्या इंटरनेटपेक्षा खूपच फास्ट असतो.

2. अनेकदा आपल्याला सार्वजनिक ठिकाणी फ्री Wi fi सुद्धा वापरायला मिळतं.

3. मोबाईल इंटरनेट प्लॅन्सच्या तुलनेत Wi fi हे खूपच स्वस्त असते आणि त्यात इंटरनेट डेटासुद्धा जास्त वापरायला मिळतो त्यामुळे पैशांची खूप बचत होते.

4. कॉम्प्युटरला इंटरनेट वापरायचे असेल तर डेटा जास्त लागतो त्यामुळे Wi fi वरून इंटरनेट वापरणं खूप योग्य ठरते.

5. Wi fi मुळे आपण अनेक डिव्हाईस एकमेकांना कनेक्ट करू शकतो.

Wi fi चे नुकसान :

1. Wi fi हे एके ठिकाणी सेट केलेले असते त्यामुळे जर आपण त्याच्या रेंजच्या बाहेर गेलो तर आपल्या डिव्हाईसचं कनेक्शन तुटतं आणि आपल्याला Wi fi वापरता येत नाही.

2. अनेकदा आपल्याला सार्वजनिक ठिकाणी फ्री Wi fi ची सुविधा मिळते आणि आपण फ्री इंटरनेट वापरता येईल या लालचने आपला मोबाईल त्या Wi fi ला कनेक्ट करून इंटरनेट वापरू सुद्धा लागतो. पण यामुळेच आपल्या मोबाईलच्या सिक्युरिटीचा प्रॉब्लेम येऊ शकतो. हॅकर्स आपला मोबाईल हॅक करू शकतात त्यामुळे आपल्याला त्रासाला सामोरं जावा लागू शकतं.

मित्रांनो तुम्हाला हा आर्टिकल आवडला असेल तर आमचे दुसरे आर्टिकल सुद्धा नक्की वाचा. 

खूप खूप धन्यवाद !

Scroll to Top