UPS Full Form मित्रांनो आज आपण UPS चा full form आणि UPS विषयी महत्वपूर्ण माहिती घेणार आहोत.
UPS Full Form
UPS full form is Uninterruptible Power Supply.
आपल्या घरातील पॉवर सप्लाय हा अनेकदा खंडित होत असतो अशावेळी आपल्या घरातील सगळी उपकरणं बंद पडतात आणि आपलं सगळं काम अडतं.
अशावेळी आपल्याला पॉवर सप्लायसाठी बाहेरून पॉवर घेण्याची गरज असते त्यावेळी UPS आपल्याला खूप कामी येतं.
आजचा सोन्याचा भाव माहितेय का ?
UPS हे एक इलेक्ट्रिकल उपकरण आहे जे घरातील मेन पॉवर सप्लाय बंद पडल्यावर घरातील उपकरणांना पॉवर सप्लाय देतं. UPS मध्ये एक बॅटरी असते आणि त्यात साठवलेली पॉवर ही पुढे सप्लाय केली जाते.
अचानक पॉवर सप्लाय गेल्यामुळे खूप नुकसान होऊ शकतं. कंपन्या किंवा बिझनेसमध्ये अचानक पॉवर सप्लाय बंद झाला तर तुमचं महत्वाचं काम थांबू शकतं, महत्वाचा डेटा लॉस होऊ शकतो. बिझनेसमध्ये नुकसान होतं. कंपनीत मशीनवर काम करणाऱ्या लोकांना दुखापत होऊ शकते.
UPS चे फायदे :
1. अचानक पॉवर सप्लाय खंडित झाला तर UPS पॉवर देते त्यामुळे कामाचं नुकसान होत नाही.
2. अखंडित पॉवर सप्लायमुळे कार्यक्षमता सुद्धा वाढते.
3. UPS चा मेंटेनन्स हा खूप कमी असतो त्यामुळे ते परवडतं.
4. तीव्र गतीने येणाऱ्या पॉवर सप्लायमुळे घरातल्या उपकरणांचं नुकसान होतं अशावेळी UPS पॉवर सप्लाय स्टेबल ठेवण्याचा प्रयत्न करतं.
5. कंपन्यांमध्ये पॉवर लॉसमध्ये होणाऱ्या डेटा लॉसपासून UPS संरक्षण करते.
UPS चे नुकसान :
UPS जे जेवढे फायदे आहेत त्यासमोर नुकसान हे काहीच नाहीत.
1. UPS चा सेटअप करण्यासाठी एक्स्पर्ट लोकच लागतात.
2. ठराविक काळानंतर UPS च्या बॅटरीचे सेल्स बदलावे लागतात.
तर मित्रांनो तुम्हाला हा आर्टिकल आवडला असेल तर आमचे दुसरे आर्टिकल सुद्धा नक्की वाचा.
खूप खूप धन्यवाद !