Actor Prasad Oak Sad News : या मराठी अभिनेत्याला वडिलांचं अंत्यदर्शनसुद्धा घेता आलं नाही

Actor Prasad Oak Sad News 

Actor Prasad Oak Sad News कोरोना काळ हा आपल्या सर्वांच्याच आयुष्यातील अतिशय कठीण काळ होता. त्या दरम्यान अनेक निरपराध लोकांना आपले प्राण गमवावे लागले. अनेक कुटुंबं उध्वस्त झाली. अनेकांच्या उपजीविकेचं साधन बंद झालं. एखाद्या वाईट स्वप्नासारखा तो आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातील काळ होता. जे त्यातून सुखरूप वाचले ते खरंच नशीबवान आहेत.

 Actor Prasad Oak Sad News 

प्रसाद ओक हा मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक आहे. यासोबतच तो ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ शोमध्ये परीक्षक म्हणूनही काम करतो. आता प्रसादने कोरोना काळात आपल्या आयुष्यात आलेल्या सर्वात वाईट प्रसंगाबद्दल एका मुलाखतीत सांगितलं आहे.
प्रसादने यावेळी सांगितलं की, कोरोनाची पहिली लाट येऊन गेली होती. आपण सगळेच खूप भीतीच्या वातावरणात जगत होतो. त्यानंतर मग कोरोनाची तीव्रता थोडी कमी झाल्यावर सरकारने बायो बबलमध्ये मालिकेची शूटिंग सुरू करण्याची परवानगी दिली होती.

सरकारने या बायोबबलसाठी नियम बनवले होते की शूटिंगच्या युनिटमधील एकही माणूस त्या जागेतून बाहेर जाणार नाही आणि एकही नवा माणूस त्या जागेत आत येणार नाही.

Maharashtrachi Hasyajatra
Maharashtrachi Hasyajatra

हे नियम पाळण्यासाठी शूटिंग करण्यासाठी मुंबई बाहेर जाणं गरजेचं होतं म्हणजे एक युनिट त्या बायोबबलमधेच राहील. सर्व नियम पाळत महाराष्ट्राची हास्यजत्राचं संपूर्ण युनिट शूटिंगसाठी मुंबईहुन दमणला गेलं.

29 एप्रिलला आम्ही सगळे दमणमध्ये पोहोचलो. सगळेजण सेटल झाल्यानंतर 30 एप्रिलला शेड्युलप्रमाणे पहिल्या एपिसोडचं सकाळी 9 वाजता शूटिंग सुरू करण्यात येणार होतं. आम्ही सकाळी सगळे उठलो आणि आवरत होतो. फ्रेश झाल्यानंतर मोबाईल बघितला तर त्यावर बायकोचे 8 ते 10 मिस्डकॉल आलेले होते. मी तिला फोन केला तेव्हा तिने मला सांगितलं की माझे वडील (Actor Prasad Oak Sad News) गेले. हे ऐकून मला धक्काच बसला.

अभिनेता प्रसाद ओकबद्दल दुःखद बातमी समोर

मी मूळचा पुण्याचा असल्यामुळे पुण्यात माझे चांगले मित्र आणि अनेक ओळखीचे होते. एका मित्राच्या ओळखीने पुण्यातील त्यावेळच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क केला. (Actor Prasad Oak Sad News) त्यांना विचारलं ते माझे वडील आहेत. आपण काय करू शकतो ? तेव्हा अधिकारी म्हणाले, साहेब परिस्थिती भयंकर वाईट आहे. फक्त अर्धा पाऊण तास आम्हाला ठेवायची परवानगी आहे. तुम्ही फोन करताय पण आपण एवढाच वेळ ठेवू शकतो.

तुम्ही दमणला आहात आणि ते पुण्यात आहेत. पुण्यात यायला तुम्हाला 6 ते 7 तास लागतील. एवढा वेळ आम्ही त्यांना ठेवू शकणार नाही. (Actor Prasad Oak Sad News) परिस्थिती खूप वाईट आहे. आमच्यावर खूप दबाव आहे. मी काहीच करू शकत नाही.

लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेतील कलाकारांची ओळख

हे ऐकल्यावर पुण्याला येणं शक्यच नव्हतं. प्रवास करण्यावर खूप बंधनं होते सहज प्रवास करणं शक्य नव्हतं आणि येऊनही ते वडिलांना ठेवू शकत नव्हते.

यामुळे मी त्या अधिकाऱ्यांना विनंती केली की माझा भाऊ मला व्हिडिओ कॉल करेल त्यावर शेवटचं वडिलांना बघू द्या. त्यावर ते म्हणाले इथे मोबाईल आणायला परवानगी नाही. तुमचे भाऊ मोबाईल बाहेर ठेवून आलेत त्यामुळे ते शक्य नाही. मी त्यांना म्हटलं तुमच्या मोबाईलवरून व्हिडिओ कॉल लावता का ? पण ते म्हणाले मला परवानगी नाहीये मी फोन करू शकत नाही. यामुळे मी माझ्या वडिलांना शेवटचं पाहिलंसुद्धा नाही. भाऊ तिकडे वडिलांना अग्नी देत होता आणि मी खुर्चीत बसून हास्यजत्रेचं स्किट बघत होतो. 

अभिनेता प्रसाद ओकने आपल्या आयुष्यातील हा अतिशय हृदयद्रावक दुःखद प्रसंग सगळ्यांसोबत शेअर केलाय. हा प्रसंग ऐकून सगळ्यांच्या डोळ्यांत नक्कीच पाणी येईल.

मनोरंजनविश्वातील अशाच बातम्यांसाठी आमच्या वेबसाईटला नक्की फॉलो करा. 

तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद !

Scroll to Top