Gayatri Datar In Abir Gulal Serial : अभिनेत्री गायत्री दातार कलर्स मराठीच्या या मालिकेतून 5 वर्षांनंतर टीव्हीवर परतणार

Gayatri Datar In Abir Gulal Serial

Gayatri Datar In Abir Gulal Serialतुला पाहते रे‘ या मालिकेतून अभिनेत्री गायत्री दातारने मालिकविश्वात पदार्पण केलं होतं. ती तिच्या पहिल्याचं मालिकेत प्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे यांच्यासोबत झळकली होती. गायत्रीने साकारलेली ईशा निमकरची भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडली होती. ही मालिका 2018 मध्ये सुरू झाली आणि 2019 साली या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला होता.

त्यानंतर गायत्री दातार कोणत्याही मालिकेत दिसली नव्हती. पण आता ती तब्बल पाच वर्षांनंतर कलर्स मराठीच्या ‘अबीर गुलाल’ या मालिकेतून टीव्हीवर पुनरागमन करतेय. गायत्री या मालिकेत मुख्य नायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे.

 Gayatri Datar In Abir Gulal Serial 

‘अबीर गुलाल’ या मालिकेचा प्रोमो काही दिवसांपूर्वी आला होता. या मालिकेत दोन मुलींची कथा दाखवली जाणार आहे ज्यांची लहानपणी हॉस्पिटलमध्ये अदलाबदली करण्यात येते. त्यावेळी मालिकेत कोणकोणते कलाकार असणार याबद्दल त्या प्रोमोमध्ये खुलासा करण्यात आला नव्हता. पण आता याच मालिकेचा दुसरा प्रोमो दाखवण्यात आला आहे. यामध्ये मालिकेतील मुख्य कलाकारांची ओळख करून देण्यात आलीय.

Gayatri Datar New Serial
Gayatri Datar New Serial

या मालिकेत अभिनेत्री गायत्री दातार (Gayatri Datar In Abir Gulal Serial) आणि ‘बापल्योक’ चित्रपटातील अभिनेत्री पायल जाधव मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. ही पायलची पहिलीच मालिका आहे. अभिनेत्री गायत्री दातार या मालिकेत ‘शुभ्रा’ ही भूमिका साकारतेय. ती श्रीमंत कुटुंबातील आहे आणि तिला काळ्या रंगाचा प्रचंड तिटकारा आहे.

तर अभिनेत्री पायल जाधव ही ‘श्री’ ची भूमिका साकारतेय. ती गरीब कुटुंबातील आहे आणि तिला तिच्या सावळ्या रंगावरून खूप वाईटसाईट ऐकून घ्यावं लागतं पण ती आपलं आयुष्य अतिशय उल्हासात जगते.

 अभिनेत्री गायत्री दातार दिसणार अबीर गुलाल मालिकेत

शुभ्रा आणि श्री या दोघीही स्वभावाने, विचाराने आणि आर्थिक परिस्थितीने एकमेकींच्या विरुद्ध आहेत. पण या त्याच मुली आहेत ज्यांची लहानपणी अदलाबदल करण्यात आली होती. आता या दोघींचा एकमेकींशी काय संबंध आहे. मालिकेची कथा नक्की काय असेल या गोष्टींचा उलगडा लवकरच होईल. मालिका कधी सुरू होणार हेसुद्धा लवकरच कळेल. मालिकेविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे हे दिसून येतंय.

कलर्स मराठीवर सुरू होणार नवी मालिका अबीर गुलाल

अभिनेत्री गायत्री दातार (Gayatri Datar In Abir Gulal Serial) पाच वर्षांनी एका मालिकेत दिसणार म्हणून तिचे फॅन्स खूपच आनंदी झाले आहेत. गायत्रीने इंस्टाग्रामवर या मालिकेचा प्रोमो शेअर केला त्यावर अनेक कलाकारांनी आणि फॅन्सनी कमेंट्स करत तिला नवीन भूमिकेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

मनोरंजनविश्वातील अशाच नवनवीन बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईटला नक्की फॉलो करा. 

तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद !

Scroll to Top