Sali Bhauji Marathi Story : मोठ्या बहिणीच्या मृत्यूनंतर छोट्या बहिणीचं भाऊजीशी लग्न ठरलं पण…

Sali Bhauji Marathi Story

Sali Bhauji Marathi Story “राणी आता माझ्याकडे जास्त वेळ नाहीये. मी हे जग सोडून जातेय, याचं मला दुःख नाहीये. मला फक्त याचं वाईट वाटतंय की, माझ्या सोनूचं काय होणार ? अवघ्या सहा महिन्यांचा आहे गं तो. मोठा झाल्यावर त्याला मी आठवणारसुद्धा नाही. मी मेल्यानंतर त्याची आबाळ होऊ नये, एवढीचं माझी इच्छा आहे. तू प्लीज त्याला सांभाळशील का ? आईचं प्रेम देशील का ? आयुष्याच्या प्रत्येक वळणावर त्याच्याबरोबर राहशील का ?”

आयुष्याच्या शेवटच्या घटका मोजणारी मोनाली, तिची छोटी बहीण राणीला हे सगळं सांगत होती. राणीच्या डोळ्यात अश्रू होते. आपली बहीण हे जग सोडून जातेय, हे दुःख तिच्यासाठी खूप मोठं होतं. वर्षभरापासून कॅन्सरशी लढा देणारी तिची बहीण आता ही लढाई हरणार होती, देवाघरी जाणार होती.

Sali Bhauji Marathi Story

तेवढ्यात डॉक्टर तेथे येतात. राणी बाहेर येते. बाहेर बसलेला मोनालीचा नवरा सुशांत खूप दुःखी असतो. त्याला जबर धक्का बसलेला असतो. राणीचे बाबा तिला विचारतात, “काय बोलली ती तुला ?” राणी बाबांना घट्ट मिठी मारते आणि रडू लागते. बाबा म्हणतात, “सावर स्वतःला, आता पुढे जे वाढून ठेवलंय, ते आपल्याला भोगावचं लागणार आहे. काय म्हणाली मोनाली तुला ?”

राणी म्हणते, “बाबा दीदी म्हणत होती, माझ्या सोनूला सांभाळ. फक्त सहा महिन्यांचा आहे तो. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर त्याला साथ दे. बाबांच्याही डोळ्यात पाणी येतं आणि ते म्हणतात, “एका आईपेक्षा तिच्या बाळाची जास्त काळजी कोणीही घेऊ शकत नाही. मोनाली बेटा तूच नको जाऊ.”Sali Bhauji Marathi Story राणी म्हणते, “बाबा दीदी म्हणत होती, माझ्या सोनूला सांभाळ. फक्त सहा महिन्यांचा आहे तो. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर त्याला साथ दे. बाबांच्याही डोळ्यात पाणी येतं आणि ते म्हणतात, “एका आईपेक्षा तिच्या बाळाची जास्त काळजी कोणीही घेऊ शकत नाही. मोनाली बेटा तूच नको जाऊ.”

तेवढ्यात डॉक्टर बाहेर येतात. सगळेजण त्यांच्याकडे पाहू लागतात. डॉक्टर म्हणतात, “माफ करा, पण आम्ही तुमच्या पेशंटला नाही वाचवू शकलो.” असं म्हणून ते तेथून निघून जातात. सर्वांना जबरदस्त धक्का बसतो. मोनालीचा नवरा सुशांत, मोनालीचे बाबा, बहीण राणी, आई, हे सगळे रडू लागतात. मोनाली हे जग सोडून गेलेली असते, ते ही अवघ्या 25 व्या वर्षी.

या घटनेला पंधरा दिवस उलटून जातात. मोनाली गेल्याचं दुःख सर्वांना झालेलं असतं. Sali Bhauji Marathi Story परंतु आपल्याला या दुःखातून बाहेर यायला हवं, सोनूकडे पाहायला हवं. अशी सर्वांची भावना असते. सगळे एकत्र जमलेले असतात. सुशांतचे आई-वडील म्हणतात, “मोनाली गेल्याचं आम्हालाही खूप दुःख झालंय. आमच्या मुलाचा संसार अर्ध्यातूनचं मोडला. आता  कोठे त्यांनी जगायला सुरुवात केली होती. त्यांच्या संसाराला सुरुवात झाली होती. जे घडलं ते सगळं खूप अनपेक्षित होतं. पण आता यातून काहीतरी मार्ग काढायला हवा.”

Marathi Emotional Story

मोनालीचे बाबा म्हणतात, “खरं बोलताय तुम्ही. आता झालं गेलं, मागे सोडून आपण पुढे जायला हवं. सुशांतराव आणि सोनू या दोघांकडे पाहायला हवं. त्यांची भविष्याची सोय करायला हवी. त्यांचा संसार पुन्हा थाटायला हवा.” सुशांतचे बाबा म्हणतात, “मला हेच म्हणायचं होतं की, Sali Bhauji Marathi Story आता सुशांतने दुसर लग्न करायला हवं. परंतु सोनूसाठी सावत्र आई नको. म्हणून मी तुमची छोटी मुलगी राणीचा हात माझ्या सुशांतसाठी मागतो.

एका मावशीपेक्षा जास्त प्रेम आमच्या सोनूला कोण देऊ शकतं आणि मोनालीनेसुद्धा जाता जाता राणीकडे हेच वचन मागितलं होतं की, माझ्या मुलाला सांभाळ. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर त्याची साथ दे.” हे ऐकून राणी आणि सुशांतला मोठा धक्काचं बसतो. तर मोनालीचे बाबा म्हणतात, “तुम्ही तर एकदम माझ्या मनातलं बोललात. माझ्या मनातसुद्धा अनेक दिवसांपासून हाच विचार होता की, जर सोनू आणि सुशांतरावांचा संसार पुन्हा सुरळीत करायचा असेल, तर राणी तुमच्या घरची सून म्हणून यायला हवी.”

राणी काही न बोलता तेथून निघून जाते. सुशांत तिच्या मागे मागे जातो. सगळे Sali Bhauji Marathi Story विचारात पडतात की, नेमका यांचा निर्णय काय झाला आहे ? सुशांत राणीजवळ येतो आणि म्हणतो, “राणी माझ्यावर विश्वास ठेव, मी याबद्दल कधी विचार केलेला नाही. मी बाबांना असं काही बोललोही नाही आणि तेही मला बोलले नाहीत. आज पहिल्यांदाच ते असं बोलताय.”

राणी म्हणते, “भाऊजी माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही नक्कीच असं काही बोललं नसाल. Sali Bhauji Marathi Story परंतु आता काय करायचं ?” सुशांत म्हणतो, “आपण यावर शांतपणे विचार करूया. उद्या मी तुला भेटतो. मग पुढचा निर्णय घेऊ.”

दुसऱ्या दिवशी हे दोघे घराबाहेर भेटतात आणि त्यानंतर एकमेकांशी बोलून त्यांचा निर्णय घेतात. हे दोघेही घरी पोहोचतात आणि त्यांचा निर्णय सांगतात. सर्वांना खूप आनंद होतो आणि लग्नाची तयारी सुरू होते. मोनालीच्या मृत्यूनंतर अवघ्या तीन आठवड्यातचं सुशांत दुसरं लग्न करणार असतो. Sali Bhauji Marathi Story लग्नाच्या हॉलमध्ये सर्व पाहुणे जमतात. सगळीकडे हीचं चर्चा असते की, लहान बहिणीचं सालीचं भावजीशी लग्न होतंय आणि तिने जो निर्णय घेतलाय, तो एकदम योग्य आहे. कारण मोठ्या बहिणीच्या मुलाला तीच सांभाळू शकते. दुसरं कोणीही नाही .सावत्र आई त्याला त्रास देईल आणि मावशीच खरी आईची माया देऊ शकते.

मंडपात नवरदेव नवरीची एन्ट्री होते. परंतु नवरीच्या चेहऱ्यावर घुंगट असतो. एक एक करून लग्नाचे सर्व विधी होऊ लागतात. नवरदेव नवरी एकमेकांना वरमाला घालतात. त्यानंतर नवरदेव नवरीच्या गळ्यात मंगळसूत्रही घालतो आणि हे लग्न संपन्न होतं. परंतु त्यानंतर नवरीच्या चेहऱ्यावरून Sali Bhauji Marathi Story घुंगट बाजूला केला जातो. तेव्हा सर्वांना धक्काचं बसतो. कारण सुशांतबरोबर दुसर लग्न केलेली त्याची बायको राणी नसून दुसरीचं कोणीतरी मुलगी असते.

सगळी पाहुणेमंडळी आणि नातेवाईकांमध्ये चर्चा होऊ लागते की, हे काय झालं ? सुशांतने Sali Bhauji Marathi Story दुसऱ्या मुलीशी लग्न केलंय. त्याने राणीशी लग्न का नाही केलं ? नेमकं काय घडलंय ? हेच प्रश्न सगळे विचारत असतात.

तेवढ्यात राणी तेथेयेते. राणीला पाहून सर्वांनाच धक्का बसतो. राणीला एक जवळची नातेवाईक विचारते, “काय गं राणी हे काय आहे, आम्हाला वाटलं तू सुशांत बरोबर लग्न करशील. तुझ्या मेलेल्या बहिणीच्या मुलाला सांभाळशील. परंतु तू मात्र स्वार्थी निघालीस. तुझ्या बहिणीने मरताना तुझ्याकडून Sali Bhauji Marathi Story जे वचन घेतलं होतं, ते विसरलीस का ? या दुसऱ्या मुलीने जर सोनूला त्रास दिला तर काय करायचं ?”

राणी हे सगळं शांतपणे ऐकून घेते आणि म्हणते, “झालं का तुमचं बोलून, आता मी काही बोलू का ? Sali Bhauji Marathi Story आता तुम्ही जे काही बोललात, हे प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहेत. सगळेजण मला दोष देतील हे मला माहिती आहे. परंतु संपूर्ण सत्य जाणून घ्या आणि मगच ठरवा.”

तेवढ्यात सुशांत पुढे येतो आणि म्हणतो, “थांब राणी, मी सांगतो या सर्वांना. यामध्ये तुझी काही चूक नाहीये. Sali Bhauji Marathi Story तुझ्याशी लग्न न करण्याचा निर्णय माझा होता, हे ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसतो.

सुशांत म्हणतो, “जेव्हा राणी आणि माझ्या लग्नाचा विषय बाबांनी काढला, तेव्हा मी राणीला भेटायला बोलवलं होतं आणि राणीला विचारलं की, तुझ काय मत आहे ? तुला माझ्याशी लग्न करायचंय का ? तेव्हा राणी म्हणाली, हो मी तुमच्याशी लग्न करायला तयार आहे. मी माझ्या ताईला दिलेलं वचन पूर्ण करेल.

मराठी रडवणारी गोष्ट

परंतु आपल्या सर्वांना माहीतचं आहे की, राणी तिच्या करिअरबद्दल किती सिरीअस आहे. तिला लवकर लग्न करायचचं नव्हतं, परंतु फक्त मोनालीसाठी हे लग्न करायला ती तयार झाली. हा तिचा खूप मोठा त्याग होता. मलाही माझ्या सोनूसाठी अशीच दुसरी आई हवीच होती, जी सख्खी आईसारखं Sali Bhauji Marathi Story तिच्यावर प्रेम करेल. परंतु मी एक वेगळा विचार केला.

माझा एक जिवलग मित्र होता शशांक. आम्ही लहानपणापासूनचं एका शाळेत शिकायचो, एकाच कॉलेजमध्ये शिकलो आणि मग एकाच ठिकाणी नोकरीही केली. परंतु सहा महिन्यांपूर्वी एका अपघातात शशांक हे जग सोडून गेला. तेव्हा शशांकची बायको प्रणाली सहा महिन्यांची गरोदर होती.

शशांक माझा खूप जिवलग मित्र होता. त्याच्या जाण्याने मला खूप दुःख झालं होतं. Sali Bhauji Marathi Story परंतु प्रणाली वहिनींची अवस्था मला पाहवली जात नव्हती. त्यांनी एका सुंदर बाळाला जन्म दिला आहे. परंतु नवरा नसल्याचं दुःख अजूनही त्यांच्या चेहऱ्यावर मला दिसून येत होतं. त्यांच्यासाठी काहीतरी करावं अशी माझी नेहमी इच्छा होती. मी त्यांच्या दुसऱ्या लग्नासाठी अनेक मुलंही पाहिली. परंतु त्यांच्या योग्यतेचं मला कुणीही भेटलं नाही.

जेव्हा मी राणीला आमच्या लग्नाबद्दल बोलायला बोलावलं होतं. तेव्हा राणी तर लग्नाला Sali Bhauji Marathi Story हो म्हणाली. परंतु मी प्रणाली वहिनीबद्दल आणि शशांकबद्दल राणीला सांगितलं, तेव्हा राणीच मला म्हणाली की, तुम्ही का नाही प्रणालीशी लग्न करत. तुम्ही दोघे एकमेकांची दुःख समजून घेऊ शकतात आणि तुम्हीही त्यांच्या बाळाबरोबर कधी सावत्र व्यवहार करणार नाही आणि तीही आपल्या सोनूबरोबर.

आधी तर मला हे थोडंसं चुकीचं वाटलं. पण मी याबद्दल विचार केला. त्यानंतर मी प्रणालीशी बोललो, Sali Bhauji Marathi Story तिच्या आई-बाबांशी बोललो, सासू-सासऱ्यांशी बोललो आणि सगळेजण यासाठी तयार झाले. कारण शशांक आणि माझा स्नेह त्या सर्वांना माहीत होता.”

हे सगळं ऐकून तेथे जमलेल्या सर्व नातेवाईकांना आणि पाहुण्यांना आश्चर्य वाटतं. जी नातेवाईक राणीला फडफडा बोलत होती, ती म्हणते, “मानलं खरंचं तुम्हाला दोघांना. तुम्ही खूप चांगला निर्णय घेतला आहे. आजचा काळात कुणीही दुसऱ्याचा विचार करत नाही. फक्त स्वतःचा विचार Sali Bhauji Marathi Story करतात. परंतु तुम्ही मात्र एक नाही, दोन नाही, चार आयुष्य सावरले आहे.”

प्रणाली म्हणते, “खरंच शशांकच्या मृत्यूनंतर मी पूर्णपणे कोलमडून गेले होते. Sali Bhauji Marathi Story परंतु राणी आणि सुशांत या दोघांनी माझं आयुष्य सावरलं. आधी तर मी या लग्नासाठी तयार नव्हते. परंतु सोनू आणि माझ्या लेकीचं भविष्य सुधारेल, या विचाराने मी तयार झाले.”

तेथे जमलेलं सगळे पाहुणे मंडळी टाळ्या वाजवू लागतात. Sali Bhauji Marathi Story शशांक आणि मोनालीनंतर या चारही जणांचं आयुष्य संकटात सापडलं होतं, परंतु आता मात्र ते भविष्य सुरक्षित दिसत होतं. त्यामुळे सर्वांनाच आनंद झाला होता. सुशांत आणि प्रणाली या दोघांचं लग्न उत्साहात पार पडतं. सगळे खूप खुश असतात. त्यानंतर दोघे आनंदाचा संसार करतात. सोनू आणि प्रणालीची छोटी मुलगी आई बाबाच्या सानिध्यात आनंदात राहतात. दुसरीकडे राणी तिच्या करिअरचं स्वप्न पूर्ण करते. तिचंही लग्न होतं आणि ती आनंदात राहते. परंतु मोनाली आणि शशांक यांची आठवण सर्वांनाच आयुष्यभर राहते.

तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, आवडली का आजची गोष्ट. नक्कीच कमेंट करुन सांगा आणि अशाच नवीन नवीन गोष्टींसाठी आमचे इतर लेखही नक्कीच वाचा.

धन्यवाद !

Scroll to Top