Marathi Actress Celebrate Dog Birthday सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री निवेदिता सराफ या नेहमीच आपल्या उत्तम अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आल्या आहेत. त्यांनी अनेक नाटकं, मालिका आणि चित्रपटांमधून भूमिका गाजवल्या आहेत. लग्न झाल्यानंतर त्यांनी काही काळ अभिनयातून ब्रेक घेतला होता पण तब्बल 14 वर्षांनंतर त्यांनी पुन्हा एकदा नाटकाच्या माध्यमातून अभिनयविश्वात पुनरागमन केलं. सध्या त्या अनेक टीव्ही मालिकांमध्ये भूमिका साकारताना दिसून येतात.
नुकत्याच त्या ‘भाग्य दिले तू मला‘ या मालिकेतही प्रमुख भूमिकेत दिसून आल्या होत्या. या मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे.
Marathi Actress Celebrate Dog Birthday
अभिनेत्री निवेदिता सराफ या सोशल मीडियावरही खूपच सक्रिय असतात. आपल्या पर्सनल लाईफबद्दल आणि कामाबद्दल त्या नेहमी फॅन्ससोबत पोस्ट शेअर करत असतात. याशिवाय ‘निवेदिता सराफ रेसिपीज’ या नावाने त्यांचं युट्युब चॅनलदेखील आहे. या माध्यमातून त्या नवनवीन रेसिपीज प्रेक्षकांसमोर सादर करतात.
नुकताच त्यांनी आपल्या घरातील पाळीव श्वान ‘सनी’ चा वाढदिवस (Marathi Actress Celebrate Dog Birthday) खूपच धुमधडाक्यात साजरा केला आणि त्या वाढदिवसाचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले. निवेदिता यांचं पाळीव प्राण्यांवर खूप प्रेम आहे आणि त्या आपल्या घरातील पाळीव श्वानाची घरातील माणसाप्रमाणेच काळजी घेतात.
अभिनेत्री निवेदिता सराफ यांचा पाळीव कुत्रा
सनी हा पाळीव कुत्रा (Marathi Actress Celebrate Dog Birthday) सराफ कुटुंबियांच्या घरातील सदस्याप्रमाणेच आहे. सगळेजण त्याची खूपच काळजी घेतात आणि त्याच्यावर खूप प्रेम करतात. त्यांचं हे नातं खूपच सुंदर आहे. सर्व कुटुंबीय आणि मित्रांनी मिळून या सनीचा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसाच्या निमित्ताने खूप छान डेकोरेशनसुद्धा केलं होतं. ‘हॅप्पी बर्थडे सनी’ असं सुंदर नावाचं डेकोरेशनसुद्धा करण्यात आलं होतं.
निवेदिता यांनी शेअर केलेल्या बर्थडेच्या फोटोमध्ये निवेदिता सराफ, अशोक सराफ, संज्योत वैद्य, राजश्री आणि नायरा दिसून येत आहेत. या सगळ्यांनी डोक्यावर बर्थडेची टोपी घातलीय आणि सगळे खूप आनंदात दिसून येत आहेत. बर्थडे बॉय ‘सनी‘ सुद्धा ब्ल्यू कलरचा ड्रेस आणि बर्थडे टोपी घालून अतिशय सुंदर दिसतोय.
घरातील पाळीव श्वानाचा वाढदिवस (Marathi Actress Celebrate Dog Birthday) इतक्या आनंदात साजरा केल्यामुळे सगळेजण निवेदिता सराफ यांचं कौतुक करत आहेत. फॅन्सनासुद्धा खूपच आनंद झाला आहे आणि सगळे खूप खुश आहेत. निवेदिता यांच्या फोटोवर सगळे फॅन्स लाईक्स आणि कमेंट्स करून सनीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देत आहेत.
मनोरंजनविश्वातील अशाच नवनवीन बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईटला नक्की फॉलो करा.
तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद.