Free Electricity Scheme सध्या देशात लोकसभा निवडणूक सुरू आहे. परंतु या निवडणुकांआधीचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक मोठी सरकारी योजना सुरू केली होती. या योजनेचे नाव आहे प्रधानमंत्री सुर्यघर योजना.
या योजनेअंतर्गत देशातील 1 कोटी घरांवर सौर पॅनल लावण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं होतं. जे लोक या योजनेत सहभागी होतील, त्यांना घराच्या छतावर सोलर पॅनल लावण्यासाठी 78 हजार रुपयांपर्यंतची सबसिडी देण्यात येणार आहे. त्याचबरोबर 300 युनिट फ्री वीज (Free Electricity Scheme) वापरण्यास देण्यात येईल.
Free Electricity Scheme
या योजनेला देशातील लोकांचा खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळालाय आणि आतापर्यंत 1 कोटी पेक्षा जास्त लोकांनी या योजनेसाठी अर्ज केलाय. आपल्या महाराष्ट्रातूनही आतापर्यंत 5 लाखपेक्षा जास्त लोकांनी या योजनेसाठी अर्ज केला आहे.
या योजनेअंतर्गत तुम्ही तुमच्या गरजेनुसार घरावर 1 किलो वॅट, 2 किलो वॅट आणि 5 किलो वॅट या कॅपॅसिटीचे सोलर पॅनल्स बसवू शकतात. एक किलो वॅटपर्यंत सोलर पॅनल बसवायचं असेल, तर सरकार 18 हजार रुपये सबसिडी देतं. तर 2 किलो वॅट कॅपॅसिटीच्या सोलर पॅनलसाठी 30 हजार रुपयांपर्यंतची सबसिडी दिली जाते. तुम्ही जर 5 किलो वॅटचा सोलर पॅनल घरावर इंस्टॉल केला, तर त्यासाठी सर्वात जास्त 78 हजार रुपयांची सबसिडी दिली जाते.
केंद्र सरकारची मोफत वीज योजना
या (Free Electricity Scheme) योजनेअंतर्गत ज्या घरांवर सोलर पॅनल बसवले आहेत, त्यामधून जी वीज निर्माण होईल, त्यापैकी 300 युनिट वीज त्या घरमालकांना फ्री देण्यात येईल आणि कोणत्याही घरात तीनशे युनिटपेक्षा जास्त वीज शक्यतो वापरली जात नाही. म्हणजे या योजनेत सहभागी झाल्यानंतर तुम्हाला आयुष्यभरासाठी मोफत वीज मिळेल.
एकूणचं आपल्या देशात दिवसेंदिवस विजेचे दर वाढत चालले आहेत. विजेसाठी येणारा खर्च वाढत चालला आहे. त्यामुळे ही योजना नागरिकांसाठी खूपचं फायदेशीर आहे, यात शंका नाही. आपल्या देशात सौरऊर्जा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे बाराही महिने सूर्य प्रकाश मिळतो. त्यामुळे एक स्वच्छ आणि पर्यावरणपूरक पर्याय म्हणून या (Free Electricity Scheme) योजनेकडे पाहिलं जातंय.
प्रधानमंत्री सूर्यघर योजना संपूर्ण माहिती
तर तुम्ही प्रधानमंत्री सूर्यघर योजनेसाठी अर्ज केलाय का ? या योजनेसाठी कसा अर्ज करायचा याबद्दलची माहिती आम्ही या लेखात दिली आहे. हा लेख या लिंकवर क्लिक करून नक्कीचं वाचा.
आणि अशाचं नवीन नवीन माहितीसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.
खूप खूप धन्यवाद !